पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोरोना व्हायरस : भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात ठप्प

मुंबई : चीनच्या कोरोना व्हायरसमुळे जगाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होण्यास सुरुवात झाली असून त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तातडीने उपाययोजना आखत पीडित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते केव्हीपी रामचंद्रराव यांनी राज्यसभेत बोलताना केली. शिवाय, कोरोना व्हायरसमुळे तिथल्या बड्या कंपन्यांना देखील मोठा फटका बसला आहे. कोरोनानं चायनाचं कंबरडं मोडलंय. चीनमध्ये अॅपल फोनची ४२ शो रुम्स बंद आहेत. तर स्टारबक्सचे चार हजारांच्या वर कॅपे बंद पडलेत. कोरोनानं अख्ख्या जागतिक अर्थव्यवस्थेचा बँड वाजवला आहे. कोरोना व्हायरसने आतापर्यंत ७१७ पेक्षा जास्त जणांचा बळी घेतला आहे. त्याचप्रमाणे ३४ हजार लोकांना कोरोना व्हायरसची लागन झाली आहे. अवघ्या जगाने कोरोनो व्हायरसचा धसका घेतला आहे. भारतात पहिला संशयित केरळमध्यो आढळलाय. ___ त्यामुळे कोरोना केरळलगत असलेल्या कोकणात कधीही प्रवेश करू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीनं आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्व झाली आहे. जिल्ह्यातील ...

संवाद परंपरेचा परिवर्तनाशी अनेक महिलांनी घेतला उपक्रमात सहभाग

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील जि. प.शाळा निघू येथे दि.२४ जानेवारी २०२० रोजी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त पालक सभा व विचारकुंकू या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात हा समारंभ संपन्न झाला. गावातील माता पालकांशी संवाद साधता यावा व आपल्या मनीचे हितगुज त्यांच्याशी करता यावे या उद्देशानेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला माताभगिनींची उपस्थित उत्तम होती. सदर ठिकाणी विविध विषयांवर माहिती सांगण्यात आली. __ स्त्री जीवन ते किशोरवयीन बालिका, मासिक पाळी, तसेच स्त्री पुरूष समानता ते फोक्सो कायदा, लैंगिक शिक्षण या सर्वच विषयांवर चर्चा झाली. त्यावर आधारित पीपीटी ही दाखविण्यात आली. माता भगिनींनी अगदी मोकळे पणाने आमच्याशी संवाद साधला असल्याचे शिक्षीका अनिता साळवे यांनी सांगितले केले. सदर कार्यक्रमास पं.स.कल्याण समावेशित शिक्षण विषय तज्ञ वैशाली शिद , गाठाळ | ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका आशा जवरे ,पो.सु.बाळे च्या सहशिक्षिका प्राजक्ता पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. गावातील सर्वात ज्येष्ठ महिला आजी ज्या विधवा आहेत आणि वैशाली शिंदे ज्य...

लोकप्रतिनिधींनीची उदासीन भूमिका

इमेज
मराठवाड्याच्या मराठवाडा व दुष्काळाचे नाते एवढे घट्ट आहे की मराठवाडा म्हटले की नजरेसमोर दुष्काळ येतो. पाणी टंचाई मुळे होणारा टँकरने पाणीपुरवठा,चारा टंचाईमुळे उघडल्या जाणाऱ्या चारा छावण्या,हाताला काम मिळावे म्हणून सुरु होणारे रोहयोची कामे आदी सोपस्कार दरवर्षी पार पाडले जातात.परंतु मराठवाड्याच्या दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासंदर्भात व्यापक प्रयत्न होताना दिसत नाहीत उदाहरणच घ्यायचे म्हटल्यास औरंगाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या पाणी परिषदेचे देता येईल.या पाणी परिषदेस मराठवाड्यातील एकूण ४६ आमदारांपैकी केवळ दहा आमदार उपस्थित होते.आमदारांनी या परिषदेकडे सपशेल पाठ फिरवली यावरून मराठवाड्यातील आमदार लोकप्रतिनिधी पाणीप्रश्नावर किती गंभीर आहेत हे लक्षात यावे. त्यात अग्रभागी असेल पाणी!शेतीसाठी जलसिंचन सुविधा नसणे ही मराठवाड्याची सर्वात मोठी समस्या आहे.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.कोरडवाह शेती परवडत नाही म्हणून मराठवाड्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मराठवाड्याच्या पाणी चिंताजनक आहे. राज्यात २०१९ मध्ये २८०८ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा अवेळी संपविली.२०१८ पेक्षा ही संख्या ४७ ने जास...

शरीरावरील कोडाच्या डागामुळे आत्मविश्वास गमाविलेल्या तरुणाला सेल बेस थेरपीने दिलासा

इमेज
टिटवाळा : शरीरावर कोडाचे पांढरे डाग असलेल्या व्यक्तींना अनेकदा सामाजिक कुचंबणेला सामोरे जावे लागते. हे डाग संसर्गजन्य असतील की काय, ही निरर्थक भीती यामागे असते. हे डाग लपवण्यासाठी अनेक मंडळी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात, या व्यक्ती मनात न्यूनगंड बाळगू लागतात. पण आता मात्र अशा व्यक्तींकरिता वरदान करणारी थेरपी अस्तित्वात आहे आणि या आजारावर उपचार नक्कीच आहेत. मनातील भीती दूर करून त्यावर योग्य उपचार केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल आणि आत्मविश्वासही वाढेल. ओमान येथील २७ वर्षीय व्यक्तीला अचानक चेह-यावर पांढरे चट्टे पडू लागले आणि हळूहळू याचे प्रमाण वाढून संपुर्ण शरीरावर अशाप्रकारे चट्टे दिसू लागले. हे पांढरे कोडाचे डाग असल्याचे असे निदान झाल्यानंतर ही व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसल्याने घराबाहेर जाणेच बंद केले. मुंबईतील रीजनरेटीव्ह मेडिकल रिसर्चरचे डॉ. प्रदिप महाजन यांच्या स्टेम सेल्स थेरपीने या व्यक्तीचे आयुष्य पुन्हा प्रकाशमय झाले. पांढरे कोडाचे डाग म्हणजे ज्यामध्ये आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहात नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाऱ्या पेशींन...

पहिल्याच दर्शनाने प्रेमात पाडणारे धेमाजी

इमेज
आसाम हे मुळातच निसर्गाने नटलेले राज्य. या राज्यात अरुणाचल सीमेजवळ वसलेले ऐतिहासिक आणि प्राचीन धेमाजी पर्यटकांना पहिल्याच दर्शनाने प्रेमात पडणारे स्थळ आहे. चोहोबाजूने दिसणारी हिरवीगार लुसलुशीत भात शेते, भाताचा दरवळणारा विशिष्ट सुगंध तर रब्बी हंगामात गेलात तर पिवळ्या सुंदर फुलांनी मोहरलेली सरसो म्हणजे मोहरीची शेते तुम्हाला सर्व चिंता, त्रास विसरायला लावतील. येथील प्राचीन कला संस्कृती व आधुनिकता यांचा संगम मनाला मोह घालतो आणि नव्या जुन्याची येथे जशी एकरूपता आहे ती अन्यत्र दिसणे कठीण. विशेषत विवाह उत्सवात ती ठळकपणे जाणवते. येथील विवाहात परंपरेने चालत आलेल्या अनेक रूढी आहेत पण स्त्री पुरुष बरोबरी, स्त्री स्वतंत्रतेसंबंधी नवी मुल्ये तितक्याच आत्मीयतेने स्वीकारलेली पाहायला मिळतात. पानांनी रंगलेल्या ओठांनी बिहू नृत्य करणारी वृद्धा आणि तिला सहज बासरीची साथ करणारा शेतात काम करणारा तरुण हे कधीही आढळणारे दृश्य. ब्रापुत्र नदीच्या उत्तरेला असलेले हे ठिकाण आणि येथील सौदर्य वर्णनापलीकडेचे आहे. त्याला हिमालयाच्या बर्फाळ शिखरांनी आणखी नटविले आहे. हिमालय आणि ब्रह्मपुत्रा नदी यांच्यामुळे येथे विविध प्रकार...

महागाई...महागाई..

महागाई...महागाई.... सध्या एकच चर्चा रंगात आली आहे, ती म्हणजे महागाई. महागाईचा उच्चांक या सरकारने आधीच्या सरकारपेक्षा गाठला आहे. रोजगार नाही, सर्वच घटक महाग झाले आहेत. परंतू विचार करता, महागाईमधून मी काय शिकलो. महागाई कुठे आणि कोणत्या घटकाला आली आहे. ते सुध्दा तपासणे माझे कर्तव्य आहे. ज्या गोष्टी मला आवश्यक आहे, त्या गोष्टीत जर महागाई असेल तर मानले पाहिजे, परंतु ज्या गोष्टी माइया रोजच्या व्यवहारात नाही. आणि त्या गोष्टी जर महाग होत असतील तर नक्कीच त्याच्याशी माझे देणेघेणे नाही. परंतु जिथे माझा काही संबंध नाही. अशा वायफळ चर्चेत मी गुंततो आणि नकळत मी महागाईच्या नावाने ताशेरे ओढतो. सर्वसामान्य घटकांना जे आवश्यक आहे, त्या घटकांची पुर्तता नक्कीच सरकार करत असते.

शेती सिचन योजना लघु पाटबंधारे विभागाकडून मंजूरी

इमेज
शहापूर तालुक्यातील शिरगाव येथे दोन तप प्रतीक्षा केल्यानंतर आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने जांभ्या च्या धरणातील पाणी शेती सीचनासाठी उपलब्ध करून देणारी शेती सिचन योजना लघु पाटबंधारे विभागाकडून मंजूर केली होती. सदर योजनेच्या कामाचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे व आमदार दौलत दरोडा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तब्बल २४ वर्षांनंतर गावातील शेती पाण्याखाली येणार असल्यामळे शेती हिरवी गार होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते, या विकासाचे किमयागार अर्थात आमदार किसन कथोरे च आहेत.

मनसेच्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत दाखल

मुंबई : मनसेच्या मोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कधीकाळी मनसेचा गड किल्ला असलेले नाशिक पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या पक्षाच्या मोर्चासाठी रवाना झाले आहेत. संपूर्ण उत्तर महाराष्टातून कार्यकर्ते नाशिकला येऊन मग मुंबईकडे रवाना झाले. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. मुंबईतील मनसेच्या मोर्चासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल होण्याची शक्यता आहे. नाशिकमधूनही मनसे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. नाशिकच्या घोटीमधून ग्रामीण भागातले कार्यकर्ते रवाना झाले. उत्तर महाराष्ट्रातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईकडे जोमानं निघाले आहेत. सकाळी निघताना पाय भाजल्यानं गंभीर जखमी अवस्थेत असलेला रमेश कारले तशाच अवस्थेत मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनसेकडून मुंबईत आज भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मोर्चाचं नियोजन करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मनसे नेत्यांची तयारी सुरु होती. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी मुंबईत मनसे भव्य मोर्चा काढत आहे. हा मोर्चा गिरगावपासून आझाद मैदानाप...

विद्यार्थ्यांनो आपला मोबाइल आपला सर्वात मोठा शत्रु, परीक्षा काळात मोबाईल दूर ठेवा-अरविंद जगताप

इमेज
जीवनदीप महाविद्यालय गोवेली वखर्डी येथे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन संपन्न गोवेली : जीवनदीप महाविद्यालय गोवेली मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला.जीवनदीपमधील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून आपल्या विभागाचे महत्व पटवून देणारे प्रदर्शनाचे आयोजन पोस्टर, टाकाऊ मधून टिकाऊ आदी वस्तूचे प्रदर्शन केले होत. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रयीन संस्कृती अनुभवायला मिळाली असे प्रमुख मान्यवरांचे म्हणणे आहे तर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रयीन खाद्य पदार्थांचे विविध स्टॉल उभारले होते.महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ही आजच्या तरुणांमध्ये कुठेतरी कमी होताना दिसते परंतु जीवनदीपमधील विद्यार्थी आपली मराठमोली संस्कृती जमण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचे या निसर्गरम्य वातावरणातून अनुभवायला मिळाले असे एकनाथ देसले यांनी मत व्यक्त केले तर शैक्षणिक दृष्टया नाहीत तर क्रीडा,कला क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विविध क्षेत्रात राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या विद्याथ्यांचा, प्राध्यापकांचा तसेच परिसरातील नामवंत व्यक्तींना विशेष सन्मान...