कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुरबाड तालुका अजूनतरी सुरक्षित

मुरबाड : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. ठाणे शहरासह कल्याण-डोंबिवली ,अंबरनाथ ,बदलापूर मधेही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात अजुनपर्यंत एकही रुग्ण आढळला नसल्याने मुरबाड तालुका आद्याप पर्यंत तरी शंभर टक्के सुरक्षित आहे. एक रुग्ण जो बरमुडा या देशातुन आला होता तो सूद्धा कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या मुरबाड मधे सध्यातरी झिरो असल्याची माहिती मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांनी दिली. मुरबाड शहर तसेच ग्रामीण भागातील रस्ते पंधरा दिवस लॉकडाऊन करण्यात आले परीणामी बाहेरून येणाऱ्यांना पायबंद घातला गेला वाहनांची वर्दळ पुर्ण बंद करण्यात आली तसेच कोविड पथकामार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली काही ठिकाणी संशयास्पद रुग्ण आढळल्यास त्यांना घरातच कोरोनटाईन करण्यात आल्याने आज महिना होत आला तरी सुद्धा मुरबाड तालुका मात्र नियंत्रणाखाली असुन ग्रामीण भागातील फार्महाऊस मध्ये आलेल्या पाहुण्यांनी दडुन न बसता सहकार्य केल्यास शंभर टक्के कोरोना मुक्त होण्यासाठी मदत होईल. वैशिष्ट्य म्हणजे मुरबाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूंजे, पोलीस निरिक्षक दत्ताञय बोराटे, टोकावडे पोलिस स्टेशनचे खरमाटे यांनी तालुक्यात कायदा सुव्यवस्था अंत्यत चांगली राखली आहे. तसेच मुरबाड नगरपंचायतने सूद्धा शहरामध्ये योग्य ती खबरदारी घेऊन कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी चांगले नियोजन केल्याने परीणामी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. या संकटाच्या काळात मुरबाडचे आमदार किसन कथोरे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी नागरिकांना वेळोवेळी शासकीय मदत मिळविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करुन नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केल्याचे पाहावयास मिळाले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...