मुंबई-नाशिक महामार्गावरील हॉटेल व ढाबे ३१ मार्च पर्यंत बंद

खर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा,खर्डी,आटगाव,आसनगाववाशिंद, येथील हॉटेल्स व ढाबे देखील ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले असून त्या बाबतची नोटीस संबंधितांना दिल्या आहेत तसेच तालुक्यात खर्डी,कसाराशहापूर,अघई, सापगाव, डोळखाब, येथील आठवडे बाजार प्रमुख बाजारपेठा देखील खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील खाजगी जीप वाहतूक,एस. टीमहामंडळाची बस सेवा बंद करावी व न्यायालय, तहसील कार्यालय, भूमीअभिलेख, पंचायत समिती कार्यालय, दस्त नोंदणी(रजिस्टर)कार्यालय, आदिवासी विकास प्रकल्प,आदिवासी विकास महामंडळ, या ठिकाणी देखील गर्दी होऊ नये म्हणून या कार्यालयांना सुट्टी देऊन फक्त अत्यआवश्यक सेवा म्हणून ज्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल त्यांनाच कामावर बोलावणे यामुळे भविष्यातील कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव टाळता येईल. कोरोनाच्या बाबतीत खबरदारी म्हणून सर्व प्राशकीय यंत्रणा,आरोग्य विभाग, योग्य ती काळजी घेत आहेत तसेच होटेल्स,ढाबे,प्रमुख बाजारपेठा, आठवडे बाजार, अशी गर्दीची ठिकाणे ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत तसेच जनतेने देखील अफवांवर विश्वास न ठेवता खबरदारी साठी आवश्यकता असेल तरच घराबाहेर निघावं, तालुक्यातील प्रशासकीय यंत्रनेला सहकार्य करावे. ___- नीलिमा सूर्यवंशी (तहसीलदार, शहापूर


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...