राज्यात बारामतीसह सहा ठिकाणी . कोविड १९ प्रयोगशाळा सुरु होणार

बारामती : कोविड १९ या विषाणूची तपासणी करण्यासाठी बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) स्थापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बारामतीसोबतच राज्यात कोल्हापूर, जळगाव, गोंदिया, नांदेड व अंबेजोगाई येथेही अशा प्रयोगशाळा उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सदर प्रस्तावित प्रयोगशाळा स्थापित करण्यासाठी विहीत करण्यात आलेली मानके, विहीत कार्यपध्दती, मान्यता या बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधित संस्थाप्रमुख व संचालनालयाची राहील, असे या बाबत जारी करण्यात आलेल्या शासकीय परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेसाठी आवश्यक यंत्रसामग्री, साधनसामग्री बाबी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समितीच्या मान्यतेने व शिफारसीनुसार करण्यात याव्यात, असेही यात नमूद करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेच्या स्थापनेनंतर पुण्यातील प्रयोगशाळांवर येणारा ताण कमी होणार असून पंचक्रोशीतील रुग्णांची तपासणी बारामतीतच केली जाईल. ही प्रयोगशाळा तातडीने सुरु होण्यासाठी आता तयारी सुरु करण्यात आली आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...