विद्यार्थ्यांनो आपला मोबाइल आपला सर्वात मोठा शत्रु, परीक्षा काळात मोबाईल दूर ठेवा-अरविंद जगताप
जीवनदीप महाविद्यालय गोवेली वखर्डी येथे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन संपन्न
गोवेली : जीवनदीप महाविद्यालय गोवेली मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा संपन्न झाला.जीवनदीपमधील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून आपल्या विभागाचे महत्व पटवून देणारे प्रदर्शनाचे आयोजन पोस्टर, टाकाऊ मधून टिकाऊ आदी वस्तूचे प्रदर्शन केले होत. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रयीन संस्कृती अनुभवायला मिळाली असे प्रमुख मान्यवरांचे म्हणणे आहे तर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रयीन खाद्य पदार्थांचे विविध स्टॉल उभारले होते.महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ही आजच्या तरुणांमध्ये कुठेतरी कमी होताना दिसते परंतु जीवनदीपमधील विद्यार्थी आपली मराठमोली संस्कृती जमण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचे या निसर्गरम्य वातावरणातून अनुभवायला मिळाले असे एकनाथ देसले यांनी मत व्यक्त केले तर शैक्षणिक दृष्टया नाहीत तर क्रीडा,कला क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विविध क्षेत्रात राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्या विद्याथ्यांचा, प्राध्यापकांचा तसेच परिसरातील नामवंत व्यक्तींना विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थी हा कलावंत असतो फक्त त्या कलेला प्रोत्साहन देऊन बाहेर काढणे आणि त्यांच्या कलेतून त्यांना स्वत:चे व्यासपीठ मिळावं यासाठी कार्यक्रमाला विशेष उपस्थितीती असलेल्या लावणी क्वीन विजया पालव यांनी विद्यार्थ्यांना लावणी काय आहे आणि तिच्याकडे आजच्या स्थितीत बघण्याचा दृष्टिकोन या विषयी मार्गदर्शन करून ठमला जाऊद्या ना घरी, आता वाजले की बाराठ ही लावणी त्यांनी सादर करून त्यांच्या या लावणीतून कार्यक्रमाची जणू नवीन रंग चढला. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नवनवीन कला बाहेर पडू लागल्या. विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या कामगिरीचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी धनराज डांगे यांनी विद्यार्थी गटनिर्मितीतून स्वयंसेवक तयार केले होते तर या कार्यक्रमाप्रसंगी एम. एस कुहाडे,बालाजी पांढरे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक), यशवंत दळवी (उपसभापती कल्याण प.स), रमेश बांगर (सदस्य कल्याण प.स)चंदू बोस्टे सर(अध्यक्ष भाजपा कल्याण ग्रामीण), भगवान शिरोशे(अध्यक्ष आधार अपंग संस्था), संस्थेच अध्यक्ष रवींद्र घोडविंदे , संचालिका स्मिता घोडविंदे, शांताराम भोईर संचालक, प्रशांत घोडविंदे,महाविद्यालयाचे प्राचार्य के.बी.कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य प्रकाश रोहणे, आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. मराठमोली गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
खर्डी : पेसबुकव्हाट्सएपवर येणारे बदाम मुलीच्या आरोग्यास घातक असतात तर खरे बदाम बुद्धिला चांगले असतात याकरिता विद्यार्थ्यांनो आपला मोबाइल आपला सर्वात मोठा शत्रु असून परीक्षा काळात मोबाईल दूर ठेवा त्यामुळे तुम्हाला हमखास यश | मिळेल' असे आवाहन चित्रपट कथालेखक, गीतकार,निर्माते | अरविंद जगताप यानी खर्डी येथील जीवनदीप शैक्षणिक | संस्थेच्या महाविद्यालयाच्या | वार्षिक पारितोषिक वितरण | समारंभ निमित्त आयोजीत | कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना | केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे,गायक अमोल घोड़के,माजीआमदार पांडुरंग बरोरा, समाजसेवक पप्पू | मिश्रा,जिप सदस्य विठ्ठल | भगत,पोलीस पाटिल शाम | परदेशी,सुनील लकडे आदि | मान्यवर उपस्थित होते. | सावित्रीबाई फुले यांचा डीपी | विद्यार्थिनीनी आपल्या मोबाईलवर | | महिन्यात किमान दोन वेळा ठेवावा | | कारण त्यांच्या मुळे आज तुम्हाला | शिक्षण मिळत आहे.ग्रामीण | भागातील महिलांना दूरवरुन पाणी आणण्याचे कष्ट कमी झाले यासाठी शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे तरच शिकण्याला अर्थ असल्याचे यावेळी अरविंद जगताप यानी सांगितले.येथील विद्यार्थ्याची शैक्षणिक अडचण लक्षात घेऊन,जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविन्द्र घोडविंदे यानी,गेल्या ११वर्षापूर्वी २०० विद्यार्थ्या सहित सुरु केलेल्या या महाविद्यालयात आज २ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.ह्या महाविद्यालयामुळे खर्डी विभागातील गोर-गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले.यावेळी सुर नाव ध्यास नवा या कार्यक्रम मातील फाइनलिस्ट अमोल घोड़के याने गाणे गाउन उपस्थितांची मने जिंकली. शहापूर तालुक्यातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तिचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल दळखणचे सरपंच भगवान मोकाशी,परिसरातील बेरोजगारी कमी करण्यासाठी खर्डीत एमआयडीसी आणणाऱ्या" आदर्श उद्योजक स्नेहल शहा, प्रशासकीय क्षेत्रात खर्डीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख, प्रगतिशील शेतकरी शिवरामसांडे, महिलांना स्वयंसंरक्षण धड़े देणाऱ्या माधुरी तारमळे,पत्रकार क्षेत्रात योगेश हजारे या मान्यवरांना जीवनदीप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.,यश संपादन केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास रेल्वेप्रवाशी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव,गणेश राउत,बबन शेलवले,प्रशांत खर्डीकरविनायक आपटे, भाग्यश्री डिगे, यांच्यासह अनेक मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कैलास कळकटे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दीप्ती मोरे व प्रा नवनाथ गायकर यांनी केले.