दळखण ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
खर्डी: संपूर्ण जगात कोरानो विषाणू दहशत माजवत आहे.,महाराष्ट्रातही अनेक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत, अशा वेळेस ही विषाणूजन्य साथ आपल्या विभागात पसरू नये,यासाठी आज दळखन ग्रामपंचायतीचे सरपंच श्री भगवान मोकाशी व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोमनाथ म्हसकर, पांडुरंग मोकाशी,ग्रामसेविका श्रीमती माधवी कदम, ASBB या सामाजीक संस्थेचे सन्माननीय श्री बीपीनजी रस्तोगी तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थ दळखन यांनी संपूर्ण खर्डी परिसर,रेल्वे प्रवासी,दळखन व काष्टी विभागात ASBB मुंबई या समाजसेवी संस्थेमार्फत मास्कवाटप केले या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे