ग्रामीण भागात संचार बंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आहे. या संचार बंदीचा वाडा : देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता राज्य सरकारने काळ पासून राज्यात संचारबंदी लागू केली काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेने एक पाऊल पुढे टाकत गावाच्या वेशीवर गाव प्रवेश बंदीचे फलक लावून आपण देशा बित आहात हे दाखवून दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात व राज्यात लावलेल्या संचार बंदीचा ग्रामीण भागात स्वागत व पालन होतांना दिसत आहे. मोहोट्याचापाडा, उसर, मेट, मसारणे, गांधरे, मोज, कवठेपाडा आदी गावांनी आपल्या गावच्या वेशीवरच गाव प्रवेश बंदीचे फलक लावुन संचार बंदीचे स्वागत व पालन केलेले दिसत आहे. ___ कोरोना नावाच्या संकटाने संपुर्ण जगाला हैराण केले आहे. या संकटाचा सामना धिराने करण्याची आज गरज आहे. आपण घाबरून न जाता घरातच बसून या संकटावर मात करु शकतो. मीच माझा रक्षक, मी घरीच थांबलो आहे! आपण ही घरीच थांबा, ही लढाई आपण घरी बसुन जिंकू शकतो या शासनाच्या आव्हानांना प्रतिसाद द्यावा यातच आपले व देशाचे हीत आहे हे लक्षात घ्यायला हवे. आम्ही गावाच्या वेशीवरच गाव प्रवेश बंदीचे फलक लावले आहेत ते फक्त देश हीत डोळयासमोर ठेवूनच. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मायेच्या व नात्याच्या माणसांना काही दिवस कठोर मनाने अंतर देणार आहोत. - सतिश भोईर, ग्रामस्थ मोहोट्याचापाडा, उसर


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...