खबरदार मुरबाड तालुक्या बाहेरील नातेवाईकांनी शहरात प्रवेश केल्यास होणार १४ दिवस होम कवारंटाइन
मुरबाड : कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून मुरबाड तालुका बाहेरील नातेवाईकांना मुरबाड शहरात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. असी माहीती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कंकाळ यांनी दिली. देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना मुरबाड शहर मात्र अजूनही सुरक्षीत असल्याने नातेवाईक मुरबाड शहरात येण्याची शक्यता वाढली आहे. असी शंका नगरपंचायतिच्या नगराध्यक्षा व नगरशेवक यांनी हा प्रश्न उपस्थीत केला. या प्रश्नाला आमदार किसन कथोरे यांनीही दुजोरा दिल्याने याची अंमलबजावणी नगरपंचायतीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या वतीने मुरबाड नगरपंचायत क्षेत्र प्रतिबंधक क्षेत्र म्हणन जाहीर केल्याने ही उपाय योजना राबविण्यात येत आहे. मरबाड शहरातील नागरिकांनी तालुक्या बाहेरील नातेवाईकांना फोन करून या बंदीची माहीती द्यावी असेही आवाहन मख्याधिकारी अभिजित कंकाळ यांनी केले आहे. या नियमाला बगल देऊन शहरात प्रवेश करताना नातेवाईक आढळल्यास त्यांच्या हातावर शिक्का मारुन १४ दिवस होम कवारंटाइन केले जाणार असल्याने सद्या तरी मुरबाड तालुक्याच्या बाहेरील नातेवाईकांनी मुरबाड शहराला राम राम ठोकलेलाच बरा. _