कोरोना व्हायरस : लस आणि औषधाच्या शोधाविषयी 'गुड न्यूज'
मुंबई : कोरोनाव्हायरस विषयी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. ती आहे लस बनवण्याच्या संशोधनाविषयी. दैनिक जागरणने आपल्या पहिल्या पेजवर एक बातमी छापली आहे. कोरोनाव्हायरस विषयी ही एक सकारात्मक बातमी आहे. कोरोना व्हायरस आपली जेनेटिक रचना वेगाने बदलत नाहीये आणि कोरोनाची लस बनवण्याचं काम यामुळे सोप होण्याची शक्यता आहे. इतर इन्फ्लुइंझा व्हायरस आपली रचना सतत वेगाने बदलत असतात. पण कोरोना व्हायरस आपली जेनेटिक रचना बदलताना दिसत नाहीय. चार महिने चीनच्या वुहानमध्ये कोरोना व्हायरसची जेनेटिक रचना जशी होती. ती अजुनही जवळ जवळ तशीच आहे. म्हणजेच चीन आणि भारतातील कोरोना बाधित व्यक्तीमधील कोरोना व्हायरसची जेनेटिक रचना तशीच दिसून आली आहे. आता कोरोना व्हायरसविषयीच्या सर्वबाबींवर शास्त्रीय दृष्टीकोनातून उपाय काढण्यावर, भारतातील आयसीएमआर म्हणजे भारतीय चिकित्सा संशोधन परिषद प्रयत्न करीत आहे. तिथल्या शास्त्रज्ञांनी असे म्हटलंय, कोरोना व्हायरस चीनमध्ये होता आणि इतर लोकांच्या माध्यमातून भारतात आलेला आहे. आता वेगवेगळ्या प्रांतात, देशात त्याची जी जेनेटिक रचना आहे, ती इतर देश आणि प्रांतात जवळजवळ सारखी आहे. एका माणसाच्या शरीरातून दुसऱ्या माणसाच्या शरीरात जेव्हा एखादा व्हायरस जातो, त्याला म्युटेशन म्हणतात. म्यूटेशनच्या प्रक्रियेत व्हायरसचं स्वरूप वेगाने बदलत असतं. त्याप्रमाणे त्या व्हायरसच्या लसमध्येही बदल करत रहावं लागतं. दुसरी बाब म्हणजे त्यावर शोधलेलं औषधंही त्यावर दीर्घकालीन प्रभावी काम करत नाही, त्यातही व्हायरस बदलेल तसा बदल करणे आवश्यक असते. मागच्या आठवड्यात आयसीएमआरचे शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं होतं, भारतात जो कोरोना व्हायरस आहे, त्याची आणि वुहान शहरातील कोरोना व्हायरसची रचना ९९.९९म सारखीच आहे. दुसरीकडे याचा फायदा असा होणार आहे, या व्हायरसची जेव्हा लस बनवली जाईल, आणि जेव्हा कोरोना बाधित रुग्णांसाठी औषधही शोधले जाईल, तर ते खूप जास्त वेळपर्यंत प्रभावी काम करेलसतत बदल करण्याचं काम कदाचित करावं लागणार नाहीयामुळे निश्चितच वेळ वाचण्याची शक्यता आहे. आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांचा असे म्हणणे आहेया व्हायरसच्या बाबतीतही हे फार घाईच वक्तव्य होईल की ही रचना पुढे कायम राहिलआणि या व्हायरसची जेनेटिक रचना यापुढे कधीही बदलणार नाही. शास्त्रज्ञ म्हणून आम्ही कोरोना व्हायरसच्या रचनेत काही बदल होतोय का यावर अजूनही आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि फार काळानंतर निरीक्षण केल्यानंतरच आम्हाला म्हणता येईल की हा व्हायरसइतर व्हायरसपेक्षा वेगाने आपली रचना बदलत नाहीये.