मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई : राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे. यामुळे एकीकडे उन्हाळा आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीट असे चित्र निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसात दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. गुरुवार, शुक्रवार मराठवाडा, मध्य महाराष्ट, दक्षिण कोकण या भागांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांश भागांमध्ये तापमानाने काही ठिकाणी ४० अंशाच्या वर पातळी ओलांडली होती. वातावरण बदलामळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता मोठी आहे. विजेच्या गडगडाटासह दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी सांगितले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...