वासिंद रेल्वेस्थानकाचे जे एस डब्लू, रेल्वे व कलाशिक्षक व विद्यार्थ्यांनी केले सुशोभीकरण


शहापुर । प्रतिनिधी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वासिंद व परिसरातील शाळा, जेएसडब्ल्यू फाउंडेशन व रेल्वे प्रशासन यांनी एकत्रितपणे वासिंदला 'स्वच्छ व सुंदर रेल्वे स्थानक' उपक्रम राबविला. ता.१६ व १७ मार्च असे दोन दिवस अथक परिश्रम घेऊन संपूर्ण वासिंद स्थानकाच्या भीती सामाजिक, शैक्षणिक संदेश देणाऱ्या कलाकृती, आकर्षक रंगसंगतीने सुशोभित केल्याने रेल्वे स्टेशनचे संपूर्ण रुपच पालटून गेले आहे. यासाठी सरस्वती विद्यालयाचे शिक्षक सुनिल काठोळे, दिनेश भोईरराहुल निक्ते, शारदा इंग्लिश स्कूलचे, विलास शेलार, न्यू इंग्लिश स्कूल खातिवलीचे निलेश रोठे, शेई विभाग हायस्कूलचेशंभुराव सोनावणे, टहारपूर हायस्कूलचे, जगन्नाथ कुंवरमनोज पाटील, जिंदल विद्यामंदिरचे सुधीर थोरात या कला शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. अमूर्त कला, वारली पेंटिंग, इलस्ट्रेशनलोगो आर्ट, त्रीमीती चित्र याद्वारे, सामाजिक व शैक्षणिक विषयांवरील संबोधातून सौंदर्यपूर्ण शहर, शांतीपूर्ण शहर, डीजीटल शहर, आनंदी शहर अशा अनेक संकल्पनांचा कलाविष्कार रेल्वेस्थानकाच्या भिंतीवर कलाकारांनी साकारला आहे. यासाठी जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या विद्या गोरक्षकर व रेल्वे प्रशासन अधिकारी यांनी सहकार्य केले. याउपक्रमाने सार्वजनिक स्वच्छतेची जागृती व प्रेरणा मिळत असल्याची भावना प्रवाशी व नागरिक व्यक्त करीत आहेत.



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...