गॅस सिलेंडर देऊन “सक्षम"ने दिला रिक्षा चालकांच्या कुटुंबियांना आधार

अंबरनाथ : कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊन परिस्थितीमध्यो हातावर पोट असणान्या रिक्षा चालकांची परिस्थिती बिकट झाली आहे. रोज कुठेना कुठे अन्नधान्य मिळते. पण ते शिजवायचे कशावर असा प्रश्न रिक्षा चालकांच्यापुढे उभा राहिला आहे. ही समस्या ओळखन अंबरनाथच्या सक्षम सामाजिक संघटनेच्या वतीने २० जणांना गॅसचे सिलेंडर देऊन त्यांना दिलासा दिला आहे. ___ संघटनेचे अध्यक्ष तुषार गांगुर्डे, महेश चिकणे, विकी जाधव या युवकांनी मित्र, नातेवाईक नावाने गॅस यांच्या सहकार्यातून अंबरनाथच्या एका अधिकृत गॅस कंपनीमध्ये अंबरनाथच्या बार पाडा , राहुलनगर महालक्ष्मीनगर यासारख्या ठिकाणच्या रिक्षाचालकांच्या नावाने गॅस एजन्सीकडे जाऊनपैसे भरले आणि त्यांना सिलेंडर मिळवून दिले. यामुळे गरजू रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे याखोरीज पाच रिक्षा चालकांना धान्य वाटप देखील केले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...