महाराष्ट्रात एमसीए सीईटी २०२० परीक्षा स्थगित
मुंबई : लॉकडाऊन आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. सद्य:स्थितीची समीक्षा करण्यात येणार असून नव्या तारखांची घोषणा अधिकत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात १३ ते २३ एप्रिल या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सीईटी होणार होती. परंतु लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याने ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा कक्षानेही ५ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान होणारी जेईई पुढे ढकलण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता.