अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू
अंबरनाथ: कोरोनाचा नवीन प्रकार वेगाने पसरू लागला आहे, त्यामुळे राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लागू केलेली रात्रीची संचारबंदी अंबरनाथमध्ये लागू करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. अंबरनाथमध्ये आज २२ डिसेंबर २०२० पासून ५ जानेवारी २०२१ रोजी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, या निर्णयामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत बंद रहाणार असून याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी केले आहे.