लवकरच मरणार कोरोनाव्हायरस,

नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी केली भविष्यवाणी


न्यूयॉर्क : कोरोनामुळं साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २१ हजार लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी आता एक आनंदाची बातमी आली आहे. नोबेल पारितोषिक विजेते आणि स्टॅनफोर्ड बायोफिझिक तज्ज्ञ मायकल लेव्हिट यांनी कोरोनाव्हायरस लवकरच मरेल, अशी भविष्यवाणी केली आहे. मायकल यांच्या मते, जगातील कोरोना विषाणूचा सर्वात वाईट टप्पा आधीच संपला आहे. कोरोनाच्या मृतांची संख्या कमी झाली आहे. आतापर्यंत २१ हजार लोकांचा मृत्यू झाला असला तरी १ लाखांहून अधिक लोक निरोगीही झाले आहेत. त्यामुळं कोरोनावर मात करू शकतो, अशी परिस्थती निर्माण झाली आहे. लॉस एंजेलिस टाईम्सशी केलेल्या संभाषणात मायकल यांनी, 'परिस्थिती जितकी भीतीदायक वाटत आहे तेवढी नाही आहे. चीनमध्ये ७८ हजार लोक निरोगी झाले आहे. म्हणजे कोरोना विषाणू लवकरच मरू शकतो, यावर विश्वास आहे', असे सांगितले. अनेक आरोग्य तज्ञांचा असा दावा केला होता की, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी चीनला बराच काळ लागेल, मात्र गेल्या महिन्याभरात चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. लेव्हिट यांनी फेब्रुवारी महिन्यातील आपल्या एका लेखात, हळुहळु कोरोनाची नवीन प्रकरणे कमी होतील अशी भविष्यवाणी केली होती. आता हे खरे होताना दिसत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पुढील आठवड्यात आणखी कमी होऊ शकेल. लेव्हिट यांच्या अंदाजानुसार मृतांची संख्या ५ टकक्याने कमी होईल. यावर लॉक डाऊन हा उत्तम उपाय आहेकारण दोन महिन्यांच्या लॉक डाउननंतर कोरोना विषाणूचा सर्वाधिक त्रास होणारा हुबेई प्रांतात गेल्या काही दिवसात एकही कोरोना रुग्णाची नोंद नाही. लव्हिट यांच्या या भविष्यवाणीनंतर जगभरातील कोट्यावधी लोकांच्या चिंता मिटल्या आहेत. लेव्हिट यांच्या मते, सामाजिक अंतर ठेवणे सर्वात महत्वाचे आहे, विशेषतः हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे की मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी येणार नाहीतयाची काळजी घ्यावी. कारण हा विषाणू इतका भयंकर आहे की बहुतेक लोकांमध्ये त्याच्याशी सामना करण्याची प्रतिकारशक्ती नसते. यास अद्याप महिने लागतील. त्यामुळं मित्रांना भेटण्याची आणि पार्टी करण्याची ही वेळ नाही. कोरोनाचा मृत्यू दर झाला कमी चीनच्या वुहानपासून सुरू झालेल्या विषाणूनचे जगातील तब्बल १७५ देशांना विळखा घातला. प्रत्येक देश कोरोनापासून वाचण्यासाठी उपाययोजना करत आहे. यामुळं सध्या जवळजवळ संपर्ण जग लॉक डाऊन झाले आहे. जगभरात कोरोनामुळे २१ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी जगभरात १ लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहे. यात चीनमध्ये ७४ हजार ०५१ रुग्ण बरे झाले आहेत.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...