मच्छी मार्केट मध्ये जत्राः कोरोनाचा संसर्ग टाळण्याकडे बदलापूरकरांचे दुर्लक्ष
बदलापूर : जगभर कोरोना चा विषय गाजत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी सातत्याने या बाबत पाठपुरावा घेत आहेत. असे असताना बदलापूर मध्ये आज मात्र वेगळेच चित्र पहावयास मिळाले. बदलापूर पालिका कार्यालयाला लागून असलेल्या उड्डाणपुलाखाली पूर्वेला असलेल्या मच्छि आणि मटण मार्केटमध्ये बदलापुरकरांनी तुडुंब गर्दी केली होती. ___वर्क फ्रॉम होम आणि त्यात शुक्रवार असल्याने खव्वयांनी आपला मोर्चा या मच्छीमार्केटकडे वळवला होता. बदलापूर शहरातील इतर दुकाने आणि हात गाड्या बंद करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी अधिकारी रस्त्यावर उतरून पाठपुरावा करत होते. मात्र नगरपालिका मुख्यालयाला लागूनच असलेले मच्छी मार्केट बंद करण्याचे धारिष्टय नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखवलं नाही. त्यामुळे या मच्छी मार्केटमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आल्यास संसर्ग होणार नाही का ? असा संतप्त सवाल नगरपालिकेच्या विनंतीला मान देऊन दुकान बंद ठेवणारे व्यापारी खाजगीत विचारत आहेत. ___बदलापूर पालिका प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी बदलापुरातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन व्यापाऱ्यांनी स्वत:हन तीन दिवस दकाने बंद ठेवन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केलं होतं. मात्र असे असताना मच्छी मार्केट बंद करण्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे नगरपालिका प्रशासन खरोखरचकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गंभीर आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. ____ बदलापूर शहरात अन्यत्र आज वर्दळ कमी जाणवली. बदलापुर पूर्व परिसरात असलेली औद्योगिक वसाहत, बहतांश गॅरेज, सर्विस सेंटर, आदी गोष्टी या शुक्रवारी बंद असल्याने त्याचाही परिणाम जाणवला.