जिल्हा बंदी मुळे अडकलेल्या परभणी येथील महिलेची मुरबाड येथे सुखरूप प्रसूती । 

मुरबाड : जिल्हा बंदी मुळे मुरबाड मध्ये अडकलेल्या परभणी येथील एका महिलेने मुरबाड ग्रामीण रुग्णालयात कन्या रत्नास जन्म दिला नवजात बालिका व तिची आई या दोघांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरानी सांगितले सोनाली योगेश जाधव रा जालना असे या महिलेचे नाव आहे. ___ मुरबाड पोलिसांनी ३० मार्च रोजी वाशी येथून बेचाळीस लोकांना परभणी येथे घेऊन निघालेला टेंपो ताब्यात घेतला होता तेव्हा पासून गाडीतील सर्व लोकांना कुणबी समाज हॉल मध्ये ठेवण्यात आले आहे त्यामध्ये दोन गर्भवती महिला , तीन महिन्याची छोटी मुलगी , सत्तर वर्षाची वृध्द महिला , सतरा लहान मुले व काही महिलांचा व पुरुषांचा समावेश आहे. ___या सर्व लोकांची सुरुवातीला वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती त्यानंतर बुधवारी ता १५ पुन्हा तपासणी केली या सर्व लोकांची प्रकृती उत्तम असल्याचे मुरबाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीधर बनसोडे यांनी सांगितले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...