संवाद परंपरेचा परिवर्तनाशी अनेक महिलांनी घेतला उपक्रमात सहभाग
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील जि. प.शाळा निघू येथे दि.२४ जानेवारी २०२० रोजी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त पालक सभा व विचारकुंकू या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात हा समारंभ संपन्न झाला. गावातील माता पालकांशी संवाद साधता यावा व आपल्या मनीचे हितगुज त्यांच्याशी करता यावे या उद्देशानेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला माताभगिनींची उपस्थित उत्तम होती. सदर ठिकाणी विविध विषयांवर माहिती सांगण्यात आली. __ स्त्री जीवन ते किशोरवयीन बालिका, मासिक पाळी, तसेच स्त्री पुरूष समानता ते फोक्सो कायदा, लैंगिक शिक्षण या सर्वच विषयांवर चर्चा झाली. त्यावर आधारित पीपीटी ही दाखविण्यात आली. माता भगिनींनी अगदी मोकळे पणाने आमच्याशी संवाद साधला असल्याचे शिक्षीका अनिता साळवे यांनी सांगितले केले. सदर कार्यक्रमास पं.स.कल्याण समावेशित शिक्षण विषय तज्ञ वैशाली शिद , गाठाळ | ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका आशा जवरे ,पो.सु.बाळे च्या सहशिक्षिका प्राजक्ता पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. गावातील सर्वात ज्येष्ठ महिला आजी ज्या विधवा आहेत आणि वैशाली शिंदे ज्या शेख आहेत अशा धर्म,रूढी व परंपरांना मोडीत काढून परिवर्तनाचे विचारबुवू म्हणजेच वाण म्हणून महिलांचे खरे रक्षक असलेल्या संविधान उद्देशिकेची प्रत शाळेच्या शिक्षिका अनिता साळवे यांच्या तर्फे देण्यात आली. शालेय व्यवस्थापन समिती महिला सदस्यांना ही | देण्यात आली. त्यानंतर या | महिलांतर्षे कार्यक्रमास | उपस्थित गावातील सर्व | महिलांना हळदीjनु, तीळगुळ, फुल, फळ, स्टीलचे ताट, चहा, नाश्ता वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख | आकर्षण ठरले महिलांचे मनोरंजक खेळ. अगदीअगदी | रोजच्या कामाचा ताण विसरून एक दिवस स्वत:साठी दिल्याने खुप समाधान ही महिलांच्या | चेहऱ्यावर दिसून आला. सर्वांनी | उस्फूर्त सहभाग दर्शविला होता. अनोखा परंतु मुल्य जपणारा दृष्टीकोण यावेळी देण्यात आला. अशा प्रकारे आनंद आणि ज्ञान यांची सांगड घालत परंपरेचा परिवर्तनाशी सुसंवाद साधण्याची एक संधी मिळाली असल्याचे मत उपक्रम आयोजक शाळेच्या शिक्षिका अनिता साळवे यांनी बोलताना व्यक्त केले.