पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोरोनाला रोखणार....पण कसे

__टाळेबंदीच्या संदर्भात केंद्राकडून जारी केलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना परवानगी देण्यात आली आहे, असे स्पष्ट केले. त्याच वेळी रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रम हे यापुढेही बंद राहणार आहेत, याची पुन्हा आठवण करून दिली. या मार्गदर्शक नियमावलीनुसार, ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसायव्यापारी आस्थापनांना करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात आली आहेत्यामुळे, त्याचे कोठेही उल्लंघन होत असेल, तर ते लगेच प्रशासनाच्या आणि कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांच्या लक्षात आणून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य बनते. ते काटेकोर पाळले पाहिजे, परंतु ते करण्यासाठी नागरिकांनी आपले घरी राहण्याचे मूळ कर्तव्य विसरून अत्यावश्यक उद्योगव्यवसायांना सूट मिळाली म्हणून टेहळणीस बाहेर पडण्याच्या अनुचित सवयीला आवर घातला पाहिजे. तसा ते घालतील, या भरवशावर हा टप्पा सुरू होत आहे. करोनाचा भारतात जानेवारीअखेर प्रवेश झाल्यानंतर केवळ अ...

खबरदार मुरबाड तालुक्या बाहेरील नातेवाईकांनी शहरात प्रवेश केल्यास होणार १४ दिवस होम कवारंटाइन

मुरबाड : कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून मुरबाड तालुका बाहेरील नातेवाईकांना मुरबाड शहरात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. असी माहीती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कंकाळ यांनी दिली. देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना मुरबाड शहर मात्र अजूनही सुरक्षीत असल्याने नातेवाईक मुरबाड शहरात येण्याची शक्यता वाढली आहे. असी शंका नगरपंचायतिच्या नगराध्यक्षा व नगरशेवक यांनी हा प्रश्न उपस्थीत केला. या प्रश्नाला आमदार किसन कथोरे यांनीही दुजोरा दिल्याने याची अंमलबजावणी नगरपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने मुरबाड नगरपंचायत क्षेत्र प्रतिबंधक क्षेत्र म्हणन जाहीर केल्याने ही उपाय योजना राबविण्यात येत आहे. मरबाड शहरातील नागरिकांनी तालुक्या बाहेरील नातेवाईकांना फोन करून या बंदीची माहीती द्यावी असेही आवाहन मख्याधिकारी अभिजित कंकाळ यांनी केले आहे. या नियमाला बगल देऊन शहरात प्रवेश करताना नातेवाईक आढळल्यास त्यांच्या हातावर शिक्का मारुन १४ दिवस होम कवारंटाइन केले जाणार असल्याने सद्या तरी मुरबाड तालुक्याच्या बाहेरील नातेवाईकांनी मुरबाड शहराला राम राम ठोकलेलाच बरा. _

रिलायन्स फाऊंडेशन मार्फत पशुसंवर्धन विषयी शेतकऱ्यांना ऑडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन

पालघर : सध्या भारतासमोर असलेल्या करोना विषाण च्या संकटामध्येही रिलायन्स फौंडेशन हे विविध पद्धतीने मार्गदर्शन करण्यात नहमाच अग्र स्थाना ठरलल आह ,अशाच पाश्वभूमा चा विचार करता रिलायन्स फौंडेशन चे प्रकल्प अधिकारी तेजस डोंगरिकर व पालघर जिल्हा कार्यक्रम सहाय्यक निरंजन घुले यांनी ठडायल आऊट कॉन्फरन्सठ या पद्धतीने पशुधना चे पालक याना एकाच वेळी पशुसंवर्धन विभागाचे विकास अधिकारी डॉ.हेमंत रवींद्र पिचड(मानिवली,वाडा) व डॉ आसावळे(कर्डस, वाडा)यांनी मार्गदर्शन केले. तसेच मनोज कामडी(उमेद कार्यालय,जव्हार) यांनीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कॉन्फरन्स अंतर्गत विशेषत: या महामारीच्या परिस्थिती मध्ये जनावरांचे पोषण आहार व चारा व्यवस्थापन ,जनावरांना सांभाळताना घ्यायची काळजी, जनावरांचे आरोग्य व रोग त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय ,लसीकरण,उन्हाळ्यांत घ्यावयाची काळजी या बाबतचे शेतकऱ्यांना ऑडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आले या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले. तसेच काही शंका असल्यास शेतकऱ्यांना अधिक माहितीकरीता, टॉल फ्री नंबर १८०० ४१९ ८८०० संपर्क साधण्याचे आवाहन रिलायन्स फाऊं...

डोळखांब ग्रामपंचायत तीन दिवस बंद

इमेज
शहापूर : ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील शहापूर तालक्यातील महत्तवाची व समारे ६० ते ६५ गाव पाड्यांची बाजारपेठ असलेली व र (दि.२४) पासून रविवार(दि.२६)पर्यंत बंद राहणार असल्याचा ग्रामपंचायत उपसरपंच सागर देशमुख यांनी सांगीतले. ___ कोरोनाचा संसर्ग टळावा या पार्श्वभूमीवर डोळखांब बाजारपेठेतील मेडिकल व दवाखाने वगळता किराणा, भाजीपाला,चिकन, मटणची दुकाने व राइसमिल आदाउद्या शुक्रवार (दि.२४) पासून रविवार(दि.२६)पर्यत तीन दिवस बंद राहणार असल्याचे उपसरपंच सागर देशमुख यांनी सांगितले. ग्रामपंचायतीने या बाबत पत्रक काढून, फलक लिहून जनजागृती केली आहे.

अडकून पडलेल्या परप्रांतिय कामगारांना मिळते रोज जेवण अंबरनाथला उद्योजक आणि फणशिपाडा ग्रामस्थांचा पुढाकार

अंबरनाथ : हाताला काम नाही, जेवायला अन्न मिळेना अश्या विचित्र स्थितीमध्ये मिळेल त्या मार्गाने आपल्या गावाकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या सगळीकडे पहाण्यास मिळते, पण अंबरनाथला मात्र कंपन्या बंद असल्या तरी लॉकडाउनच्या परिस्थितीत अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील वास्तव्याला असणारा एकही परप्रांतीय कामगार उपाशी राहू नये यासाठी उद्योजकांसह फणशीपाडा ग्रामस्थांनी यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कामगारांना रोज दुपारचे जेवण देण्यात येत आहे. लॉकडाऊन परिस्थितीमुळे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीमध्येही उद्योग- व्यवसाय ठप्प झाले आहेत, त्यामुळे परप्रांतीय कामगार अडकून पडले आहेत, या अडकून पडलेल्या कामगारांना रोज जेवण मिळावे यासाठी उद्योजक, राजकारणी आणि व्यावसायिक तसेच ग्रामस्थ धावून आले आहेत. आमदार डॉ. बालाजी किणीकर, आनंदनगर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आमा), अध्यक्ष उमेश तायडे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, गुणवंत खिरोदिया, विजयन नायर, त्याचप्रमाणे ग्रामस्थ नारायण मिसाळ, यशवंत मिसाळ, संजय मिसाळ, किशोर सांबारे, सुखदेव सांबारे, धोंडू दुर्गे, अनिल भोईर आणि त्यांचे सहकारी यांच्यासह अडकून पडल...

भिवंडीत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येने चिंता! पालिका कर्मचाऱ्यांची सरक्षितता धोक्यात!

भिवंडी : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार आता भारतात होऊ लागला आहे. रोजच एक हजाराने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हि संख्या आता वीस हजारापेक्षा जास्त झाली आहे. त्यातच महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्हा आघाडीवर आहे. मुंबई पासून जवळच असलेल्या भिवंडी शहरात १२ एप्रिल रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. आणि अवघ्या १० दिवसात हाच आकडा ही पोस्ट लिहित असेपर्यंत १२ वर गेला असून उद्यापर्यंत हाच आकडा दुप्पट होण्याची भिती निर्माण झाली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना भिवंडी शहर एकदम ठसेफ झोनठ मध्ये होते. भिवंडी ऐतिहासिक रेकॉर्ड करण्याच्या तयारीत असतांनाच १२ एप्रिल रोजी एक रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ माजण्याबरोबरच नाराजीही पसरली. मात्र, नागरिकांचा निष्काळजीपणा नडल्याने शहरात हीच संख्या १० दिवसात १२ ने वाढली. शासकीय यंत्रणापोलिसांनी आवाहन करुन सुध्दा लोकं लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यावर, बाजारात, मार्केटमध्ये मोकाट फिरत आहेत. घरात बसायला आणि कोरोनाला गांभीर्याने घ्यायलाच कोणी तयार नाही. जिकडेतिकडे गर्दी आणि गर्दीच दिसत आहे...

दैनंदिन आयुष्यातील या गोष्टी ठरू शकतात कर्करोगाला निमंत्रण

आपल्या जीवनातील धूम्रपान, मद्यपान, इत्यादी सवयी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरण्याची शक्यता असते हे आपल्याला माहिती आहे. मात्र आपल्या आयुष्याचा भाग असणाऱ्या कितीतरी सर्वसाधारण सवयी देखील कर्करोगासारख्या गंभीर आजारांना आमंत्रण ठरू शकतात याची कल्पना आपल्याला नसते. आताच्या जगामध्ये सर्वाधिक मृत्यू हृदयरोगाने होत असून, त्यापाठोपाठ कर्करोग हे सर्वाधिक प्रमाणात मृत्यू होण्याचे आणखी एक कारण आहे. अश्या वेळी अगदी सर्वसाधारण आणि आपल्या आयुष्यामध्ये नियमित वापरात येणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला कर्करोग होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तविली असताना या गोष्टी नेमक्या कुठल्या आहेत हे जाणून घेणे श्रेयस्कर आहे, जेणेकरून या वस्तूंच्या वापरावर नियंत्रण ठेऊन पर्यायाने कर्करोगापासून बचाव केला जाऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत उन्हामध्ये वावरल्याने त्वचेवर सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांचे दुष्परिणाम होत असतात. या किरणांमुळे त्वचेवरील फायबर्सचे नुकासान होत असून, त्यामुले त्वचेचा रंग काळवंडणे, ट्युमर, आणि त्वचेवर घावही (तेग्दहे) तयार होत असतात. सूर्याच्या घातक अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वच...

धक्कादायक! पोलिसावर उपचार करण्यासाठी चार रूग्णालयांचा नकार...

इमेज
  मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला वेढीस धरलं आहे. संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशावेळी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या सेवेत पोलिस आणि डॉक्टर अहोरात्र नागरिकांसाठी कोरोनाशी लढत आहेत. पण अशा अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या पोलिसांना आणि डॉक्टरांनाच वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागत आहे. ___कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांनी घरातच राहावं यासाठी पोलिसा जीवाची पर्वा न करता अहोरात्र रस्त्यावर कार्यरत आहे. पण आजारी पोलिसाला दाखल करून घेण्यास एक दोन नव्हे तर चार महापालिकेच्या रूग्णालयांनी नकार दिला. अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीमुळे या पोलिसाला मंगळवारी रात्री केईम रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे पोलिसांमध्ये नाराजी आहे. कुर्ला वाहतूक विभागातील एका पोलीस हवालदार यांना ताप आल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. मात्र प्रकृतीत फारसा फरक ना __ पडल्यामुळे घाटकोपरमधील राजावाडी रूग्णालयात नेण्यात आलं. तेथील डॉक्टरांना कस्तुरबामध्ये नेण्यास सांगितलं. मलाला सोबत घेऊन पोलीस कस्तूरबा रूग्णालयात गेले. मात्र तेथे जागा नसल्यामुळे नायर रूग्णालयात जाण्याची सूचन...

कल्याणमध्ये कोरोना बांधितांची संख्या वाढती

टिटवाळा : कल्याण डोंबिवली महानगरपालिकावैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केले असून गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११ नवीन रुग्ण आढळल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १०८ झाली आहे. तर यातील एक प्रेताच्या राखेतून रुग्ण मांडा टिटवाळा परिसरात आढळन आला आहे. टिटवाळयातील पहिली कोरोनाबाधित महिला बरी होऊन घरी आल्यानंतर टिटवाळाकर समाधान व्यक्त करत असतानाच आज पुन्हा एका टिटवाळा येथील शासकीय कर्मचारी असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पण झाल्याने टिटवाळाकरांच्या चिंतेत भर पडली आहे. या आधी टिटवाळयातील पहिली कोरोनाबाधित महिला ही कस्तुरबा रुग्णालय येथे परिचारिका म्हणून काम करत होती. .कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णसेवा देण्यासाठी २१ मार्च नंतर येथेच रहात होती. यावेळी या रुग्णांची सेवा करत असताना ही महिला स्वत: बाधित झाली. सुरवाती (लॉकडाउन) पासन रुग्णालयातच होत्या. तिथे कार्यरत असतानाच बाधित झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी त्या कस्तुरबा रुग्णालयातच ...

या क्षेत्रात देखील तुम्ही कमावूशकता उत्तम पैसा

इमेज
आपल्याकडे भरपूर पैसा असावा, मनात येतील त्या सर्व गोष्टी एका झटक्यात खरेदी करता याव्यात, आयुष्य चैनीचे, ऐषारामी असावे, असे कोणाला वाटत नाही? यासाठी आवश्यक ती सर्व मेहनत घेण्याची तयारी आणि उत्तम कार्यक्षमता अंगी असतानाच उत्तम अर्थार्जन करून लवकरात लवकर आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी योग्या व्यवसायाची निवड करणेही आवश्यक आहे. भारतामध्ये सध्या अश्याच काही व्यवसायांचे पर्याय अतिशय लोकप्रिय मानले गेले आहेत. या व्यवसायांमध्ये उत्तम सॅलरी पॅकेजेस असून, कार्यक्षम आणि हुशार व्यक्तींना या व्यवसायांमध्ये नक्कीच उत्तम प्रगती करता येऊ शकते. भारतामध्ये सध्याच्या काळामध्ये मार्केटिंगचा व्यवसाय उत्तम संधी मिळवून देणारा म्हटला पाहिजे. यामध्ये अर्थाजनाची संधी चांगली असली, तरी या क्षेत्रात मेहनतही भरपूर असते. एखादी वस्तू किंवा संकल्पना लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचविण्यासाठी मार्केटिंग कॅम्पेन तयार करण्याची अवघड जबाबदारी या व्यावसायिकांकडे असते. त्यासाठी ग्राहकांना आपले म्हणणे पटून आपण विकत असलेले प्रोडक्ट, किंवा एखादी संकल्पना ते स्वीकारतील अश्या बेताने ही कॅपेन्स तयार करण्यासाठी कल्पकतेची आवश्यकता असते. ज...

मुरबाड तहसिल कार्यालयात बसवलेला नवीन टनेल बंद

मुरबाड : कोरोना पासून बचाव करण्यासाठी मुरबाड तहसिल कार्यालयात येणाऱ्या लोकांचे निर्जंतुकी करणं करण्यासाठी मंगळवारी (ता.२१) बसविण्यात आलेला रासायनिक फवारणी करणारा टनेल दुसऱ्याच दिवशी बुधवारी ता २२ पासून बंद करण्यात आला आहे. या टनेल मधून फवारलेल्या रसायना मुळे लोकांच्या कपड्याला डाग पडत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने थेट मानवी शरीरावर रासायनिक पदार्थांचा मारा करणे धोकादायक असल्याने अशी रसायने टनेल मधन लोकांच्या अंगावर फवारणी करणे धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर बसवलेल्या टनेल मध्ये रसायन भरणे बंद केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मुरबाड पोलीस ठाणे व मुरबाड नगर पंचायत कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर लोकांच्या अंगावर रसायने फवारणी करण्यासाठी बसवलेले टनेल मात्र अजून चालू आहेत

धरणाच्या शहापूर तालुक्यात | | पाणीटंचाईच्या झळा

शहापर : शहापर तालका ठाणे जिल्ह्यात धरणांचा तालका म्हणून ओळखला जातो,मुबंई ला पाणी पुरवठा करणारे तानसाभातसा,वैतरणा, सारखे महाकाय जलाशय शहापूर तालुक्यात आहेत'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी परिस्थिति आहे तानसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या सावरदेव येथिल आदीवासी पाड्यावर असलेल्या एकमेव विहीरीने तळ गाठला आहे. भर पाण्यासाठी रात्र रात्र जागून पाणी जमा करावे लागते, कडे 'कोरोना' चे सकंट तर दूसरी कडे पाण्यासाठी वणवण करावी लागते, आशा दुहेरी संकटाचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी वेळीच लक्ष देने गरजेचे आहे.

आमदार किसन कथोरेनी घेतली कल्याण व आंबरनाथ तालुका खरीप हंगाम पिक आढावा बैठक

___ बदलापूर : कोरोना आजाराच्या वाढता प्रादुर्भाव त्यामुळे ठप्प झालेले जनजीवन या स्थितीत ग्रामीण भागातील काही दिवसांवर येऊन ठेपलेला खरीप हंगाम या हंगामात मतदारसंघातील शेतकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी कोरोना आजारीतल निकष पाळत सामाजिक अंतर ठेवून कल्याण ,आंबरनाथ तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खरीप हंगामाची पूर्व तयारी बी बियाणा चा पुरवठा वेळेत व्हावा. खते व शेती पूरक अवजारे उपलब्ध व्हावीत याबाबत चर्चा करण्यात आली, गत वर्षी पूर सदृश स्थिती, व अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांकडे बी बियाणे उपलब्ध नसतील यासाठी दोन्ही तालुक्यातील खरिपात क्षेत्र लक्षात घेऊन बियाणे पुरवठा करावा, भात पिक शेती शाळांचे गट निहाय नियोजन करणे. शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि पारंपरिक पिकांच्या ऐवजी आधुनिक शेती कशी कारवी याबाबत मार्गदर्शन करा आशा सूचना आमदार किसन कथोरे यांनी याप्रसंगी दिल्या. कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामूळे भातशेती च्या मशागतीची कामे खोळंबली आहेत , ही कामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे लॉक डाऊन संपताच मरेगा मार्फत बांधबंदिस्ती ,आणि शेती चे सपाटीकरण ही कामे सुरू क...

वाढदिवसाची रक्कम दिली मुख्यमंत्री सहायता निधीस : चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक

मुरबाड : संपूर्ण राज्यात कोरोना या महाभयंकर संकटाने थैमान घातले आहे. गरीब ,मजूर ,हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत .अशा वेळी आपला वाढदिवस थाटामाटात साजरा करणे हे मनाला न पटन्यासारखे आहे.हा विचार डोक्यात ठेवून आपल्या चौदाव्या वाढदिवसासाठी जमविलेली २५०००/ हजारांची रक्कम मुरबाडच्या एका चिमुकल्याने थेट मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. मुरबाड शहरातील हनुमान आळी येथे राहणाऱ्या सजल साईनाथ शिंदे याचा आज चौदावा वाढदिवस आहे . एरवी आपल्या कुटुंबा समवेत थाटामाटात वाढदिवस साजरा करणाऱ्या या चिमुकल्याने यंदा तो साजरा न करता त्यासाठी खर्च होणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्याची इच्छा आपल्या आईवडीलांसमोर व्यक्त केली. आपल्या इवल्याशा बालकाची सामाजिक जाण पाहून त्याच्या आईवडीलांसह शेजारपाजायांनी या निर्णयाचे कौतुक केले. आज सकाळी मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांच्याकडे पंचवीस हजारांचा धनादेश वडील साईनाथ शिंदे व काका मयर शिंदे यांच्या उपस्थित मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करून सुजलने एका सामाजिक वाढदिवसाचा जगावेगळा आनंद अनुभवला असल्याचे सांगितले. लहानवयात सुजलच्या या सामजिक जाणिव...

नगराध्यक्षांच्या सौजन्याने दिलेल्या सेनिटायझर शॉवरचे लोकार्पण

_मुरबाड : कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेश व्दारावर बसविलेल्या सेनीटायझर शॉवरचे लोकार्पण आज करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अनेक कार्यालयांत सेनिटायझर शॉवर बसविण्यात आले आहेत. याचा एक भाग म्हणून खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. छाया चौधरी यांच्या सौजन्याने हा शॉवस बसविण्यात आला आहे. या शॉवरचे लोकार्पण तहसिलदार अमोल कदम, मुख्याधिकारी अभिजित कंकाळ, नगराध्यक्षा सौ छाया चौधरी, तालुका अध्यक्ष जयंत सूर्यराव, शहर अध्यक्ष सुधीर तेलवणे, माऊली सामाजीक संस्था अध्यक्ष संतोष चौधरी व नगरशेवकांच्या उपस्थीतीत करण्यात आले.

टायर फुटल्याने रूग्न वाहिकेचा अपघात; एक किरकोळ जखमी

मुरबाड : डॉक्टरांना आणण्यासाठी कल्याणहून शिर्डी कडे चाललेल्या रूग्न वाहिकेचा झाला अपघात. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. शिर्डी येथील डॉक्टरांना आणण्यासाठी कल्याण हून एक रूग्न वाहीका चालली होती. टोकावडे | गावाजवळील मानिवली योथील वळणावर रूग्ना वाहिकेचा टायर फुटल्याने विदूत पोलवर आदळून हा अपघात झाला. यात चालक किरकोळ जखमी झाला | आहे. या अपघाताची नोंद टोकावडे पोलिस ठाण्यात | करण्यात आली आहे. |

रेशन दुकानांत रेशनचा काळाबाजार; नागरिकांच्या असंख्य तक्रारी

कल्याण : केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत शिधावाटप दुकानांत मिळणारा मोफत शिधा ; गहू, तांदूळ, डाळ म्हारल, पो.वरप, ता. कल्याण, (जि.ठाणे) मध्ये दुकान क्रमांक : ४० फ २९९ व ४० फ १८४ सहायक शिधावाटप अधिकारी, ४० फ उपनियंत्रक (उल्हासनगर) येथे केशरी कार्ड धारकांना थातुरमातुर कारणे सांगून दिला जात नसल्याच्या असंख्य तक्रारी येत आहेत. उदा. स्टॉक संपला पुढच्या महिन्यात या.., आधार कार्ड मागितले जाते परंतु तम्ही शिधावाटप कार्यालयात रजिस्टर्ड नसल्याचे सांगितले जात आहे. दुकानात आलेला शिधा केशरी कार्ड धारकांना दिला जात नसून तो काळ्याबाजारात विकला जात आहे. सहायक शिधावाटप अधिकारी, ४० फ एम उपनियंत्रक (उल्हासनगर) डी वी बोरकर आणि ४० फ (सब) सानप यांचा मोबाईल फ्री क्र १८००२२४९५० नेहमीच busy येत आहे. शासनाने याची युद्धपातळीवर दखल घेऊन या शिधावाटप दुकानांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून कोणत्या निकषांवर, आतापर्यंत प्रत्यक्षात किती जणांना मोफत शिधा दिला गेला? अनियमितता आणि शिधावाटपातील भ्रष्टाचार शोधून काढावा तसेच दोषी आढळल्यास परवाना रद्द केला जावा. नागरिक मांगणी करीत आहेत की केंद्र शासनाचा मो...

भाजपा जिल्हा सचिव प्रदिप भोईर कडून परिसरातील दिड हजार नागरिकांना मदतीचा हात

टिटवाळा : भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा सचिव पदिप भोईर यांच्या कडून टिटवाळा मांडा परिसरातील दिड हजार नागरिकांना जीवन आवश्यक वस्तू चे वाटप माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या मागैदशैन खाली भाजपा कायैकती यांनी केले, कोरोना आजारामुळे रेल्वे व वाहतूक सेवा तसेच कामे धंदे बंद झाले आहेत. त्या मुळे रोजंदारी कामगार ,नाका कामगार, तसेच मोळमजुरु करणाऱ्या नागरिकानवर संकट कोसळले आहे, मांडा टिटवाळा परिसरातील दिड हजार नागरिकांना घरपोच, गोडातेल, तांदूळ, तुरडाळ, चणे, कांदे, बिस्कीटेपुडे आदी जीवन आवश्यक वस्तू चे वाटप टिटवाळा मंदिर जवळ,साईबाबा नगर,दंत नगर, हनुमान नगर, आई ईकवीरा नगर, शिंदे चाळ,मोरया नगर, मांडा कोळीवाडा, बौध्द वाडा, नादंपरोड आदी परिसरात वाटप करण्यातआले. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोईर, हनुमान भोईर, वयापारि मंडळाचे अध्यक्ष संतोष भोईर, भाजपा जिल्हा सचिव पदिप भोईर, विवेक पुरवणीक, रत्नाकर पाटील, तानाजी हरड,अक्षय भोये, जिंतेद भोये, उमेश भोईर, प्रशात भोये,शेखर पाटील, निशीकांत लोहार, यश पाटील, विराज ऊतेकर,दिनानाथ जाधव,साई मढवी, रवी पाटील, विनोद लोखंडे, ईरफान खलीफा, ददंन सैनिक आदी उपस्थित होते.

कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील ११ जणांपैकी चौघांचे अहवाल निगेटिव्ह

शहापुर : शहापुरातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील ११ जणांपैकी चौघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याना क्वारटाइन करण्यात आले होते. उर्वरित सात जणांचे अहवाल अजूनपर्यंत प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. शहापूरात एक रुग्ण कोरोना बाधित असल्याचे शुक्रवारी आढळून आले असून त्याच्यावर ठाणे येथील होराईझन या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना क्वारोंटाईन करून भिवंडी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या ११ जणांपैकी चार जणांची केलेली चाचणी निगेटिव्ह आली असून उर्वरित सात जणांच्या चाचणीचे अहवाल बुधवारी प्राप्त होतील अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी दिली.

'वर्षा'वरील पोलिसाला कोरोना

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री येथील निवासस्थानी चहाविक्रेता कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंतेचे वातावरण असतानाच आता 'वर्षा' या उद्धव ठाकरे यांच्या सरकारी बंगल्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यालाही लागण झाल्याचे समोर आले आहे. पायधुनी पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या महिला सहायक निरीक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मलबार हिल येथील वर्षा बंगल्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो. या सुरक्षा कवचामध्ये या विभागात येणाऱ्या पोलिस ठाण्यांतील पोलिसांची तेथे बंदोबस्तासाठी नेमणूक केली जाते. दोन दिवसांपूर्वी पायधुनी पोलिस ठाण्यातील महिला सहायक निरीक्षकाला वर्षा निवासस्थानी तैनात करण्यात आले. खबरदारी म्हणून बंदोबस्ताला येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासले जाते. त्यानुसार या महिला अधिकाऱ्याचे तापमान अधिक आढल्याने त्यांना वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. वैद्यकीय अहवालात या महिला अधिकारी पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांना तत्काळ दक्ष...

राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले : राजेश टोपे

मुंबई : राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टिवटरद्वारे दिली आहे. आता १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही असा जिल्हा ऑरेंज झोन तर २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळलेला नाही असा जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, असं राजेश टोपे म्हणाले. तर ज्या जिल्ह्यात १५ हन अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन असेल, असंही टोपे यांनी सांगितलं. कोरोना व्हायरसच्या प्रभावानुसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याआधी रुग्ण संख्या हा प्रमुख निकष होता. त्यानुसार १५ पेक्षा कमी रुग्ण म्हणजे ऑरेंज झोन आणि रुग्ण मजुरीच्या बदल्यात १५ किलो नाही म्हणजे ग्रीन झोन असे निकष होते. परंतु आता किती दिवसात रुग्ण आढळले हा झोन ठरवण्याचा निकष असेल, असं आरोग्यमंर्त्यांनी स्पष्ट केलं आहे. पूर्वीचा निकष नवा निकष १५ पेक्षा कमी रुग्ण म्हणजे ऑरेंज झोन १४ दिवसात नवा रुग्ण आढळला नाही तर ऑरेंज झोन. रुग्ण नाही म्हणजे ग्रीन झोन २८ दिवसात नवा रुग्ण आढळला नाही

महिला पोलीस कर्मचाऱ्यांना चार चाकी गाडीने दिला धक्का : महिला पोलीस कर्मचारी जखमी

टिटवाळा : कल्याण मुरबाड महामार्गावर म्हारळ पोलीस चौकीच्या समोर लावण्यात आलेल्या नाकाबंदी /लॉकडाऊण मध्ये कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीसाला स्कापिओ गाडीने जोरदार धक्का दिल्याने त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून गाडीचालका विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी व कोव्हीड १९ साथीच्या कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिटवाळा पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे ग्रामीण पोलीस दलात सेवेत असलेल्या महिला पोलीस श्रीमती जाधव या कल्याण मुरबाड महामार्गावर असलेल्या म्हारळ बीट पोलीस चौकीच्या समोर लॉकडाऊण /नाकाबंदी साठी कर्तव्यावर होत्या. येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करित असताना धोबीघाट /बिल गेट कडून म्हारळ च्या दिशेने स्कापिओं नं एमएच ०५,बीबी १११ही गाडी भरधाव वेगाने आली. महिला पोलीस जाधव यांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला पण गाडिवर नियंत्रण न मिळवता आल्याने त्यांच्या हाताला जबर धक्का लागला.त्यात त्या जखमी झाल्या त्याना सेंट्रल हॉस्पिटल उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर टिटवाळा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा स्कारपीओ चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी कामात अडथळा निर्माण कर...

खर्डीतील संशयीत रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह;

सोशल मीडियावर रुग्ण पॉझीटिव्ह असल्याची अफवा || पसरविणायावर कारवाई करण्याची फरीद शेख यांची मागणी खडी : शहापुर तालुक्यातील खर्डी येथून २ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा रुग्णालयात नेलेल्या तीन जणांची प्रकृती ठणठणीत असल्याचा व त्यांचा तपासणी रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह असल्याचे५ दिवसांनी स्पष्ट झाल्याने घरी पाठविण्यात आले होते व असून १४ दिवस होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. याबाबत सोशल मिडियावर खर्डीत कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण सापडल्याची अज्ञात इसमाने अफवा पसरवून माझी व माझ्या कटबियांची बदनामी केली असल्याने या प्रकारणाची योग्य चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी फरीद शेख यांनी केली आहे. शहापूर तालुक्यातील खर्डीतुन २ एप्रिल २०२० गरुवारी तीन तरुणांना वैद्यकीय चाचणीसाठी ठाणे सिविल रुग्णालयात नेण्यात आले होते.त्यामळे खर्डीत खळबळ उडाली होती.धार्मिक कार्यक्रमासाठी नालासोपारा येथे ते तिघे गेले होते परंतु येथील धार्मिक कार्यक्रम रह झाल्याने येथील नातेवाईकाच्या भेटीसाठीखर्डीतील तिघेजण तिथे काही दिवस वास्तव्यास राहिले होतेलॉक डाउन झाल्याने नाला सोपारा येथील नगरसेवकाच्या सहाय्याने खर्डीत परतलो तिघांचीही प्रकती को...

शहापूर तालुक्यात 'कोरोना' व्हायरस चा शिरकाव, संशयीत व्यक्ति निघाली पॉझिटीव्ह...!

शहापुर : आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण शहापुर तालुक्यात नव्हता पण आज एक रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. दम्याचा त्रास होत असल्याने ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या"शहापुरातील एका ६७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे खाजगी लॅबमध्ये केलेल्या चाचणीच्या अहवालानंतर समोर आले आहे. दरम्यान यामुळे शहापुरात खळबळ माजली असून अफवांचे पीक आले आहे. शहपुरात राहणाऱ्या एका ६७ वर्षीय व्यक्तीला दम्याचा त्रास होत असल्याने त्याला प्रथम शहापुरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित रुग्णाला ठाणे येथील होरिझन या रुग्णालयात सात एप्रिल ला दाखल करण्यात आले. या रुग्णाची ठाणे शहराच्या पश्चिम भागातील एका खाजगी लॅब मध्ये कोरोनाची चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून संबंधित इमारत व परिसर सील करण्यात आला असून इमारतीमधील रहीवाशाना बाहेर पडू नये असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर आरोग्य विभागाचे पथक संबंधित रुग्णाच्या घरी जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. हा रुग्ण पॉझि...

वाड्यात संचारबंदी चे तीनतेरा

इमेज
वाडा : करोनाच्या पाश्र्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांची गर्दी थोपविण्यासाठी प्रशासनाकडून ही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र ग्रामीण भागातील भागातील नागरीकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने वाडा शहरात संचारबंदीचे तीन तेरा वाजले आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून निराधार व वयोवृद्धांना संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ अशा विविध योजनांतर्गत दरमहा एक हजार रुपये दिले जातात. हे पैसै लाभार्थ्यांचे ज्या बँकांमध्ये खाते आहे त्या ठिकाणी जमा होत असतात. ___ वाडा तालुक्यात विशेषत: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत येथील बहुतांशी लाभार्थ्यांची खाते असलेल्याने तालुक्यात या बँकेच्या शाखा असलेल्या वाडा. खानिवली, कुडूस व कंचाड या शाखांसमोर लाभार्थ्यांची गेल्या चार दिवसांपासन मोठ्या प्रमाणात गर्दी दिसन येत आहे. वाडा शहरातील ठाणे जिल्हा बँकसमोर आज बुधवारी (१५ एप्रिल ) निराधार योजनेतील पैसे काढण्यासाठी पाचशेहून अधिक वयोवृद्ध लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. सोशल डिस्टीगिंग न करता ही गर्दी झाल्याने करोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनेचे तिनं तेरा वाजल्याचे दिसून आले. या निराधार लाभार्थ्...

अफवांवर लागणार लगाम! फेसबुक लॉन्च करणार खास फिचर

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. अशातच कोरोनासंदर्भातील अनेक अफवा सोशल मीडियावर व्हायरस केल्या जातात. आता खोटी माहिती आणि अफवांवर रोख लावण्यासाठी फेसबुकने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक 'गेटस द फॅक्ट' नावाचं फिचर घेऊन आलं आहे. या फिचरमुळे खोटी माहिती आणि अफवा पसरवणं थांबवण्यास मदत मिळणार आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने सांगितलं की, 'आम्ही मार्च महिन्यापासूनच खोटी माहिती पसरवणं थांबविण्यासाठी काम करत आहोत. आता आम्ही आमचा हा प्रयत्न प्रत्क्षात आणणार आहोत.' पुढे बोलताना मार्क झुकरबर्गने सांगितलं की, 'आम्ही फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर कोरोना व्हायरसबाबत लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवन खोट्या माहितीवर रोख लावण्याचं काम करत आहोत.' मार्क झुकरबर्ग म्हणाला की, 'आम्ही मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच खोट्या अफवांवर रोख लावण्यासाठी काम करत आहोत. आता आम्ही जवळपास १२ देशांमध्ये ६० पेक्षा जास्त पॅक्ट चेक __ संस्थांसोबत एकत्र येऊन ५० भाषांमध्ये पसरणाऱ्या अफवा थांबवण्याचं काम करत आहोत. माहिती खोटी भी किंवा खरी असल्यास त्यावर लेबलही लावण्यात येण...

लॉकडाऊनमुळे बंद कंपन्यांचे पाणी जाते कुठे?

रहिवासी भागाला पुरेसा पाणी पुरवठा करा अंबरनाथला मनसेची पाणी खात्याकडे मागणी अंबरनाथ : लॉकडाऊन परिस्थितीमध्ये अंबरनाथच्या औद्योगिक विभागातील कंपन्या बंद असल्याने त्यांचा पाणीपुरवठा जातो कुठे असा सवाल उपस्थित करून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असलेल्या रहिवासी भागाला पुरेसे पाणी पुरवठा करा अशी मागणी अंबरनाथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहर संघटक आणि माजी नगरसेवक स्वप्निल बागुल यांनी पाणी खात्याच्या अधिकाऱ्याकडे केली. अंबरनाथच्या वडवली आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातून पाणी पुरवठा केला जातो, मात्र चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरु असल्याने एमआयडीसीकडून नियमित सुरु असलेला पाणीपुरवठा १७ मार्चपासून एक दिवसाआड केला जात आहे, कोरोनामुळे लॉकडाऊन स्थितीमध्ये औद्योगिक वसाहतीमधील सर्व कारखाने बंद आहेत. या बंद कारखान्यांचे पाणी जाते कुठे , असा प्रश्न उपस्थित करून रहिवासी भागाला पुरवावे अशी मागनी करणारे निवेदन श्री. बागुल यांनी पाणीखात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी उपशहर संघटक प्रशांत नलावडे उपस्थित होते.

राज्यात बारामतीसह सहा ठिकाणी . कोविड १९ प्रयोगशाळा सुरु होणार

बारामती : कोविड १९ या विषाणूची तपासणी करण्यासाठी बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) स्थापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बारामतीसोबतच राज्यात कोल्हापूर, जळगाव, गोंदिया, नांदेड व अंबेजोगाई येथेही अशा प्रयोगशाळा उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सदर प्रस्तावित प्रयोगशाळा स्थापित करण्यासाठी विहीत करण्यात आलेली मानके, विहीत कार्यपध्दती, मान्यता या बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित संस्थाप्रमुख व संचालनालयाची राहील, असे या बाबत जारी करण्यात आलेल्या शासकीय परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेसाठी आवश्यक यंत्रसामग्री, साधनसामग्री बाबी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समितीच्या मान्यतेने व शिफारसीनुसार करण्यात याव्यात, असेही यात नमूद करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेच्या स्थापनेनंतर पुण्यातील प्रयोगशाळांवर येणारा ताण कमी होणार असून पंचक्रोशीतील रुग्णांची तपासणी बारामतीतच केली जाईल. ही प्रयोगशाळा तातडीने सुरु होण्यासाठी आता तयारी सुरु करण्यात आली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुरबाड तालुका अजूनतरी सुरक्षित

मुरबाड : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवली ,अंबरनाथ ,बदलापूर मधेही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात अजुनपर्यंत एकही रुग्ण आढळला नसल्याने मुरबाड तालुका आद्याप पर्यंत तरी शंभर टक्के सुरक्षित आहे. एक रुग्ण जो बरमुडा या देशातुन आला होता तो सूद्धा कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या मुरबाड मधे सध्यातरी झिरो असल्याची माहिती मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांनी दिली. मुरबाड शहर तसेच ग्रामीण भागातील रस्ते पंधरा दिवस लॉकडाऊन करण्यात आले परीणामी बाहेरून येणाऱ्यांना पायबंद घातला गेला वाहनांची वर्दळ पुर्ण बंद करण्यात आली तसेच कोविड पथकामार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली काही ठिकाणी संशयास्पद रुग्ण आढळल्यास त्यांना घरातच कोरोनटाईन करण्यात आल्याने आज महिना होत आला तरी सुद्धा मुरबाड तालुका मात्र नियंत्रणाखाली असुन ग्रामीण भागातील फार्महाऊस मध्ये आलेल्या पाहुण्यांनी दडुन न बसता सहकार्य केल्यास शंभर टक्के कोरोना मुक्त होण्यासाठी मदत होईल. वैशिष्ट्य म्हणजे मुरबाडचे उपविभागीय पोलिस अध...

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे ५ अनमोल विचार

महाराष्ट्राच्या हितासाठी झटाया कर्तृत्ववान व्यक्तींना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. | मुंबईतील वरळी येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, रायगड जिल्ह्याचे सुपुत्र पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित होत. आप्पासाहेबांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. आप्पासाहेबांनी ५ अनमोल विचार मांडले : १. मी कुठला महाराज वैगेरे नाही, मी फक्त चांगले | विचार देतो. माणसाचं कर्तव्य नेमके काय, हे प्रत्येकाला सांगतो. / मी कधीच जाहिरात केली नाही, त्याची गरजही नाही. शेवटपर्यंत समाजकार्य करत राहणार आणि करवून घेणार - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी. २. संताची वचने वाचायला हवे. जात आणि धर्मांतील भेदभाव कमी व्हायला हवेत. मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म आहे. चांगल्या विचारांतून लोकांचे भले केले - डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी. ३. मन उत्तम असेल, तर देशही चांगला घडू शकतो - डॉ. आप्पासाहेब धर्म...

ऑनलाईन शिक्षण

चार भिंतीतील, पाठ्यक्रमानुसार सुरू असलेले औपचारिक शिक्षण तूर्त थांबले असले, तरी विद्यार्थी अनौपचारिक पद्धतीने, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने, कृतिशील पद्धतीने अध्ययन करू शकतात. त्या दृष्टिकोनातून राज्याने 'दीक्षा' नावाचे अॅप तयार केले असून, पहिली ते आठवीचे विविध विषय अभ्यासण्याची सोय केली आहे. पालक आपल्या मोबाइलवर हे अॅप डाउनलोड करून मुलांना उपलब्ध करून देऊ शकतात. विद्यार्थी या अॅपद्वारे इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अभ्यास आणि त्यानुसार पूरक उपक्रम करू शकतात. रोज एका विषयाची सर्व इयत्तांसाठीची लिंक या अॅपवर मिळणार आहे. राज्यातील काही खासगी शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. केंद्र सरकारनेही पर्यायी शैक्षणिक कॅलेंडरचा विचार सुरू केला असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तानिहाय उपक्रम देण्याचा प्रस्ताव आहे. सुरुवातीला एक महिन्याच्या उपक्रमांचे कॅलेंडर जाहीर होणार असून, ते प्राथमिक आणि माध्यमिक इयत्तांसाठी असणार आहे. राज्य आणि केंद्राच्या उपक्रमांचा सारा भर स्मार्ट फोनच्या माध्यमावर आहे. देशातील बहुतांश जनतेकडे स्मार्ट फोन आहे हे खरे; परंतु ही सुविधा ज्यांच्याकडे नाही, अशा मुलांनी...

आमदार किसन कथोरेंची कातकरी आदिवाशी बांधवाना भरीव मदत

__ मुरबाड : कोरोना आजारामुळे राज्यात २१मार्च पासून सुरू झालेले लॉक डाऊन यामुळे कातकरी, आदिवाशी बांधवांची उपास मार होऊ नये यासाठी मतदारसंघातील आदिवासी, कातकरी व गरीब कुटुंबातील नागरिकांना जीवनावश्यक ४७ हजार ३४७ किटचे वाटप आमदार किसन कथोरे यांनी केले आहे. तसेच मतदारसंघातील गरीब गरजूंना मोफत जेवण दुरु केले आहे आतापर्यत पन्नास हजारहून अधिक नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे. तर कोरोना आजाराची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून मतदारसंघात ४५ हजार ६३५ माक्स व सॅनिटायझर च्या किटचे वाटप केले आहे, भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेली २० दिवस हे कार्य सतत सुरू आहे. किसन कथोरे चे खन्दे समर्थक साकीब गोरे यांनी तर कोरोना गो चा नारा देत मुरबाड विधानसभा मतदारसंघातील गरीब आणि गरज आदिवशी कातकरी, बांधवाना जीवनावश्यक वस्तचा परव समाजसेवेचा वसा निरंतन सुरू ठेवला आहे.

काळजी घ्या...! अन्यथा, महाराष्ट्राची वाटचाल होणार 'या' दिशेने

 मुंबई : जगभरासह देशात कोरोना विषाणूमुळे दिवसेंदिवस अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होत आहे. भारतात महाराष्टात आतापर्यंत सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेतसुरुवातीला महाराष्ट आणि केरळ हे दोन राज्य आघाडीवर केरळला मागे टाकले आणि देशात सर्वात जास्त कोरोनाचे रूग्ण हे राज्यात आढळत आहेत. राज्यात शेवटची आकडेवारी हाती आली असता, ३२०५ रूग्णांना कोरोनाची लागणी झाली आहे. तर यात ७६ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. तसेच ३०० रूग्णांना निदान करण्यात आले आहेत. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहेत. तर १९४ रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला देशातील परिस्थिती बघता, कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे.केंद्रिय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ११२०१ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. १७४८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४३७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे आणि एकाला स्थलांतरीत करण्यात आहे. यासंदर्भात सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी सतत माहिती देत आहेत. राज्यातील, देशातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गुरूवारी ...

गरजु व्यक्तीला व विटभट्टी मजूराना दिला मदतीचा हात

इमेज
शहापुर : दहागांव जवळील विटभट्टी वर काम करणाऱ्या अकरा कुंटूब व खातिवली जवळील शुभवास्तू गृहसंकुलात राहणाऱ्या एका गरीब व्यक्तीला मदतीची गरज असल्याचे माहिती पडल्यावर श्रमजीवी संघटना व शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी तत्काळ मदत मिळवून दिली. दहागांव गावाजवळ एका विटभट्टी वर काम करणाऱ्या अकरा कुटुंब मजुरांना तसेच खातिवली जवळील शुभवास्तू गृहसंकुलात राहणाऱ्या एका व्यक्तीला मदतीची गरज असल्याचे प्रतिनिधी पंडीत मसणे यांच्याकडे माहिती आली. यानुसार श्रमजीवीचे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके तर खातिवली येथील शिवसेनेचे कार्यकर्ते विलास काबाडी यांना याबाबत माहिती सांगितली त्यानंतर दोन्ही व्यक्तीनी सकारात्मक विचार करून मदतीपर सहमती दर्शवित दहागांव येथे श्रमजीवीचे जिल्हा कातकरी उपप्रमुख मालुभाऊ हूमणे, शहापूर ता.सचिव प्रकाशभाऊ खोडका, तालुका युवक सचिव रुपेशभाऊ आहिरे, शहापूर शहर प्रमुख हरिषभाऊ खाटेघरे यांनी धान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच जगदीश देसले यांनी बिस्कीट पूडे घेऊन पोहोचले व सामाजिक कार्यकर्ते श्याम धानके, पंडीत मसणे, काथोड देसले यांच्या उपस्थितीत वाटप केले. त्याचबरोबर खातिवली जवळील शुभवास्तू गृहसंकुलात राहणाऱ्य...

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये - राज्य सरकार

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे टाळेबंदी करण्यात आहे. तसेच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच काहींच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश केंद्र सरकारनं जारी केले आहेत. त्याचवेळी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागानेही एक परिपत्रक काढून हे शुल्क भरण्यास एक वर्षाची मुदत वाढ दिली आहे. राज्यातील कोरोना साथीची सद्याची परिस्थिती, संपूर्ण हालचालीवर घालण्यात आलेली बंदी, पर्यायाने नागरिकांना जाणवणारी पैशाची उपलब्धता याबाबी विचारात घेता सर्व मंडळाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विनंती या परिपत्रकाद्वारे करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची आणि आगामी वर्षाची फी घेताना सहानुभूती दाखविणे आवश्यक आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात शुल्क भरण्याची सक्ती करु नये, असे आदेशही राज्यसरकारकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी क...

शुभमंगल विश्राम

मंडपवाले, बेंजोवाले, कॅटरर्स, आर्थिक अडचणीततर कपडे, ज्वेलर्सवाले गोत्यात मुरबाड प्रतिनिधी : कोरोनाच्या साथीमुळे यंदा जमलेली लग्न कार्य पुढच्या वर्षी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.यामुळे मंडप,स्वयंपाकी,बेंजो,वाहनधारक,यांचा होणारा व्यवसाय बुडून आर्थिक अडचणीची शक्यता निर्माण होणार आहे.तसेच यंदाची होणारी लग्न पुढील वर्षी होणार असल्याने आणि पुढील वर्षीची होणारी लग्न कार्य यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळी ची धावपळ वाढणार आहेतसेच दरवर्षी ग्रामीण भागात एप्रिल व मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्न कार्य पार पडत असतात.तसेच या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांसाठी मंडप,हॉल,बेंजो, बँड,तसेच वधू व वर मंडळींसाठी येण्या जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येते.तसेच लग्नसराईत कपडे आणि दागिने खरेदी करतात.तसेच यावर्षी कोरोना व्हायरस च्या पसरलेल्या साथीमुळे लग्न कार्य,पुढील वर्षी पार पाडली जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत.तसेच यामुळे व्यावसायिकांचा धंदा बुडाला असून आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

थ्रोट स्वप चाचणी सरसकट फकट करण्याची मनसेचे मागणी

ठाणे : संपूर्ण देशात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे, ठाणे शहरातही काहीरुग्ण हे कोरोनाबाधित आढळले असून काही नागरिकांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे. घसादुखीची (थ्रोट स्वप) चाचणी केल्यानंतर या आजाराचे निदान केले जात आहे. बहुतेक नागरिकांना कोरोना व्हायरस ची लक्षणं दिसून येत नाहीत (सायलेंट कॅरियर्स ) म्हणतात त्याला पण त्याची चाचणी केल्यानंतरच रिपोर्ट मध्य पासिटीव्ह दिसून येत आहेत. मध्ये पॉसिटीव्ह दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी मोठ्या चॅनेल च्या पत्रकारांना कोरोना ची लागण झाली त्यांना सुद्धा कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आली न्हवती मात्र त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोना व्हायरस ची लागण झाल्याची निदर्शनास आले. त्यात ही चाचणी करण्याकरिता महापालिकेकडून ४५०० रुपये इतके शुल्क आकारण्यात येत असून सद्यस्थीतीत नागरिकांना ही बाब परवडणारी नसून शासनाच्या धोरणानुसार ही चाचणी महापालिकेने मोफत करावी अशी मागणी मनसेचे ठाणे शहर सचिव प्रदीप सावड प्रदीप सावर्डेकर यांनी महापालिका आयुक्त श्री विजय सिंघल साहेब यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून कळविले आहे." सध्या सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाण...

साठविलेल्या पुंजीतून १ लाख ११| हजाराची मदत

मुरबाड : वयाच्या ९० व्या वर्षी कोरोना मुळे अडचणीत सापडलेल्या वैश्य बांधवाना आयुष्यभर साठविलेल्या पुजीतून १लाख ११ हजार १११ रूपयाची मदत दऊन मातृत्वाचदर्शन घडवले आहे. ठाणे - पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाज संघात भीष्म पितामह म्हणून ओळख असलेलेके.ग. खीसमतराव यांची अण्णा बाबा म्हणून ओळख आहे. कोरोना मुळे अर्थीक अडचणीत सापडलेल्या वैश्य बांधवांना मदत व्हावी या उद्देशाने वयाच्या ९० व्या वर्षी साठविलेल्या पंजीतन ही मदत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. कीती-कीती छान-छान या घोषणेने अंण्णा बाबांची बच्चे कंपनीत ओळख आहे.

साठविलेल्या पुंजीतून १ लाख ११हजाराची मदत

मुरबाड : वयाच्या ९० व्या वर्षी कोरोना मुळे अडचणीत सापडलेल्या वैश्य बांधवाना आयुष्यभर साठविलेल्या पुजीतून १लाख ११ हजार १११ रूपयाची मदत दऊन मातृत्वाच| दर्शन घडवले आहे. ठाणे - पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाज संघात भीष्म पितामह म्हणून ओळख असलेले| के.ग. खीसमतराव यांची अण्णा बाबा म्हणून ओळख आहे. कोरोना मुळे अर्थीक अडचणीत सापडलेल्या वैश्य बांधवांना मदत व्हावी या उद्देशाने वयाच्या ९० व्या वर्षी साठविलेल्या पंजीतन ही मदत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. कीती-| कीती छान-छान या घोषणेने अंण्णा बाबांची बच्चे कंपनीत ओळख आहे.

शंभर बाटल्या रक्त जमा रक्तदानाला चांगला प्रतिसाद

बदलापूर : संवेग फाऊंडेशन या सामाजिकसंघटनेच्या पुढाकाराने आणि मुंबई येथील सेंट जॉर्ज रूग्णालय यांच्या सहाय्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शंभर बाटल्या रक्त जमा करण्यात आले. बदलापूर पश्चिमेतील पाटील मंगल कार्यालय येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरात रक्ताचा असलेला तुटवडा आणि सुरु असलेली संचार बंदी यामुळे विविध आजारांच्या रूग्णांना रक्ताची गरज अधिक लागत असल्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. संवेग फाऊंडेशनच्या सदस्यांनी केलेल्या आवाहनानंतर बदलापरकरांनी उत्स्पर्तपणे रक्तदानासाठी नोंदणी केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर राखत प्रत्येक तासाला २५ अशा रक्तदात्यांना ११ ते ३ या वेळेत बोलवण्यात येत होते. त्यानुसार १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. अतिशय कमी वेळेत रक्तदात्यांनी दिलेला प्रतिसादाबाबत आयोजक संवेग फाऊंडेशनचे प्रमुख श्रीधर पाटील यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.

मुरबाड बाजारपेठेत ग्राहकांची तुडुंब गर्दी सोशल डिस्टंक्शीनचा फज्जा!

मुरबाड : सलग चार दिवसांच्या संपूर्ण लाक डाऊन नंतर आज १५ तारखेला मुरबाड शहरात सकाळी बाजारपेठ उघल्यानंतर ग्राहकांनी किराणा सामान, भाजीपाळा, दूध खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळाली. या वेळी किराणा मालाचे मोठे व्यापारी यांच्या कडे लोकांनी प्रंचड गर्दी केली होती. या वेळी सोशल डिस्टंक्शीनचे कोणतेही नियम पाळले जाताना दिसत नाही. आजपर्यंत मुरबाड कोरोनापासून मुक्त झाला असला तरी अशा प्रकारची बाजारपेठेमध्ये होणारी गर्दी पाहता भविष्यात मुरबाड करांसाठी धोक्याची घंटा होऊ शकते. सध्या मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. कल्याणडोंबिवली मधे रोज नविन रुग्ण सापडत आहेत अशातच मुरबाड मधील नागरिकांनी शासनाचे नियम पाळले नाही तर भविष्यात मुरबाडकरांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल यात शंका नाही.

गॅस सिलेंडर देऊन “सक्षम"ने दिला रिक्षा चालकांच्या कुटुंबियांना आधार

अंबरनाथ : कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊन परिस्थितीमध्यो हातावर पोट असणान्या रिक्षा चालकांची परिस्थिती बिकट झाली आहे. रोज कुठेना कुठे अन्नधान्य मिळते. पण ते शिजवायचे कशावर असा प्रश्न रिक्षा चालकांच्यापुढे उभा राहिला आहे. ही समस्या ओळखन अंबरनाथच्या सक्षम सामाजिक संघटनेच्या वतीने २० जणांना गॅसचे सिलेंडर देऊन त्यांना दिलासा दिला आहे. ___ संघटनेचे अध्यक्ष तुषार गांगुर्डे, महेश चिकणे, विकी जाधव या युवकांनी मित्र, नातेवाईक नावाने गॅस यांच्या सहकार्यातून अंबरनाथच्या एका अधिकृत गॅस कंपनीमध्ये अंबरनाथच्या बार पाडा , राहुलनगर महालक्ष्मीनगर यासारख्या ठिकाणच्या रिक्षाचालकांच्या नावाने गॅस एजन्सीकडे जाऊनपैसे भरले आणि त्यांना सिलेंडर मिळवून दिले. यामुळे गरजू रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे याखोरीज पाच रिक्षा चालकांना धान्य वाटप देखील केले.

लॉकडाऊनच्या काळात कोंकण विभागात शासनामार्फत पुरेसा धान्य पुरवठा

नवी मुंबई : कोंकण विभागात मंजूर १०५ शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. २२ हजार ७५४ थाळ्यातून लोकांना लाभ दिला जातो अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे. १०५ केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्यात एका वेळेस २२ हजार ७५४ थाळ्यांची विक्री केली जाते. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपायोजना केल्या आहेत. राज्यातील कोणीही माणूस उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन केंद्रासह सामुहीक भोजन व्यवस्था निर्माण केली आहे. कोंकण विभागात जिल्हा निहाय शिवभोजन केंद्रांची माहिती अशी आहे. ठाणे २ केंद्र ४०० थाळया, पालघर १२ वेंद्र २ हजार १०० थाळ्या, रायगड २४ केंद्र २ हजार थाळ्या, रत्नागिरी १४ केंद्र १ हजार ३५० थाळ्या, सिंधुदूर्ग ११ केंद्र ७५० थाळ्या अशी कोंकण विभागात एकूण ६३ शिवभोजन केंद्र व ६ हजार ६०० थाळ्यांना मंजूरी मिळाली असून एमटीआरए (मुंबई-ठाणे रेशनिंग एरिया) ला ४२ केंद्र १६ हजार १०० थाळ्या मंजूर झाल्या आहेत. या शासनाच्या निर्णयानुसार शिवभोजन केंद्रातून गरजूंना जेवण दिले जात आहे. शिधा वाटप दूकानांमार्फत ३२ हजार २८१ मॅट्रीक टन धान्याचे वाटप कोंकण विभागातील राष्ट्रीय अन्नसुरक...

व्हॉटसअॅप मेसेज फॉरवर्ड करताय, आधी महाराष्ट्र सायबरची मार्गदर्शिका वाचा!

CIA मुंबई : कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर सध्या चुकीचे मेसेज शेअर होत आहेत. विशेषतः व्हाटसअपवर अफवा पसरवणारे चुकीचे मेसेज, फोटो, व्हिडीओ, पोस्ट पाठवल्या जात आहेत. या पार्श्वभीमीवर महाराष्ट सायबर सेलने सोशल मीडियासाठी विशेष मार्गदर्शिक जारी केला आहे. सर्व सोशल मीडिया विशेषत: व्हॉटस्अॅपवरील सर्वग्रुप, त्यांचे निर्माते, अडमिन आणि सदस्यांनी याचं पालन करण्याचं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. गृहमंर्त्यांनी यासंदर्भात टवीट करुन माहिती दिली आहे. कोरोनाला धार्मिक रंग देत समाजात अशांतता पसरेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात असल्याचंही अनिल देशमुख सांगितलं. _अनिल देशमुख म्हणाले की, सध्याच्या काळात सोशल मीडिया हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून आपल्या राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. सोशल मीडियावर या संदर्भात चुकीची माहिती, दहशत आणि भीती पसरवणाऱ्या बातम्या समाजात पसरु नयेत, कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक पसरवलेल्या मेसेजद्वारे जातीय तेढ निर...

नांदेड आरोग्य यंत्रणा करतेय मिशन मोडवर काम...

नांदेड शहर म्हटले की डोळ्यासमोर येते शीख बांधवांचे धार्मिक स्थळ तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारामध्ये मत्था टेकण्यासाठी अनेक नागरिक पंजाब आणि हरियाणा मधून येत असतात. देशात २३ मार्चनंतर लॉकडाऊन झाल्याने नांदेडमध्ये आलेल्या नागरिकांची सोय केली. यामध्ये तीन हजार सातशे पंचावन्न (३७५५) नागरिकांची सोय गुरुद्वारा बोर्ड आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. या दरम्यान सर्व संगत मधील यात्रेकरुंचे जवळपास ३ हजार ७५५ जणांची आरोग्य तपासणी नांदेड महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने केली. प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी तीन दिवस सलग चार टीम काम करीत होत्या. यासाठी ताप तपासणीसाठी थर्मल गनचा वापर करण्यात आला होता. यात्रेकरूंची आरोग्य तपासणी करून तसेच महानगरपालिकेच्या क्षेत्रात (८३५५) आठ हजार तीनशे पंचावन्न नागरिकांना शहरी भागात घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांची दैनंदिन भेट देवून आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या, आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकारी यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी विषयी घरोघरी जाऊन विचारपूस केली जात आहे. नांदेड शहरात अनेक परदेशी नागरिकांना देखील वि...

खर्डीत लॉकडाऊनचे तीन तेरा

खर्डी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉक डाउन आहे.याच पार्श्वभूमीवर खर्डीत रोज सकाळी ८ ते २ दरम्यान अत्यावश्यक सेवेची सर्वच दुकाने उघड़त असल्याने परिसरातील खेडयापाड्यातुन मोठ्या प्रमाणावर लोक खरेदीसाठी येत असल्याने गर्दी होत आहे.त्यामुळे शासनाने दिलेले कोणतेही आदेश न पाळता व सोशियल डिस्टनिंग न ठेवता खरेदी-विक्री करण्यात येत असल्याने कोरोनाचा प्रादर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून खर्डीतील आपत्ती व्यवस्थापन कमीटी व ग्रामपंचायतच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून लोक बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. खर्डीत ३ कोरोना संशयित रुग्णाना होमक्वारंटाइन करण्यात आले असून सुद्धा स्थानिक नागरिक कोरोना बाबत खबरदारी घेत नसल्याने स्थानिक प्रशासन हतबल झाले आहे.ग्रापं मार्फत स्पीकर द्वारे वारंवार सूचना करून सुद्धा बाजारातील लोक सूचनांचे पालन करतांना दिसत नाही व ग्रापं कोणावरही कारवाई करायला धजावत नाही त्यामुळे व्यापारी व ग्राहक कोणालाही जुमानत नसल्याने जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाची महसूल व पोलिसामार्फत अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

स्वातंत्र्य सैनिक रा. वि. भुस्कुटे यांचं निधन

अंबरनाथ : अंबरनाथ मधील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व | निवृत्त तहसीलदार श्री. रामचंद्र | विनायक उर्फ रा. वी. भुस्कुटे (९५) यांचे माणगाव येथे | मुलीच्या घरी पहाटे साडेचारच्या | दरम्यान वद्धापकाळाने निधन | झाले. त्यांच्या पश्चात पत्नी | विमल, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नात पणत असा परिवार आहे. __कोरोनाच्या संचार बंदीच्या पार्शवभूमीवर, दुपारी त्यांच्या | पार्थिवावर माणगाव येथे भावपूर्ण वातावरणात सन्मानपूर्वक, | मोजक्या सात ते आठ लोकांच्या | | उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार | करण्यात आले. माणगावच्या | | उपविभागीय अधिकारी प्रशाली | जाधव दिघावकर, तहसीलदार प्रियंका कांबळे यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून भुस्कुटे यांच्या पार्थिवावर पुष्पमाला अर्पण केली. सर्वहारा जन आंदोलनाच्या उल्काताई महाजन यावेळी उपस्थित होत्या. रा. वि. भुस्कुटे हे अनेक वर्षांपासून अंबरनाथ मध्ये वास्तव्यास होते. अलीकडेच ते पुणे नंतर वांगणी आणि काही दिवसांपूर्वी माणगाव येथे आपल्या मुलीकडे वास्तव्यास गेले होते. महसूल खात्यात त्यांनी ३३ वर्षे सेवा केली. ३१ ऑकटोबर १९८३ रोजी तहसीलदार पदावरून ते निवृत्त झाले होते. सेवा निवृत्ती नंतरही...

खर्डीत लॉकडाऊनचे तीन तेरा

खर्डी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉक | डाउन आहे.याच पार्श्वभूमीवर खर्डीत रोज सकाळी ८ ते २ | दरम्यान अत्यावश्यक सेवेची सर्वच दुकाने उघड़त असल्याने परिसरातील खेडयापाड्यातुन मोठ्या प्रमाणावर लोक | खरेदीसाठी येत असल्याने गर्दी होत आहे.त्यामुळे शासनाने | दिलेले कोणतेही आदेश न पाळता व सोशियल डिस्टनिंग न | ठेवता खरेदी-विक्री करण्यात येत असल्याने कोरोनाचा | प्रादर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून खर्डीतील | आपत्ती व्यवस्थापन कमीटी व ग्रामपंचायतच्या सूचनेकडे | दुर्लक्ष करून लोक बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. खर्डीत | ३ कोरोना संशयित रुग्णाना होमक्वारंटाइन करण्यात आले | असून सुद्धा स्थानिक नागरिक कोरोना बाबत खबरदारी घेत | नसल्याने स्थानिक प्रशासन हतबल झाले आहे.ग्रापं मार्फत | स्पीकर द्वारे वारंवार सूचना करून सुद्धा बाजारातील लोक | सूचनांचे पालन करतांना दिसत नाही व ग्रापं कोणावरही | | कारवाई करायला धजावत नाही त्यामुळे व्यापारी व ग्राहक | कोणालाही जुमानत नसल्याने जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाची | | महसूल व पोलिसामार्फत अंमलबजावणी करण्यात यावी | अशी मागणी जोर धरु लागली आहे.

जिल्हा बंदी मुळे अडकलेल्या परभणी येथील महिलेची मुरबाड येथे सुखरूप प्रसूती । 

मुरबाड : जिल्हा बंदी मुळे मुरबाड मध्ये अडकलेल्या परभणी येथील एका महिलेने मुरबाड ग्रामीण रुग्णालयात कन्या रत्नास जन्म दिला नवजात बालिका व तिची आई या दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरानी सांगितले सोनाली योगेश जाधव रा जालना असे या महिलेचे नाव आहे. ___ मुरबाड पोलिसांनी ३० मार्च रोजी वाशी येथून बेचाळीस लोकांना परभणी येथे घेऊन निघालेला टेंपो ताब्यात घेतला होता तेव्हा पासून गाडीतील सर्व लोकांना कुणबी समाज हॉल मध्ये ठेवण्यात आले आहे त्यामध्ये दोन गर्भवती महिला , तीन महिन्याची छोटी मुलगी , सत्तर वर्षाची वृध्द महिला , सतरा लहान मुले व काही महिलांचा व पुरुषांचा समावेश आहे. ___या सर्व लोकांची सुरुवातीला वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती त्यानंतर बुधवारी ता १५ पुन्हा तपासणी केली या सर्व लोकांची प्रकृती उत्तम असल्याचे मुरबाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर बनसोडे यांनी सांगितले.

ठाणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांना टेलीमेडिसिन अंतर्गत मिळणार तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत व्हिडिओ कॉलद्वारे उपचार

कोरोना संभाव्यता आणि कोरोना व्यतिरिक्त इतर सर्व आजारांवर मिळणार वैद्यकीय सल्ला   ठाणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादविाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर व जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ठाणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांसाठी टेलीमेडिसिन अंतर्गत स्वत:च्या घरातूनच थेट व्हिडिओ कॉल द्वारे डॉक्टरांशी संपर्क साधून ऑनलाईन तपासणी आणि उपचार करण्याची सुविधा सुरु जिल्हा बंदी मुळे अडकलेल्या करण्याचा निर्णय राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी घेतला आहे. ही सुविधा ठाणेकरांसाठी आज सोमवार, १३ एप्रिल पासून उपलब्ध होणार आहे. दिल्ली येथे आम आदमी मोहल्ला क्लिनिक योजना यशस्वीपणे राबविलेल्या MedonGo Health Pvt Ltd आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा अशा प्रकारचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम ठरणार आहे. ठाणे शहर - जिल्ह्यातील नागरिकांना कसा घेता येणार लाभ? गुगल प्ले स्टोर वरून MedonGo smart health "हे आप्लिकेशन डाउ...

महाराष्ट्रात एमसीए सीईटी २०२० परीक्षा स्थगित

मुंबई : लॉकडाऊन आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. सद्य:स्थितीची समीक्षा करण्यात येणार असून नव्या तारखांची घोषणा अधिकत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात १३ ते २३ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सीईटी होणार होती. परंतु लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याने ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा कक्षानेही ५ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान होणारी जेईई पुढे ढकलण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता.

शासनाच्या मोफत धान्य योजनेचे वाड्यात वाटप शेवटच्या घटकापर्यंत धान्य पोहचविण्याचा तहसीलदारांचा प्रयत्न

इमेज
वाडा : सध्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी जीवनावश्यक वस्तू स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याचे पयत्न शासनाच्या वतीने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील शहरी तसेच गामीण भागात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य योजनेचे वाटप सुरू करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी पारदर्शक कारभारासाठी तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेचे काम सुरू असून कोणत्याही प्रकारे अपहार होवु नये यासाठी संबंधित दुकानदारांना सुचना देऊन सदरचे अन्न धान्य हे शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्याचा या मागचा हेतू आहे. शिधा पत्रिकेतील प्रत्येक सदस्यास ५ किलो तांदूळ मोफत यात अंत्योदय कार्डधारक, बी.पी.एल. कार्डधारक या कार्ड धारकांसाठी ही मोफत तांदूळ वाटप योजना असून याच कार्ड धारकांसाठी ३ रुपये प्रति किलो दराने तांदळ तर २ रूपये प्रति किलो दराने गहू ही योजना देखील सुरू आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा फटका मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाना बसू नये यासाठी शासनाचे पयत्न सुरू असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्यात सुमारे ९ हजार ७५५ अंत्योदय कार्ड धारक असून प्राधान्य कार्ड धारक १७...

...तिच्यासाठी वनअधिकारी ठरले देवदूत

शहापूर : किन्हवली परीसरातील बर्डेपाडा हद्दीत शेतमाळावर मुक्कामी असलेल्या धनगर वस्तीत शेळ्या मेंढ्यांच्या कळपातील छोट्या कोकरांसोबत खेळत असलेल्या अनुष्कावर भर दुपारी रानडुक्कराने हल्ला करून तिच्या मांडीचे लचके उपटले.तिचे पालक मदतीसाठी याचना करत होते.लॉकडाऊन मुळे रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते,अती रक्तस्त्रावाने ती अर्धमेली होऊन पडली असतानाच शहापूर वन विभागाचे किन्हवली-चिखलगाव येथील वनपाल विकास लेंडे व वनरक्षक चिंतामण निंबाळकर यांनी शासकीय गाडीने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेऊन तिचे प्राण वाचविले.तिच्यासाठी देवदूत ठरलेल्या त्या वनाधिकार्याचे मात्र कौतुक होत आहे. किन्हवली परीसरातील बर्डपाडा हद्दीत एका शेतात सुमारे विस दिवसांपासून एक धनगराचे कुटुंब आपल्या शेळ्या, मेंढ्यांसह वस्ती करून राहता आहेत. जुन्नर(ता.पुणे) येथून आलेल्या या कुटुंबासोबत त्यांची पुतणी कु.अनुष्का ठोंबरे (वय ७) हि सुद्धा राहते. मंगळवारी (दि.१४) दुपारी१२ वाजता ती आपल्या शेळ्यांच्या कळपातील छोट्या छोट्या कोकरांसोबत खेळत होती. ईतक्यात समोरच्या झुडपांतून एक रानडुक्कर सुसाट धावत आले व अनुष्कावर हल्ला करत डाव्या मांडीचा लचका ...

मुरबाड पोलीस ठाणे झाले सॅनिटायजरींग

मुरबाड : लॉक डाऊन मधे स्व:ताच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र ड्यूटी करणारे महाराष्ट्र पोलीसांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या पोलिसांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये. त्यांच्या आरोग्याची सूद्धा काळजी घेतली पाहीजे म्हणून मुरबाड मधील श्री बाळाजी इंटरप्रायजेस यांनी मुरबाड पोलीसांच्या सुरक्षिततेसाठी ॲटोमेटीक सॅनिटायझर युनिट स्व:ताच्या खर्चाने मुरबाड पोलीसस्टेशनच्या प्रवेश द्वारावर बसविण्यात आले आहे. या मुळे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्यात येणारा प्रत्येक नागरिक सूद्धा सॅनिटायजरींग होणार आहे. . यावेळी उपविभागीय पोलीस आधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पोलीस निरिक्षक दत्तात्रय बोराटे, गोपनीय विभागाचे विनायक खेडकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. बाळाजी इंटरप्रायजेस चे या वेळी मुरबाड पोलीसांकडून आभार व्यक्त करण्यात आले. CENTRY

डे-नाईट कर्तव्य बजावणाया पोलिसांवर फुलांचा वर्षाव : नागरिकांनी ठोकले सॅल्युट

उल्हासनगर उन्हातान्हाची पर्वा न करता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी डे-नाईट रोडवर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर दोन फाऊंडेशनच्या पुढाकाराने फुलांचा वर्षाव करण्यात आला असून नागरिकांनी रक्षकांना सन्मानाने सॅल्युट ठोकून त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती दिली आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही परिसर हे संवेदनशील आहेत.लॉक डाऊनमध्ये या परिसरात शांतता प्रस्थापित करतानाच, बाजारपेठा तसेच हद्दीतील सर्व प्रमुख रोडवर डे-नाईट पहारा देऊन दुचाकीस्वारांना भावनिक आव्हान करून त्यांना परत माघारी पाठवणाऱ्या आणि आवाहन करूनही प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्या शेकडोंच्या संख्येने दुचाक्या जप्त करून विठ्ठलवाडी पोलिसांनी हद्दीतील परिस्थिती कमालीची नियंत्रणात आणलेली आहे. डे-नाईट कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांच्या या कार्याचे जाहीर कौतुक करण्यासाठी हिराली फाऊंडेशनचे ऍड. पुरुषोत्तम खानचंदानी, सरिता खानचंदानी, सिटीजन फाऊंडेशनचे प्रदिप कपूर, मुकेश शेवानी यांच्या पुढाकाराने सहाय्यक पोलीस आयुक्त डी.डी. टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार खिडकीकर, सहाय्यक पोलीस निरीक्ष...

कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे, वैद्यकीय विमाही बंधनकारक

मंबई : देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे लॉकडाऊन-२ लागू करण्यात आले आहे. कोविड -१९ ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातली कार्यालये, कारखाने आणि आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच देशातील अनेक जिल्ह्यात रेड, ऑरेज आणि ग्रीन झोन जारी केले आहेत. जे जिल्हे धोक्याच्या स्थितीत आहेत. तेथे लॉकडाऊन-२ लागू असणार आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात उद्योगधंदे, आस्थापना कार्यालये आणि कारखाने सुरु करण्याची परवागी मिळणार आहे. त्या ठिकाणी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर कडक नियम असणार आहेत. त्याचे पालन करणे हे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे, वैद्यकीय विमाही बंधनकारक असेल. कार्यालये सुरु करण्यापूर्वी या सर्व इमारतींचं प्रवेशद्वार , भोजनालय, लिफ्ट आणि प्रसाधनगृह पूर्णपणे निर्जंतुक करणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्या-जाण्यासाठी वाहन उपलब्ध करणे आवश्यक असून, वाहनाच्या एकूण प्रवासी क्षमतेच्या केवळ ३० ते ४० टक्के इतकेच कर्मचारी एका वेळी वाहनातून प्रवास करु शकतील. कार्यालयाच्या परिसरात प्रवेश करणारे प्रत्येक वाहन फवारा मारुन निर्जंतुक करणे तस...

रिक्षा चालकांना आर्थिक मदत करा!

आमदार किसन कथोरे चे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना साकडे बदलापूर : कोरोना आजारामुळे सर्वत्र संचारबंदी व लॉक डाऊन आहे, या परिस्थितीत रोज रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या ची आज उपासमार होत आहे, रिक्षा बंद, त्यामुळे धंदा ठप्प रिक्षा खरेदीचे हप्ते थकतात यामुळे हजारो रिक्षा चालकांची अवस्था हलाखीची बनत आहे, या रिक्षा चालकांना आर्थिक मदतीसाठी स्वतंत्र पॅकेज द्यावे अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे, बदलापूर शहरासह मुरबाड, कल्याण, अंबरनाथ तालुक्यात अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन रिक्षा खरेदी करून व्यवसाय सुरू केले आहेत. आज लॉकडाऊन मुळे रिक्षा व्यवसाय पूर्ण पणे ठप्प झाला आहे, त्यामुळे रोजच्या दैनंदिन उदरनिर्वाह च्या प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. एकीकडे रोजच्या जगण्याची विवंचना तर दुसरीकडे व्यवसाय नाही म्हणून कर्ज हप्ते फेडण्यासाठी चे संकट, या अवस्थेत काय करायचे हा यक्ष प्रश्न रिक्षा चालकाना सतावत आहे, सरकारने त्यांना ठराविक रकमेची मदत करावी, असे किसन कथोरे यांनी आपल्या मागणी पत्रात म्हटले आहे, लॉक डाऊन चा कालावधी वाढला आहे, त्यामुळे रिक्षा व्यवस...

भाजीबाजार नियमितपणे सुरु होणार

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रामध्ये कोरोना विषाणचा (कोव्हीड-१९) प्रादर्भाव मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व भाजीमंडई | भाजीपाला बाजार। फळबाजार व सर्व फळे तसेच भाजीपाला दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिनांक १५ एप्रिल पासुन संपुष्टात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. भाजीपाला बाजार / फळबाजार व सर्व फळे तसेच भाजीपाला दुकाने वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांना विविध निर्देश श्री नार्वेकर यांनी दिले आहेत. संबंधीत महानगरपालिका / नगरपालिका / नगर पंचायत यांचे कार्यक्षेत्रातील प्रभाग (वार्ड) निहाय लोकसंख्या लक्षात घेऊन फळे / भाजीपाला बाजाराचे विकेंद्रीकरण (जो शहरात एकाच ठिकाणी भरतो त्याऐवजी तो शहरातील प्रभागानुसार किंवा दोन प्रभागासाठी एका ठिकाणी) करावे व अनावश्यक गर्दी टाळावी. त्या ठिकाणी घावक व्यापारी हे किरकोळ विक्रेत्यांना विक्री करु शकतील. सहकार विभागाने (श्री. शहाजी पाटील, जिल्हा उपनिबंधक यांनी सोसायटीची एकत्रित मागणी घेऊन घाऊक दुकानदार यांचे मार्फत आवश्यकतेनुसार सोसायटी ...

विट्ठलवाडी पोलिसांच्या वर्दीवर सॅनिटायझर स्प्रे

उल्हासनगर : पोलीस हे कोरोना प्रादुर्भावाचा फैलाव होऊ नाही म्हणून नागरिकांना बाहेर पडू नये असे आवाहन तसेच दुचाकीस्वारांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस वर्ग डे-नाईट ऑन ड्युटी कार्यरत आहे.ते हाताला सॅनिटायझरचा वापर करतात. आता पोलिसांची संपूर्ण वर्दी सॅनिटायझरयुक्त होण्याकरिता विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी सॅनिटायझर स्प्रे कॅबिन तयार केली आहे. पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांच्या उपस्थितीत सॅनिटायझर स्प्रे कॅबिनचे उद्घाटन करण्यात आले आहे.सहाय्यक पोलीस आयुक्त डी.डी. टेळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्यासोबत पोलीस ठाण्याचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांच्या पुढाकाराने मध्यवर्ती पोलीस ठाण्यातही सॅनिटायझर स्प्रेची कॅबिन तयार करण्यात आली आहे.

लाकडाऊन-२

नवी दिल्ली : लॉकडाऊन -२ बाबत गृह मंत्रालयाने आज एक मार्गदर्शक सुचना प्रसिद्ध केली आहे. या मार्गदर्शक तत्वानुसार ना विमान चालणार, ना मेट्रो, ना बस. याशिवाय कृषी संबंधित कामांनाही सवलत देण्यात आली आहे. यासह कोरोना वॉरियर्सना ट्रेन किंवा बसमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने मुख्य सचिव आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठविलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कृषी संबंधित तत दण्यात यणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर औद्योगिक कार्यांवरील बंदी कायम राहील. सर्व प्रकारच्या परिवहन सेवांवर बंदी कायम राहिल. शाळा व महाविद्यालयेही बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक असेल. काय बंद राहणार? सर्व देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय उड्डाणे, रेल्वे (प्रवासी वाहतुकीसाठी), सर्व शैक्षणिक-प्रशिक्षण-प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र, औद्योगिक आणि व्यावसायिक प्रकल्प, हॉटेल, टॅक्सी, ऑटो रिक्षा, सायकल विट्ठलवाडी रिक्षा, सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम, क्रीडा संकुल, पोहणे तलाव, बार, थिएटर, कोणताही कार्यक्रम, सर्व धार्मिक स्थान बद राहताल. याशिवाय कोणत्याही अंत्यसंस्कारात २० नाहीतहन ...

ग्रामीण भागात आरोग्य तपासण्या सुरु करा : आमदार किसन कथोरे

टिटवाळा : कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. कोरोना आजाराचे रुग्ण शहरी भागात वाढत आहेत, मात्र ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कुठे ही कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झालेला नाही, सद्यस्थितीत ग्रामीण नागरिक संभ्रमावस्थेत आहे. त्यातच, ग्रामीण भागातील खाजगी दवाखाने पुर्णत: बंद आहेत. या परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्यसरकार ने ग्रामीण भागात घरोघरी जाऊन आरोग्य तपासण्या सुरू कराव्यात यामुळे भीतीमय वातावरणात वावरणाया ग्रंमीण नागरिकांना मोठा दिलासा मिळेल,याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला आहे. तसे पत्र ही त्यांना दिले आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग आज ही कोरोना मुक्त आहे. उद्या ही कोरोना मुक्त राहण्यासाठी कोरोना व्हयरस च्या नावाखाली तपासण्या कारावयत असे ही किसन कथोरे यांनी सांगितले.

सभापती सौ. वीणा गणेश जाधव याज कडुन प्रभाग क्र. ३८ रामबाग सिंडिकेट भागातील गरजू, हमाल, रिक्षा चालक, मजूर, घरकाम करणाऱ्या महिला यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

इमेज
कल्याण : कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सौ.वीणा गणेश जाधव (सभापती महिला बाल कल्याण समिती, कल्याण) यांच्या वतीने प्रभाग क्र. ३८, रामबाग - सिंडिकेट भागातील मावळ विकास मंडळातीलहनुमान सेवा मंडळ सिंडिकेट,मुरारबाग परिसर,इराणी चाळ, रामबाग परिसर येथील गोरगरीब गरजू, हमाल,मजूर,रिक्षा चालक,घरकाम करणाऱ्या महिला,यांना जीवनावश्यक वस्तू (५किलो गहू पीठ,तेल व ग्लूकोज बिस्किट) यांचे वाटप या भागाचे पोलीस निरीक्षक श्री कंभार साहेब पोलीस श्री.चव्हाण साहेब व प्रभागातील नागरीक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी,मास्क लावावेत, हात स्वच्छ धुवावेत, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये,एकमेकांत अंतर ठेवून बोलावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले. कोरोनाचे संकट आपण एकजुटीने परतवून लावू या, घरातच राहून शासनाला मदत करू या.

संजय गांधी निराधार योजना - खात्यांवर एक रुपयाही जमा नाही

मुंबई : कोरोनाचे संकट आणि त्यात असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील लाखो जनता अडचणीत सापडली आहे. अशात मागील दोन महिन्यांपासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाखो खात्यांवर एकही रूपया जमा झाला नाही. त्यामुळे, राज्यभरात गोरगरीब, निराधारांची मोठी तारांबळ उडाली आहे. बँकांच्या अनेकदा चकरा मारूनही आपल्या खात्यावर एकही रूपया न आल्याने याविषयी संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात निराधार, वृध्द, अंध, अपंग, विधवा, अत्याचारित महिला, मानसिक आजाराने ग्रस्त, अनाथ मुले आदींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून प्रतिमाह एक हजार रूपयाच्या अनुदानाचा लाभ दिला जातो. मात्र, मागील दोन महिन्यांपासून लाखो लाभधारकांच्या खात्यात एक रूपयांचीही रक्कम जमा झाली नाही. त्यांना रोज बँकांचे खेटे मारावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनचे १० लाख ८२ हजार इतके लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना प्रशासनाच्या दिरंगाईचा वेळोवेळी फटका सोसावा लागतो. सरकारने मागील वर्षी या लाभार्थ्यांसाठी ९ हजार १७ कोटी ९० लाख रूपयांची तरतूद केली होती. परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे डिसेंबर महिन्य...

कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात चार ठिकाणी मोफत जेवणाची सुविधा

टिटवाळा : कोरोना व्हयरस च्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे, यास्थितीत ग्रामीण भागातील मोलमजुरी करणारी कुटुंब, तसेच अन्य गोरगरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये यासाठी कल्याण तहसीलदार कार्यालय आणि सामजिक संस्थानच्या मदतीने चार ठिकाणी मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध केली आहे, दररोज या ठिकाणी पाच हजाराहून अधिक नागरिक या भोजनाचा लाभ घेत आहेत, तहसीलदार दीपक आकडे आणि त्यांची महसूल विभागाच्या सर्व टीम कार्यात वेस्थ आहे. ग्रामीण भागात म्हा र ळ , कांबा, गोवेली खंडवली येथे ही मोफत भोजन सुविधा उपलब्ध केली आहे, सर्व केंद्राचा दररोज आढावा तहसीलदार दीपक आकडे घेत आहेतत्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लॉक डाऊन च्या काळात समाधान वेक्त करत आहेत. तालुक्यातील रेशनिंग दुकानादारांनी देखील कोरोना आजाराच्या काळात धान्य वाटप करताना गरजू गरिबांना मदतीचा हात दिला आहे, मामनोली, दहागाव, वाहोली, रायते, म्हसकल, घोटसईयेथील रेशनिंग दुकानदारांनी कार्ड धारक नसलेले, तसेच पिवळी शिधापत्रिका असून धान्य न मिळणाऱ्या गरजूंना धान्य वाटप करून मदतीचा हात दिला आहे. तसेच लोकप्रतिनिधी व स्थानिक संस्थांच्या मद...

आमदार कथोरे साहेबांच्या सौजन्याने आदिवासींना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप

इमेज
मुरबाड : लॉक डाऊन चा कालावधी वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर हातावर पोटभरणारा वर्ग,आदिवासी ,मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या घरात अन्न धान्याची मोठी कमतरता दिसून येत आहे. सध्या सर्व कामधंदे ठप्प असल्याने उत्पनाचे कोणतेही साधन नाही. या आदिवासींची उपासमार होऊ नये म्हणून मुरबाड चे किसन कथोरे यांनी संपूर्ण मतदासंघात सुमारे ८०००/- कातकरी समाजाच्या कुंटुंबांना अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तू पुरविण्याचा संकल्प केला आहे. त्यामधे मुरबाड मधील ४००० हजार कुटुंबे आहेत. या कातकरी कुटुंबांना जिवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम आज जि.प.गट शिरवली येथून सुरुवात करण्यात आली. या वेळी मुरबाड पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय वाघ, भा.ज.पार्टीचे तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, तालुका सरचिटणीस सुरेश बांगर, जगदिश हिंदराव, दाजी टोहके यांच्या हस्ते सोशल टिक्श्टशनचा वापर करुन हे वाटप करण्यात आले.

कुटुंबासह पायी जाणाऱ्या मजुरांना दिला मदतीचा हात

इमेज
वाडा । प्रतिनिधी : वाडा पंचायत समिती, सभापती श्री. योगेश गवा, वाडा तहसीलदार डॉ. कदम सर, कंचाड तलाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने घडले | माणुसकीचे दर्शन- मौजे कंचाड | तलाठी श्री.दत्ता डोईफोडे यांना | दुपारी १८ ते २० माणसे | कुटुंबासमवेत घरगूती सामानासह चालत जाताना दिसले, विचारणा श्री.दत्ता डोईफोडे व कळमखांड केल्यानंतर ते सर्व लोक कामन- डोंगरीपाडा (ता.वसई) येथे वीटभट्टीवर कामासाठी गेलेले व वाहनव्यवस्था नसल्यामुळे तसेच जिल्हा-तालुका सीमारेखा बंद होऊन उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे तेथून अंदाजे १०० किमी खोडाळा-तळ्याचा पाडा (ता.मोखाडा) येथे पायी जात असल्याचे समजले. तात्काळ श्री. दत्ता डोईफोडे यांनी वाडा पंचायत समिती सभापती, श्री.योगेश गवा यांना या परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर श्री.योगेश गवा यांनी स्वत: क्षणाचा विलंब न करता वाडा तहसीलदार डॉ. कदम यांच्यासमवेत कळमखांड (कंचाड) या ठिकाणी पोहोचून कर्तव्यदक्ष राहून सदर अडकलेल्या पायी जाणाऱ्या १८-२० जणांना खोडाळा येथे पोच करण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली.   तसेच जीवनावश्यक वस्तूंचे कीट व मास्क वाटप केले. याप्रसंगी कळमखांड ग्राम.पं.सदस्य, श्री....

आतापर्यंत कुणाला नाही जमले ते मनसे आमदाराने 'करून दाखवलं'!

मुंबई : महाराष्ट्राला कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्याची राजधानी मुंबईही कोरोना व्हायरससाठी केंद्रबिंदू ठरली आहे. मुंबई नजीकच्या उपनगरातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. जो तो आपल्या परिने कोरोना लढ्यात योगदान देत आहेमनसेचे एकमेव असलेले डोंबिवली ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी जे काम केलंय त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या परिसरात कोरोनाबाधितांचा आकडा हा ५० पेक्षा जास्त आहे तर आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाबाधित रुग्णाला थेट मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवावे लागत होते. त्यातही रुग्णाला नेण्यासाठी योग्य सुविधाही नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. हीच बाब लक्षात घेऊन राज पाटील यांनी शहरातील एखादं खासगी रुग्णालय उपचारासाठी ताब्यात घ्यावं असा सल्ला पालिका आयुक्तांना दिला होता. तसंच आपल्या ताब्यातील असलेलं शहरातील आर.हॉस्पिटल पालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल त्यांनी तशी तयारीही दाखवली होती. अखेर आयुक्तांनी राजू पाट...

कोरोना नियंत्रणासाठी नेमलेल्या शिक्षकांना ५० लाखाचे कवच लागू करा

भाजपा शिक्षक आघाडीची राज्य शासनाकडे मागणी मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमलेल्या राज्यातील शिक्षकांना ५० लाखाचे विमा सुरक्षा कवच लागू करावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीने राज्य शासनाकडे केली आहे"भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी याबाबत आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीशिक्षणमंत्री व ग्रामविकास मंत्री तसेच विधानसभा व विधानपरिषद विरोधी पक्ष नेत्यांना पाठविलेल्या पत्रात ही मागणी केली आहे"साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २, ३ आणि अन्वये कोविड १९ या साथरोगाच्या नियंत्रणाकरिता मुंबई महानगरपालिकेने शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात देखील शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत. त्यांना क्वारंटाईन केलेल्या रुग्णावर लक्ष ठेवण्यास सांगितले जात आहे. राज्यात डॉक्टर, नर्स व इतर विभागातील कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा सुरक्षा कवच जाहीर केले आहे तर काही महापालिकांनी १ कोटीचे सुरक्षा कवच लागू केले आहे. कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना मात्र अद्यापही अश्या प्रकारे सुरक्षा कवच जाहीर केले नसून मुंबई ...

आपली जबाबदारी

इमेज
महाराष्ट्रातील मृत्युदर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असला, तरी जास्तीत जास्त मृत्यू ज्येष्ठ व्यक्ती आणि ज्यांना इतरही काही आजार आहेत, अशा लोकांचे झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढते आहे. त्याची स्पष्ट आणि ठोस माहिती देऊन आपण चाचण्याही वाढवल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. लोकांनी आपल्याकडे येऊन चाचणी करून घेण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जाऊन चाचणी करत असल्याचे सांगताना त्यांनी संकटाच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सर्वतोपरी सज्ज असल्याची ग्वाही दिली. मुंबई विमानतळावर जगभरातून प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे सुरुवातीला केंद्र सरकारच्या यादीत नसलेल्या देशातून जे लोक आले, त्यांची तपासणी झाली नसल्याचे स्पष्ट करून महाराष्ट्रातील रुग्णसंख्या जास्त असल्याच्या कारणांचा उहापोह केला. करोनाच्या रुग्णांचा गुणाकार मंद राखण्यात यश मिळवले असले, तरी तो शून्यावर आणण्याचा निर्धार व्यक्त करत जनतेला विश्वास देण्याबरोबरच त्यांच्या सहकार्याचीही अपेक्षा व्यक्त केली आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, हे त्यांचे विधान त्यांच्या प्रारंभीच्या काळातील संकट गंभीर असले, तरी सरकार खंबी...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

इमेज
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.त्यांच्या जन्मावेळी, वडील रामजी सपकाळ महू येथे ब्रिटिशांच्या भारतीय सेनेत नोकरी करत होते. त्यांचे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात ठआंबडवेठ या गावचे होते.त्यांची जयंती जगातील १०४ पेक्षा अधिक देशात साजरी केली जाते." डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्ट्राचार, अनीती, अत्याचार, अन्यायास प्रखर त्यांचा विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड ते मानत असत. ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय भारतीय समाज एकसंघ होणार नाही असे त्याचे मत होते. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठीही त्यांनी अनेक चळवळी केल्या. त्याच बरोबर भारतीय समाजात जातीपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भूमिका बजावली. त्यांनी समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा, मानववंशशास्त्र, शिक्षण,इतिहास, पत्रकारिता, तत्वज्ञान, लेखन, धर्मशास्त्र, आणि नीतिशास्त्र अशा अनेक विद्याशाखेचा सखोल अभ्यास व चिंतन करून भारतीय...