अंबरनाथ मध्ये आजपासूनच संचारबंदी
अत्यावश्कय सेवा वगळता तीन दिवस अंबरनाथ राहणार बंदव्यापारी संघटना आणि रिक्षा संघटनेचा निर्णय
अंबरनाथ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढूनये यासाठी तीन दिवस शहरात बंद पाळण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा निर्णय घेतला असून त्याची अमलबजावणी नागरिकांनी स्वत:हून सुरु केली आहे. शहरात आज सकाळपासूनच संचारबंदी दिसत आहे. शहरातील व्यापारी आणि रिक्षा संघटनेच्या बैठकीत प्रशासनाने अंबरनाथ शहर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांनी देखील विनाकारण शहरात फिरू नये असे आवाहन केले आहे. __अंबरनाथ पालिकेच्या सभागृहात कोरोनावरील उपाय या जा- आखण्यासाठीनगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, वाहतूक निरीक्षक सुनील जाधव यांचे सह शहरातील व्यापारी संघटना व रिक्षा संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
अनावश्यक दुकाने सुरु ठेवुन नाहक गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवण्याचे तर रिक्षा संघटनेने देखील तिन दिवस रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षा मधुन संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत पूर्व भागात पाच आणि पश्चिम भागात पाच रिक्षा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात परिस्थिती भयानक होण्या आधीच असे कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे मत नगराध्यक्ष मनिषा वाळेकर यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे एक प्रकारचे युद्ध असून ते सर्वानी एकत्र येऊन जिंकण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आपण सर्वानी हा लढा देऊ या असे आवाहन नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी केले. संपूर्ण देश अडचणीत सापडला असल्याने आपण सर्वानी आपले कर्तव्य म्हणून त्यात सहभागी होऊ या असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. नैसर्गिक अथवा कोणतीही आपत्ती आली कि अंबरनाथ कर सतत पुढे असतात त्या प्रमाणेच याही आपत्तीमध्ये पुढे राहू या असे अरविंद वाळेकर यांनी सांगितले.
शहराच्या सुरक्षेसाठी तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे अरविंद वाळेकर यांनी स्पष्ट केले. कोरोना हा विषाणू लहान मोठा, गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव पळत नाही तो सर्वांवर आक्रमण करीत आहे. हे आक्रमण रोखण्यासाठी न घाबरता सर्वानी काळजी घेण्याची आवश्यकता सहायक पोलीस आयुक्त विनायक नराळे यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोना हा विषाणू चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात अधिक आक्रमक होतोत्यासाठी त्याला त्यापूर्वीच अंबरनाथ शहरात प्रवेशापासून रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेतउपाययोजना करण्यासाठी वरचेवर बैठक घेण्यात येत आहे. आणि या कार्यात शहरातील सर्वच घटक चांगला प्रतिसाद देत असल्याचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. येणारे दोन आठवडे अत्यंत महत्वाचे असल्याने तीन दिवस बंद पाळल्यास यावर नियंत्रण करणे सोपे जाईल असा विश्वासही देविदास पवार यांनी व्यक्त केला. याच बैठकीत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष खानजी धलसरचिटणीस हसमुख हरिया आणि रिक्षा चालक मालक संघटनेचे निवृत्ती कुचीकरामदास पाटील यांनी या लढ्यात आम्ही प्रशासनाबरोबर असून तीन दिवस बंद पाळू असे जाहीर केले. या निर्णयाची अमलबजावणी आज सकाळपासून सुरु झाली असून अंबरनाथ शहरात संचार बंदी लागू झाल्यासारखे दिसत आहे.