शहापूर तालुक्यात 'कोरोना' व्हायरस चा शिरकाव, संशयीत व्यक्ति निघाली पॉझिटीव्ह...!

शहापुर : आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण शहापुर तालुक्यात नव्हता पण आज एक रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. दम्याचा त्रास होत असल्याने ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या"शहापुरातील एका ६७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे खाजगी लॅबमध्ये केलेल्या चाचणीच्या अहवालानंतर समोर आले आहे. दरम्यान यामुळे शहापुरात खळबळ माजली असून अफवांचे पीक आले आहे. शहपुरात राहणाऱ्या एका ६७ वर्षीय व्यक्तीला दम्याचा त्रास होत असल्याने त्याला प्रथम शहापुरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित रुग्णाला ठाणे येथील होरिझन या रुग्णालयात सात एप्रिल ला दाखल करण्यात आले. या रुग्णाची ठाणे शहराच्या पश्चिम भागातील एका खाजगी लॅब मध्ये कोरोनाची चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून संबंधित इमारत व परिसर सील करण्यात आला असून इमारतीमधील रहीवाशाना बाहेर पडू नये असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर आरोग्य विभागाचे पथक संबंधित रुग्णाच्या घरी जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे शहापुरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी सांगितले असून याबाबत काल गुरुवारी रात्री पासून आवश्यक कार्यवाही करण्यात आल्याचे त्यानी स्पष्ट केले शहापुरात याबाबत अफवांचे पीक आले असून अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यानी यावेळी केले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...