गरजु व्यक्तीला व विटभट्टी मजूराना दिला मदतीचा हात
शहापुर : दहागांव जवळील विटभट्टी वर काम करणाऱ्या अकरा कुंटूब व खातिवली जवळील शुभवास्तू गृहसंकुलात राहणाऱ्या एका गरीब व्यक्तीला मदतीची गरज असल्याचे माहिती पडल्यावर श्रमजीवी संघटना व शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी तत्काळ मदत मिळवून दिली. दहागांव गावाजवळ एका विटभट्टी वर काम करणाऱ्या अकरा कुटुंब मजुरांना तसेच खातिवली जवळील शुभवास्तू गृहसंकुलात राहणाऱ्या एका व्यक्तीला मदतीची गरज असल्याचे प्रतिनिधी पंडीत मसणे यांच्याकडे माहिती आली. यानुसार श्रमजीवीचे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके तर खातिवली येथील शिवसेनेचे कार्यकर्ते विलास काबाडी यांना याबाबत माहिती सांगितली त्यानंतर दोन्ही व्यक्तीनी सकारात्मक विचार करून मदतीपर सहमती दर्शवित दहागांव येथे श्रमजीवीचे जिल्हा कातकरी उपप्रमुख मालुभाऊ हूमणे, शहापूर ता.सचिव प्रकाशभाऊ खोडका, तालुका युवक सचिव रुपेशभाऊ आहिरे, शहापूर शहर प्रमुख हरिषभाऊ खाटेघरे यांनी धान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच जगदीश देसले यांनी बिस्कीट पूडे घेऊन पोहोचले व सामाजिक कार्यकर्ते श्याम धानके, पंडीत मसणे, काथोड देसले यांच्या उपस्थितीत वाटप केले. त्याचबरोबर खातिवली जवळील शुभवास्तू गृहसंकुलात राहणाऱ्या एका व्यक्तीला मदतीची गरज असल्याचे भिंवडी येथील आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी रवि शिंदे यांनी पंडीत मसणे यांना कळविले यानुसार शिवसेनेचे कार्यकर्ते विलास काबाडी यांना याबाबत सुचित केले. सदर येथील परिसरात त्यांची मदत सुरू असतानाच याठिकाणी ते त्वरित प्रत्यक्ष पोहचून येथील व्यक्तीला जीवनावश्यक साहित्य व इतर मदत केली.