अंबरनाथ मध्ये कोरोना सह पाण्यासाठीही लढा

__ अंबरनाथ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झालेली असताना लाखो नागरिक या कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र अंबरनाथ मध्ये नागरिकांना कोरनासह पाण्यासाठीही लढा द्यावा लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आज स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक प्रयत्न करण्यात आले अखेर या लोकप्रतिनिधींनीच महारष्ट औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ येथील वॉल सुरु करून शहराला पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांची असतानाही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून हे काम करण्याची वेळ आली. शहरातील महाविकास आघाडी आक्रमक झाल्याने नागरिकांना आज पाणी मिळाले असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचार बंदीमुळे सर्वच नागरिक घरात बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे किमान घरातील वीज पुरवठा आणि पाणीपुरवठा सुरळीत राहावा एवढी माफक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र गेल्या पाच दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सक्षम अधिकारी नसल्याने नागरिकांनी जाब विचारावा कोणाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पाण्याचे वितरण करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे तेच अधिकारी जागेवर नसल्याने याप्रकरणाची दखल आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी घेतली. त्यांनी तात्काळ शहरातील राजकीय पक्षांच्या अध्यक्ष सोबत महत्तवपर्ण बैठक कृषी उत्पन्न बाजार आयोजित केली. तोरणा विश्रामगृहात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारीकाँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील माजी, नगराध्यक्ष सुनील चौधरीनगरसेवक पंकज पाटील यांच्यासह ही बैठक पार पडलीया बैठकीत अधिकाऱ्यांनी अपुरा पाणीपुरवठा आणि एमआयडीसीकडून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा या दोन महत्त्वाच्या समस्या बैठकीत उपस्थित केल्या. अंबरनाथ शहरासाठी ५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर झालेले असतानादेखील लघुपाटबंधारे विभाग ते पाणी उचलण्यासाठी एमआयडीसीला आदेश देत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कायदा हातात घेण्याची तयारी देखील या बैठकीत दर्शविण्यात आली. अधिकारी कागदी आदेशांवर अवलंबून असल्याने त्या आदेशाची वाट न पाहता शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदार बालाजी किणीकर, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, राष्टवादीचे अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी थेट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ येथील जलवाहिनी कडे धाव घेतली. अंबरनाथ फॉरेस्ट नाका वर एमआयडीसीची लाईन ही जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला जोडण्यात आली आहे. त्या ठिकाणचा वॉल सुरु करून एमआयडीसीचे बारवी धरणातील पाणी थेट अंबरनाथ साठी सोडण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत अधिकाऱ्यांनी काम करणे बंधनकारक होते मात्र ते काम शहरातील राजकीय पक्षांनी आणि आमदारांनी एकत्र येऊन केले आहे. फॉरेस्ट नाका येथील वॉल सोडल्यानंतर लागलीच भेंडी पाडा येथील जलकुंभावर पाणी भरण्यासाठी वॉल खोलण्यात आले. अशा प्रकारची यंत्रणा अधिकाऱ्यांनी दररोज राबवली नाही आम्ही स्वत: ही यंत्रणा चालू करू असे डॉ. बालाजी किणीकर यांनी स्पष्ट केले. राज्यात संचार बंदी असल्याने महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहती मधील बहतेक सर्व कंपन्या बंद असल्याने त्याठिकाणी जाणारे पाणी हे शहरासाठी देणे गरजेचे आहे. असे असतानाही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आडमुठेपणाचे धोरण अवलंबत हे पाणी अडवत असल्याचा आरोप ब्लॉक काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केला आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...