मुरबाड बाजारपेठेत ग्राहकांची तुडुंब गर्दी सोशल डिस्टंक्शीनचा फज्जा!

मुरबाड : सलग चार दिवसांच्या संपूर्ण लाक डाऊन नंतर आज १५ तारखेला मुरबाड शहरात सकाळी बाजारपेठ उघल्यानंतर ग्राहकांनी किराणा सामान, भाजीपाळा, दूध खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळाली. या वेळी किराणा मालाचे मोठे व्यापारी यांच्या कडे लोकांनी प्रंचड गर्दी केली होती. या वेळी सोशल डिस्टंक्शीनचे कोणतेही नियम पाळले जाताना दिसत नाही. आजपर्यंत मुरबाड कोरोनापासून मुक्त झाला असला तरी अशा प्रकारची बाजारपेठेमध्ये होणारी गर्दी पाहता भविष्यात मुरबाड करांसाठी धोक्याची घंटा होऊ शकते. सध्या मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. कल्याणडोंबिवली मधे रोज नविन रुग्ण सापडत आहेत अशातच मुरबाड मधील नागरिकांनी शासनाचे नियम पाळले नाही तर भविष्यात मुरबाडकरांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल यात शंका नाही.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...