रिक्षा चालकांना आर्थिक मदत करा!
आमदार किसन कथोरे चे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना साकडे
बदलापूर : कोरोना आजारामुळे सर्वत्र संचारबंदी व लॉक डाऊन आहे, या परिस्थितीत रोज रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या ची आज उपासमार होत आहे, रिक्षा बंद, त्यामुळे धंदा ठप्प रिक्षा खरेदीचे हप्ते थकतात यामुळे हजारो रिक्षा चालकांची अवस्था हलाखीची बनत आहे, या रिक्षा चालकांना आर्थिक मदतीसाठी स्वतंत्र पॅकेज द्यावे अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे, बदलापूर शहरासह मुरबाड, कल्याण, अंबरनाथ तालुक्यात अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन रिक्षा खरेदी करून व्यवसाय सुरू केले आहेत. आज लॉकडाऊन मुळे रिक्षा व्यवसाय पूर्ण पणे ठप्प झाला आहे, त्यामुळे रोजच्या दैनंदिन उदरनिर्वाह च्या प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. एकीकडे रोजच्या जगण्याची विवंचना तर दुसरीकडे व्यवसाय नाही म्हणून कर्ज हप्ते फेडण्यासाठी चे संकट, या अवस्थेत काय करायचे हा यक्ष प्रश्न रिक्षा चालकाना सतावत आहे, सरकारने त्यांना ठराविक रकमेची मदत करावी, असे किसन कथोरे यांनी आपल्या मागणी पत्रात म्हटले आहे, लॉक डाऊन चा कालावधी वाढला आहे, त्यामुळे रिक्षा व्यवसाय सुरू होण्यास वीस दिवसांचा कालावधी लागणार आहे, हा कालावधी मोठा आहे, या काळात संकटात असणाऱ्या रिक्षा चालकांना ठोस आर्थिक मदत कशी मिळेल त्यासाठी ची त्वरित तरतूद करावी, आणि आजारो रिक्षा चालकांच्या कुटूंबाला आधार ध्यावा असे आमदार किसन कथोरे यांनी म्हटले आहे.