सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदराव यांच्या उपोषणाला यश राज्यशासनाचा ठेकेदाराला दणका
मुरबाड : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या विरोधात गेल्या काही महिन्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदराव व त्यांचे सहकारी विष्णू चौधरी,अँड रत्नाकर आलम , कचरू म्हाडसे बाळकृष्ण हरड , अन्य नागरिक व पत्रकार मित्र हे मुरबाड म्हसा रस्त्यालगत उपोषणास बसले होते.त्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास.महामंडळाच्या अधिकाऱ्यानी तात्काळ मुरबाड म्हसा रोड येथे उपोषणकर्ते हिंदुराव यांची भेट घेऊन सदर उपोषण स्थगित करण्याचे लेखी आश्वासन दिले असता आश्वासन पूर्ण न केल्याने हिंदुराव यांनी पुन्हा एकदा १३/२ /२०२० रोजी आजाद मैदान येथे बेमुदत उपोषण करण्याचे म.रा.र.वि.मंडळास दिले व त्याची दखल घेत मुरबाड म्हसा रस्त्यावरील तोंडली गाव लगत तडे गेलेले निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम उखडून काढण्यात आले त्यामुळे राज्यातील पहिल्याच निकृष्ट दर्जाच्या तडे पडलेल्या रस्त्याच्या कामाचे जेसीबीच्या सहाय्याने काँक्रिटीकरण उखडून नव्याने रस्त्याचे काम सुरू केल्याने रमेश हिंदुराव सर व त्यांच्या सहकाऱ्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.