मुरबाड मध्ये राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, अधिकायांनी केले रक्तदान
अधिकायांनी केले रक्तदान मुरबाड : मुरबाड पंचायत समिती कार्यालयात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास मुरबाड कराचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला मुरबाड पंचायत समितीचे सदस्य श्रीकांत धुमाळ, पत्रकार अरुण ठाकरे, राजकीय कार्यकर्ते अनिल घरत, चेतन सिंह पवार, शाखा अभियंता रक्तदान केले या शिबिरात १०० बाटल्या रक्त जमा झाले ठाणे येथील कै वामनराव ओक रक्तपेढी तर्फे रक्त जमा करण्यात आले. यावेळी आमदार किसन कथोरे, मुरबाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर उपस्थित होते.