कल्याण तालुका पूर्णपणे लॉक डाऊन

कोरोनाच्या भीतीने कल्याण तालुक्यातील ६८ गावात ग्रामस्थांनी गावाचे प्रवेशद्वार केले बंद



कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व राज्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत कल्याण तालुक्यातील मांजी गावात गावाचा मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आला. जोवर स्थिती पूर्ववत होत नाही तोवर प्रवेश द्वार बंद ठेवण्यात येणार आहे प्रवेशद्वार बंद करण्यासाठी मांजर्ली गावचे पोलीस पाटील तुळशीराम वारे व गावकरी यांच्या सहाय्याने प्रवेशद्वार बंद करण्यात आला. गावातील कोणत्याही नागरिकांनी गावाच्या बाहेर पडू नये व कोणत्याही सरकारी आदेशाचे तंतोतंत पालन करा असे आव्हान पोलीस पाटील यांनी गावकऱ्यांना केले.



फेरीवाले किंवा अनोळखी व्यक्तीस मानिवली गावात येण्यास बंदी गीता गायकर : संपूर्ण जगात कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने फैलावत आहे.याच धर्तीवर खबरदारी उपाय म्हणून मानिवली व मानिवली पाड्याने खारी चा वाटा उचलला आहे.कल्याण तालुक्यातील ही ग्रुप ग्रामपंचायत व औद्योगिक दृष्टया ओळखली जाणारी ह्या ग्रामपंचायतीने आजपासून नवीन संकल्प केला आहे.कोरोना चा नायनाट होत नाही तोपर्यंत गावात कोणीही अनोळखी व्यक्ती किंवा फेरीवाले येणार नाहीत यांची काळजी ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी व गावातील नागरिक करणार असल्याचे दिसून आले. भारतात सध्य स्थितीत कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे.यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.कल्याण ग्रामीण भागाचा विचार केला तर अद्याप ही कोरोनाचा संशयास्पद व्यक्ती आढळून आला नाही.परंतु या ग्रामीण भागातील नागरिक नोकरी धंद्यासाठी कल्याण,ठाणे मुंबई आदी ठिकाणी येत जात असतात व बल्यानी लगत असल्यामुळे अनेक परजाती च्या लोकांचा ही मोठ्या प्रमाणात समावेश होतो आणि मुख्य म्हणजे मोहने ते टिटवाळा व मोहने ते मुरबाड जाण्यासाठी मानिवली गावातूनच रस्ता असल्याने आणि बल्यानी चौकीत पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने सर्व वाहतक ही गावाकडून होत असल्याचे काही दिवसांपासून बघायला मिळत होती. हे रोखण्यासाठी दि-२४मार्च मानिवली व मानिवली पाडा ग्रामपंचायतीने प्रवेश बंदी केली आहे.सर्व सदस्यांनी एकत्र येऊन कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी घेतली आहे.गावात कोणीही अनोळखी व्यक्ती येणार नाही यासाठी गावच्या वेशीवर फलक लावण्यात आले आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने व गावातील सहकार्य कार्यकर्ते ,तरुणांनी उचलेला पाऊण नक्कीच कौतुकास्पद आहे.आणि ते यशस्वी पार पाडण्यासाठी गावात कोणीही फेरीवाले वा अनोळखी व्यक्ती ३१मार्च पर्यंत येणार नाहीत याची खबरदारी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...