दैनंदिन आयुष्यातील या गोष्टी ठरू शकतात कर्करोगाला निमंत्रण

आपल्या जीवनातील धूम्रपान, मद्यपान, इत्यादी सवयी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरण्याची शक्यता असते हे आपल्याला माहिती आहे. मात्र आपल्या आयुष्याचा भाग असणाऱ्या कितीतरी सर्वसाधारण सवयी देखील कर्करोगासारख्या गंभीर आजारांना आमंत्रण ठरू शकतात याची कल्पना आपल्याला नसते. आताच्या जगामध्ये सर्वाधिक मृत्यू हृदयरोगाने होत असून, त्यापाठोपाठ कर्करोग हे सर्वाधिक प्रमाणात मृत्यू होण्याचे आणखी एक कारण आहे. अश्या वेळी अगदी सर्वसाधारण आणि आपल्या आयुष्यामध्ये नियमित वापरात येणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला कर्करोग होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तविली असताना या गोष्टी नेमक्या कुठल्या आहेत हे जाणून घेणे श्रेयस्कर आहे, जेणेकरून या वस्तूंच्या वापरावर नियंत्रण ठेऊन पर्यायाने कर्करोगापासून बचाव केला जाऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत उन्हामध्ये वावरल्याने त्वचेवर सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांचे दुष्परिणाम होत असतात. या किरणांमुळे त्वचेवरील फायबर्सचे नुकासान होत असून, त्यामुले त्वचेचा रंग काळवंडणे, ट्युमर, आणि त्वचेवर घावही (तेग्दहे) तयार होत असतात. सूर्याच्या घातक अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हामध्ये वावरणे नेहमीच टाळता येते असे नाही, पण जर उन्हामध्ये वावरायचे असलेच, तर त्यासाठी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळामध्ये उन्हामध्ये वावर शक्यतो टाळावा. घराबाहेर पडण्याआधी एसपीएफ ३० किंवा त्यापेक्षा अधिक एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरावे. उन्हामध्ये बाहेर पडताना आपले शरीर कपड्यांनी व्यवस्थित पूर्णपणे झाकलेले असेल याची काळजी घ्यावी. यामुळे त्वचेवर सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांचे होणारे दुष्परिणाम टाळता बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकतात. मद्यपान आणि धूम्रपान ही कर्करोगाची कारणे आहेतच, पण एखादी व्यक्ती स्वत: धूम्रपान करत नसली, तरीही आसपासचे लोक सतत धूम्रपान करत असल्यास त्या धुराने, धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीलाही कर्करोग होण्याचा धोका असतो. यालाच म्हटले जाते. म्हणूनच आता अनेक सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी घालण्यात आली आहे. अति धूम्रपान आणि अति मद्य पानासोबतच वजन मर्यादेपेक्षा अधिक वाढलेले असणे, हे देखील कर्करोगाचे कारण ठरू शकते. असंतुलित आहार आणि खानपानाच्या अनियमित वेळा, व्यायामाचा अभाव, आहारामध्ये साखरयुक्त किंवा प्रोसेस्ड पदार्थांचे अतिसेवन या सर्व कारणांमुळे लठ्ठपणा उद्भवतो. यामुळे यकृत, किडनी, स्तनांचा कर्करोग उद्भवण्याचा धोका वाढतो. लठ्ठ पणा वाढला, की शरीरातील हार्मोन्सच्या पातळीमध्येही असंतुलन निर्माण होते. त्यामुळे शरीरातील इंस्युलीन आणि तत्सम बायोकेमिकल्सवर विपरीत परिणाम होऊन कर्करोगासारखे आजार उद्भवू शकतात. __बहुतेक आधुनिक महिलांच्या दैनंदिन प्रसाधानामध्ये नेल पॉलिशचा समावेश असतो. या नेल पॉलिशेसमध्ये अनेकदा टायफेनाईल फॉस्फेट, टोल्युईन, डायब्यूटाइल थैलेट यांसारखी घातक रसायने असतात. या रसायनांचा संपर्क सातत्त्याने शरीराशी आल्याने कर्करोग होऊ शकतो. हा धोका केवळ नेल पॉलिश स्वत:च्या नखांना लावणाऱ्यांच्या बाबतीतच नाही, तर इतरांच्या हातांचे मॅनिक्युअर करून त्यांच्या नखांना नेल पॉलिश लावून देणाऱ्यांच्या बाबतीतही उद्भवू शकतो. नेल पॉलिशचा वरचेवर वापर टाळणे या यावरील उतम पर्याय आहे. तसेच जे व्यवसायाने मॅनिक्यूअरिस्ट असतील, त्यांनी इतरांच्या हाता-पायांच्या नखांना नेल पॉलिश लावताना स्वत:च्या हातांमध्ये संरक्षण ग्लोव्हज आणि चेहऱ्यावर मास्कचा वापर करावयास हवा. अनेकदा पिण्याच्या पाण्यामध्ये असलेल्या अशुद्ध तत्वांच्यामुळेही कर्करोग उद्भवल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी शुद्ध करून घेणे महत्वाचे ठरते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...