२४ तास सुरु....
देशात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तू मिळणार की नाहीत, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यामुळेच काहीही झाले तरी जीवनावश्यक वस्तूंची विक्री बंद केली जाणार नाही, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. तरीही नागरिक ऐकायला तयार नाहीत. त्यातूनच किराणा सामान खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये दररोज मोठी गर्दी होत आहेकरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही गर्दी कायम राहिल्यास हा आजार आणखी भीषण रूप धारण करू शकतोही बाब लक्षात घेऊनच राज्य सरकारने अत्यंत मोठे पाऊल उचलले आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी ही सर्वच दुकाने २४ तास खुली ठेवण्याची परवानगी आज राज्य सरकारने दिली आहे. हा सर्वांसाठीच मोठा दिलासा मानला जात आहे. राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.