पालकांना महत्वपूर्ण सूचना...

__ मुलांच्या शाळेला जी सुट्टी दिली आहे' ती गंमत म्हणून दिली नाही. जो जीवघेणा कोरोना नावाचा संसर्गजन्य व्हायरस पसरतो आहे, त्याला प्रतिबंध म्हणून ही सुट्टी जाहीर केली आहे. कारण लहान मुलं ही लगेच कोणाच्याही संपर्कात येतात, त्यांना स्वच्छतेची जाणीव नसते, चांगलं वाईट समजत नाही आणि म्हणून ही मुले एखाद्या संसर्गजन्य रोगाच्या सहज आहारी जाऊ शकतात. म्हणून मुले घरात राहिली तर ती जास्त लोकांच्या संपर्कात येणार नाहीत, त्यांच्या पालकांचे त्यांच्याकडे लक्ष राहील, सुयोग्य आहार घेतील, तसेच स्वतःच्या स्वच्छतेकडे लक्ष देतील, संसर्ग होणार नाही व त्यामुळे कोरोना सारख्या आजाराला बळ मिळणार नाही. हा सट्टी देण्यामागचा प्रशासनाचा हेतू आहे. ___ म्हणून पालकहो, मुलांना सुट्टी आहे म्हणून मामाच्या, किंवा इतर नातेवाईक यांच्या गावाला पाठवू नका. त्यांना पिकनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळे, सहल इत्यादी ठिकाणी पाठवू नका, सुट्टी आहे म्हणून त्यांना बाजार, यात्रा महोत्सव, इ ठिकाणी पाठवू नका किंवा तुम्ही सुध्दा जाऊ नका. आपले घर,शेती,शाळेचा अभ्यास . मध्ये त्यांचे मन रमवा... प्रत्येक विषयाचा दररोज सराव घ्या... प्रश्नोत्तरे, प्रश्नपत्रिका सराव... लेखन,वाचन यांचा सराव घ्या... फोन, वॉट्सअप्प, मेसेज या माध्यमातून आपल्या | मुलाच्या, मुलीच्या शिक्षकांच्या संपर्कात रहा... उपाय आपले सर्व शिक्षक आपणास सुव्यवस्थित मार्गदर्शन करतील... होमवर्क वगैरे देतील... मुलांच्या अभ्यासात खंड पडू देऊ नका... आपल्या शंका, अडचणी नक्की विचारा, मुलांना अनोळखी व्यक्तींच्या, परदेशी पाहुण्यांच्या संपर्कात जाऊ देऊ नका... बाहेरील वस्तू खाऊ देऊ नका... उघड्यावरील वडापाव, आईस्क्रीम, बर्फ गोळा, आईस कांडी, पाणीपुरी, भेळ अशा वस्तूंपासून चार हात दूर ठेवा.... ___ फक्त पुढचा आठवडा आपल्याला जपायचे आहे आणि या कोरोनावर विजय मिळवायचा आहे..... __जनहीतार्थ जारी....


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...