शेती सिचन योजना लघु पाटबंधारे विभागाकडून मंजूरी
शहापूर तालुक्यातील शिरगाव येथे दोन तप प्रतीक्षा केल्यानंतर आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने जांभ्या च्या धरणातील पाणी शेती सीचनासाठी उपलब्ध करून देणारी शेती सिचन योजना लघु पाटबंधारे विभागाकडून मंजूर केली होती. सदर योजनेच्या कामाचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे व आमदार दौलत दरोडा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तब्बल २४ वर्षांनंतर गावातील शेती पाण्याखाली येणार असल्यामळे शेती हिरवी गार होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले होते, या विकासाचे किमयागार अर्थात आमदार किसन कथोरे च आहेत.