आमदार कथोरे साहेबांच्या सौजन्याने आदिवासींना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप
मुरबाड : लॉक डाऊन चा कालावधी वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर हातावर पोटभरणारा वर्ग,आदिवासी ,मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या घरात अन्न धान्याची मोठी कमतरता दिसून येत आहे. सध्या सर्व कामधंदे ठप्प असल्याने उत्पनाचे कोणतेही साधन नाही. या आदिवासींची उपासमार होऊ नये म्हणून मुरबाड चे किसन कथोरे यांनी संपूर्ण मतदासंघात सुमारे ८०००/- कातकरी समाजाच्या कुंटुंबांना अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तू पुरविण्याचा संकल्प केला आहे. त्यामधे मुरबाड मधील ४००० हजार कुटुंबे आहेत. या कातकरी कुटुंबांना जिवनावश्यक वस्तू पुरविण्याचे काम आज जि.प.गट शिरवली येथून सुरुवात करण्यात आली. या वेळी मुरबाड पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय वाघ, भा.ज.पार्टीचे तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, तालुका सरचिटणीस सुरेश बांगर, जगदिश हिंदराव, दाजी टोहके यांच्या हस्ते सोशल टिक्श्टशनचा वापर करुन हे वाटप करण्यात आले.