नांदेड आरोग्य यंत्रणा करतेय मिशन मोडवर काम...

नांदेड शहर म्हटले की डोळ्यासमोर येते शीख बांधवांचे धार्मिक स्थळ तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारामध्ये मत्था टेकण्यासाठी अनेक नागरिक पंजाब आणि हरियाणा मधून येत असतात. देशात २३ मार्चनंतर लॉकडाऊन झाल्याने नांदेडमध्ये आलेल्या नागरिकांची सोय केली. यामध्ये तीन हजार सातशे पंचावन्न (३७५५) नागरिकांची सोय गुरुद्वारा बोर्ड आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. या दरम्यान सर्व संगत मधील यात्रेकरुंचे जवळपास ३ हजार ७५५ जणांची आरोग्य तपासणी नांदेड महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने केली. प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी तीन दिवस सलग चार टीम काम करीत होत्या. यासाठी ताप तपासणीसाठी थर्मल गनचा वापर करण्यात आला होता. यात्रेकरूंची आरोग्य तपासणी करून तसेच महानगरपालिकेच्या क्षेत्रात (८३५५) आठ हजार तीनशे पंचावन्न नागरिकांना शहरी भागात घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांची दैनंदिन भेट देवून आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या, आणि आरोग्य यंत्रणेतील अधिकारी यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी विषयी घरोघरी जाऊन विचारपूस केली जात आहे. नांदेड शहरात अनेक परदेशी नागरिकांना देखील विलगीकरण करण्यात आले असून यामध्ये १३० नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांची आरोग्य तपासणी केली असून याबरोबरच नांदेड महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांनी कोरोणाच्या संसर्गाविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजनाची जाणीव जागृती करण्याचे काम नांदेड आरोग्य यंत्रणा करीत आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग हा जगासमोरील आताची सर्वात मोठी आपत्ती आहे पण देश आणि राज्य पातळीवर प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणा सतर्कतेने काम करताना दिसते आहे. नांदेड जिल्ह्याने आरोग्यविषयक काळजी आणि त्याप्रमाणे उपाययोजना केल्यामुळे आतापर्यंत नियंत्रण मिळवले आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयाने आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य यंत्रणेने काम केल्याने सर्व परिचारिका, आशा कार्यकर्त्या. डॉक्टर यांचे योगदान महत्तवपर्ण ठरले आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...