विट्ठलवाडी पोलिसांच्या वर्दीवर सॅनिटायझर स्प्रे
उल्हासनगर : पोलीस हे कोरोना प्रादुर्भावाचा फैलाव होऊ नाही म्हणून नागरिकांना बाहेर पडू नये असे आवाहन तसेच दुचाकीस्वारांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस वर्ग डे-नाईट ऑन ड्युटी कार्यरत आहे.ते हाताला सॅनिटायझरचा वापर करतात. आता पोलिसांची संपूर्ण वर्दी सॅनिटायझरयुक्त होण्याकरिता विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी सॅनिटायझर स्प्रे कॅबिन तयार केली आहे. पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांच्या उपस्थितीत सॅनिटायझर स्प्रे कॅबिनचे उद्घाटन करण्यात आले आहे.सहाय्यक पोलीस आयुक्त डी.डी. टेळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्यासोबत पोलीस ठाण्याचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांच्या पुढाकाराने मध्यवर्ती पोलीस ठाण्यातही सॅनिटायझर स्प्रेची कॅबिन तयार करण्यात आली आहे.