आमदार किसन कथोरेनी घेतली कल्याण व आंबरनाथ तालुका खरीप हंगाम पिक आढावा बैठक
___ बदलापूर : कोरोना आजाराच्या वाढता प्रादुर्भाव त्यामुळे ठप्प झालेले जनजीवन या स्थितीत ग्रामीण भागातील काही दिवसांवर येऊन ठेपलेला खरीप हंगाम या हंगामात मतदारसंघातील शेतकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी कोरोना आजारीतल निकष पाळत सामाजिक अंतर ठेवून कल्याण ,आंबरनाथ तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खरीप हंगामाची पूर्व तयारी बी बियाणा चा पुरवठा वेळेत व्हावा. खते व शेती पूरक अवजारे उपलब्ध व्हावीत याबाबत चर्चा करण्यात आली, गत वर्षी पूर सदृश स्थिती, व अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांकडे बी बियाणे उपलब्ध नसतील यासाठी दोन्ही तालुक्यातील खरिपात क्षेत्र लक्षात घेऊन बियाणे पुरवठा करावा, भात पिक शेती शाळांचे गट निहाय नियोजन करणे. शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि पारंपरिक पिकांच्या ऐवजी आधुनिक शेती कशी कारवी याबाबत मार्गदर्शन करा आशा सूचना आमदार किसन कथोरे यांनी याप्रसंगी दिल्या. कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामूळे भातशेती च्या मशागतीची कामे खोळंबली आहेत , ही कामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे लॉक डाऊन संपताच मरेगा मार्फत बांधबंदिस्ती ,आणि शेती चे सपाटीकरण ही कामे सुरू केली जावीत, तसेच फळ उत्पादक, कडधान्य उत्पादक शेतकरयांना सर्वोतोपरी मदत करा. या सूचना श्री. किसन कथोरे यांनी दिल्या. या बैठकीला कल्याण तालुका कृषी अधिकारी शिल्पा निखारे, पंचायत समिती कृषी अधिकारी एस एस संत, आंबरनाथ तालुका कृषी अधिकारी आर एच पाटील, आंबरनाथ पंचायत समिती कृषी अधिकारी सुवर्णा माळी, यांच्या समवेत सहाययक कृषी अधिकारी उपस्थित होते, लॉक डाऊन मध्ये शेतकऱ्यांची खरीप हंगामात गैरसोय होऊ नये यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले.