कोरोनामुळे टिटवाळा कडकडीत बंद

२० ते ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा व्यापारी संघटनेचा निर्णय



टिटवाळा : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. या संसर्गामुळे गेली पंधरा दिवसापासून महाराष्ट्रातील जनजिवन देखील विस्कलीत झाले आहे. राज्य शासन हा संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. संपर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. शासकीय यंत्रणा लोकांना बाहेर न पडने व जमावबंदीचे आव्हान केले आहे. या धर्तीवर टिटवाळा येथील व्यापारी संघटनेने बाजारपेठ व रिक्षा संघटनेने रिक्षा वाहतक बंद करण्याचा निर्णय २० ते ३१ तारखेपर्यंत घेतला आहे. याला सर्वच स्थरातन चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संपर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवून ठेवला आहे. आपल्या देशात देखील लागण घालेली आहे महाराष्ट्र राज्यात याचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र सरकार यावर प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाय योजना राबवताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसंह संपूर्ण शासकीय यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे. अनेक आवाहने केली जात आहेत. कारण नसतांना लोकांनी घराबाहेर पडू नका. सर्व शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, जत्रा, आठवडा बाजार व इतर जमावाचे कार्यक्रम बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. याच आदेशाच्या धर्तीवर व कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी टिटवाळा येथील व्यापारी संघटनेने व रिक्षा युनियन यांनी निर्णय घेत शुक्रवारपासून २० ते मंगळवार ३१ तारखेपर्यंत टिटवाळा बाजारपेठ तसेच रिक्षा वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तशा प्रकारचे आव्हान व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संतोष भोईर व रिक्षा युनियनचे अध्यक्ष बाळा भोईर यांनी नागरिक व व्यापारी यांना केले आहे. तसेच रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षातून फक्त तीनच प्रवाशांची वाहतूक करावी. ज्यादा प्रवासी वाहतूक केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आव्हान रिक्षा युनियनच्या वतीने करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत येथील मुख्य बाजारपेठ शुक्रवारी पूर्णपणे बंद दिसून आली तसेच, येथील गणपती मंदिर ते टिटवाळा रेल्वेस्थानक या मुख्य रस्त्यावर रिक्षांची वाहतुक कमी प्रमाणात दिसून येते. या बंदला टिटवाळ्यातील जनतेने उत्तम प्रकारचा प्रतिसाद देत कोरोनावर मात करण्यासाठीजण काय कंबराच कसल्या असल्याचे चित्र येथे दिसन येत आहे. संपूर्ण टिटवाळा बाजारपेठ बंद असून देखील येथील मोहीनी वाईन शॉप बिनधास्तपणे उघडे ठेऊन दारूची विक्री करत आहे. हे वाईन शॉप उघडे राहिल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तळीरामांची गर्दी दिसन आली. या वाईन शॉप वर कणाचे अंकश नाही का असा सवाल येथील जाणकार करत आहेत.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...