राज्यातील १५ रूग्ण कोरोनामुक्त; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हतबल होत आहे. अशातच भारतातही कोरोना व्हायरस फोफावताना दिसत आहे. भारतात सर्वाधिक कोरोना बाधित हे महाराष्ट्रात आहेत. - हा र राष्ट तिला कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आता शंभरी पार केली आहे. तर चार जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. अशातच राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत एक दिलासादायक गोष्ट राज्यात कोरोनाचे रुग्ण आहे. बरे होत आहेत. आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली. दरम्यान, काल पुण्यात दोन कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. सीएमओने देखल टवीट करत याबाबत माहिती दिली आहे. टवीटमध्ये लिहिलं आहे की, 'आतापर्यंत ३१५६ लोकांचे सॅम्पल्स तपासणीसाठी घेतले असून त्यातील २८६० लोकांचे सॅम्पल्स नेगेटिव्ह आले आहेत. तर १२४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी १५० जणांचे रिपोटर्स येणं अद्याप बाकी आहे. तर आतापर्यंत ४ जणांचा कोरोनामुळए मृत्यू झाला आहे.' पुण्यातील डिस्चार्ज दिलोलं हे दाम्पत्य महाराष्ट्रातील पहिलं कोविड- १९ चे रुग्ण होते. दुबईहून परतलेल्या या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर होळीला (९ मार्च) नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले. इथे १५ ते १६ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. दरम्यान, या दाम्पत्याच्या संपर्कात आल्याने त्यांची मुलगी तसेच त्यांना मुंबईहून पुण्याला सोडणाऱ्या टॅक्सी चालकालाही कोरोनाची लागण झाली होतीदोघांवरही उपचार सुरू आहेतदाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या चाचणीचे नमुने आज तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तर चालकाच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल यायचा आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्याची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. मुंबईतील १२ कोरोनाबाधितांची दुसरी चाचणी निगेटिव्ह मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या १२ कोरोनाबाधितांची दुसरी चाचणी निगेटिव्ह समोर आली आहे. मात्र असं असलं तरी त्यांना पुढील चौदा दिवस ववॉरन्टाईन अर्थात विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...