कुटुंबासह पायी जाणाऱ्या मजुरांना दिला मदतीचा हात
वाडा । प्रतिनिधी : वाडा पंचायत समिती, सभापती श्री. योगेश गवा, वाडा तहसीलदार डॉ. कदम सर, कंचाड तलाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने घडले | माणुसकीचे दर्शन- मौजे कंचाड | तलाठी श्री.दत्ता डोईफोडे यांना | दुपारी १८ ते २० माणसे | कुटुंबासमवेत घरगूती सामानासह चालत जाताना दिसले, विचारणा श्री.दत्ता डोईफोडे व कळमखांड केल्यानंतर ते सर्व लोक कामन- डोंगरीपाडा (ता.वसई) येथे वीटभट्टीवर कामासाठी गेलेले व वाहनव्यवस्था नसल्यामुळे तसेच जिल्हा-तालुका सीमारेखा बंद होऊन उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे तेथून अंदाजे १०० किमी खोडाळा-तळ्याचा पाडा (ता.मोखाडा) येथे पायी जात असल्याचे समजले. तात्काळ श्री. दत्ता डोईफोडे यांनी वाडा पंचायत समिती सभापती, श्री.योगेश गवा यांना या परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर श्री.योगेश गवा यांनी स्वत: क्षणाचा विलंब न करता वाडा तहसीलदार डॉ. कदम यांच्यासमवेत कळमखांड (कंचाड) या ठिकाणी पोहोचून कर्तव्यदक्ष राहून सदर अडकलेल्या पायी जाणाऱ्या १८-२० जणांना खोडाळा येथे पोच करण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली.
तसेच जीवनावश्यक वस्तूंचे कीट व मास्क वाटप केले. याप्रसंगी कळमखांड ग्राम.पं.सदस्य, श्री. गणेश ठाकरे व ग्रामस्थ तसेच खरीवली येथील कर्तव्यदक्ष नागरिक श्री.दिलीप जाधव हे उपस्थित होते. त्यांनी याकामी मदत तसेच सहकार्य केले. गरीब होतकरू मजूर- कुटुंबीयांना त्यांच्या इतर कौटुंबिक गरजांची पूर्तता व्हावी यासाठी तहसीलदार डॉ. कदम सर व सभापती श्री.योगेश गवा यांनी प्रत्येकास मोफत तांदुळ, तेल, साखर, मीठ, मसाला अशा गृहोपयोगी अत्यावश्यक साहित्य यांचा कीट वाटला तसेच CORONA-19 रोगाचे संक्रमण वाढू नये म्हणून आरोग्याच्या काळजीसाठी प्रत्येकास मोफत मास्क वाटले व सामाजिक बांधिलकी जपली. ___ ही लॉकडाऊन मधील परिस्थिती हाताळण्यासाठी आम्हीप्रशासन व संबंधित सर्व यंत्रणा तत्परतेने २४ तास कर्तव्यदक्ष राहू असे सभापती श्री.योगेशजी तहसीलदार डॉ.कदम सर यांनी सांगितले, तसेच सदर खोडाळा येथील मजूर व कुटुंबे त्यांना योग्य ती मदत करून त्यांना घरपोच करण्यासाठी वाहन उपलब्ध केले व त्यांना सद्याच्या कोरोना संक्रमण (COVID-19) रोगाविषयी जनजागृती केली. लॉकडाऊन काळात परिसरामधील समोर येणाऱ्या अनेक बिकट प्रसंगांचे निरसन करून अनेक गरजूंना मदतीचा हात दिल्यामुळे एक सेवाभावी कर्तव्यदक्ष सभापती श्री.योगेश गवा हे नेहमीच जनतेच्या चर्चेत असून त्यांच्या कार्याचे व विविध उपक्रमांचे सर्वत्र कौतुक व प्रशंसा होत आहे. TATI.