मुरबाड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती लॉकडाऊन! चौथ्या दिवशीही बाजारपेठेत शुकशुकाट
मुरबाड : राज्यातील वाढत्या कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुरबाड तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने बाहेरील व्यक्ती व फेरीवाले यांना गाव बंदी केली आहे. याचा आदर्श मुरबाड तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीने आपले मुख्य रस्त्यावर लाकडे किंवा इतर वस्तू टाकून सर्वच सर्वच गावे लॉक डाऊन केलेले चित्र सर्वत्र दिसून येत आहे त्यामुळे राज्य सरकारने जमावबंदी आदेश व तसेच संचारबंदी लागू केल्याने त्या धर्तीवर सर्वच ग्रामपंचायतीने आपल्या परिसरात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे." "मुरबाड तालुक्यात पोलीस खाते, आरोग्य यंत्रणा, मुरबाड तहसील कार्यालय यामार्फत विविध स्तरावर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तसेच पोलीस पाटील, ग्रामस्थ, व तरुण यांनी आप- आपल्या गावाच्या वेशीवर कोरोना संदर्भात बाहेरील व्यक्ती व फेरीवाले यांना गाव बंदीचा बॅनर लावण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच मुरबाड तालुक्यात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वच ग्रामपंचायती पुढे सरसावल्या आहेत. तसेच मुरबाड शहर व ग्रामीण भागात जमावबंदी आदेश व संचारबंदी लागू केल्याने मुरबाड सर्वच बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.