आनंद जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव आरूटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

मुरबाड : जून्नर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व हिरवे बुद्रूक आनंद जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव आरूटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. ___ आरूटे हे जुन्नर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते असले तरी ठाणे जिल्ह्यातील कल्याण या शहरात त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कल्याण शहरातील भाजपाचे जेष्ठ नेते ठाणे-पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाज संघाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी शाल श्रीफळ देऊन समाजाच्या व पक्षाच्या वतीने शुभेच्या दिल्या. ___हा सोहळा १६ फेब्रुवारी २०२० रोजी डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. यावेळी खासदार हेमंत पाटील,दक्षिण नांदेड आमदार मोहन हंबर्डे, मुंबईचे कुलगुरू डॉ.बलदेव सिंह यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. हा पुरस्कार नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषद या संस्थने च्या वतीने देण्यात आला.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...