कोरोनाचा परिणाम : प्रदुषण घटले, मुंबईने घेतला मोकळा श्वास

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरासह महाराष्ट्र ही लॉकडाऊन झाल्याने एक चांगली गोष्ट घडली आहे. कधी नव्हे ती मुंबईसह मुंबई महानगर परिसरातील प्रदूषणात घट झाली आहे. हवेची गुणवत्ता सुधारली आहे. रस्त्यावर धावणाऱ्या लाखो गाड्या आणि कारखान्यांच्या धुरामुळे प्रदूषित झालेल्या मुंबई परिसरातील भागात आता हवेची स्थिती समाधानकारक झाल्याने, प्रदूषण घटल्याचे सांगण्यात येत आहे. मंबईतील हवेचा गणवत्ता निर्देशांक १०० वर आला आहे. पुढच्या २० दिवसात हा निर्देशांक ५० वर येऊन उत्तम होईल असा विश्वास पर्यावरण तज्ज्ञ डॉ. संजय जोशी यांनी व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता ही नेहमीच अतिधोकादायक पातळीवर असते. मात्रगेल्या ३ दिवसांत ही पातळी समाधानकारक झाली आहेकारण लॉडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेली ३ दिवस वाहने खूप कमी झाली आहेत. वर्दळ कमी झाली असून सर्व प्रकारची कामे बंद आहेत. परिणामी हवेची गुणवत्ता सुधारली आहेआजच्या घडीला ऐरोलीतील हवेची गुणवत्ता सर्वात उत्तम आहे. कारण येथील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३८ वर आला आहे. ठाणे आणि मुलुंडचा निर्देशांक ५५ वर आला आहे. म्हणजेच येथील प्रदूषणही खूप कमी झाले आहे. मुंबई, कधी न थांबणारे शहर, वेगवान शहर अशी मुंबईची ओळख. मुंबईत दररोज हजारोच्या संख्येने गाड्या धावतात. अनेक बांधकाम प्रकल्पाचे, पायाभूत सुविधांचे काम सुरू आहे. रस्त्यावरही मोठी गर्दी असते. त्यामुळे मुंबईतील हवा अत्यंत प्रदूषित झाली आहे. मुंबई आणि एमएमआरसाठी प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे. असे असताना गेल्या तीन दिवसांत मात्र हवेची गुणवत्ता सुधारली असून प्रदूषण कमी झाले आहे.



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...