ऑनलाईन शिक्षण

चार भिंतीतील, पाठ्यक्रमानुसार सुरू असलेले औपचारिक शिक्षण तूर्त थांबले असले, तरी विद्यार्थी अनौपचारिक पद्धतीने, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने, कृतिशील पद्धतीने अध्ययन करू शकतात. त्या दृष्टिकोनातून राज्याने 'दीक्षा' नावाचे अॅप तयार केले असून, पहिली ते आठवीचे विविध विषय अभ्यासण्याची सोय केली आहे. पालक आपल्या मोबाइलवर हे अॅप डाउनलोड करून मुलांना उपलब्ध करून देऊ शकतात. विद्यार्थी या अॅपद्वारे इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अभ्यास आणि त्यानुसार पूरक उपक्रम करू शकतात. रोज एका विषयाची सर्व इयत्तांसाठीची लिंक या अॅपवर मिळणार आहे. राज्यातील काही खासगी शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. केंद्र सरकारनेही पर्यायी शैक्षणिक कॅलेंडरचा विचार सुरू केला असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तानिहाय उपक्रम देण्याचा प्रस्ताव आहे. सुरुवातीला एक महिन्याच्या उपक्रमांचे कॅलेंडर जाहीर होणार असून, ते प्राथमिक आणि माध्यमिक इयत्तांसाठी असणार आहे. राज्य आणि केंद्राच्या उपक्रमांचा सारा भर स्मार्ट फोनच्या माध्यमावर आहे. देशातील बहुतांश जनतेकडे स्मार्ट फोन आहे हे खरे; परंतु ही सुविधा ज्यांच्याकडे नाही, अशा मुलांनी लॉकडाउनमध्ये काय करायचे, हा प्रश्न उरतोच. त्यासाठी शिक्षकांची मदत घ्यायला हवी. शालेय शिक्षक आपल्या वर्गातील बहुतेक विद्यार्थ्यांना ओळखत असतात, त्यांच्या संपर्कातही असतात. अनेकांची घरची स्थितीही त्यांना माहीत असते. त्यामुळे ते यातून मार्ग काढू शकतात. वास्तविक सरकारी शाळांतील काही उत्साही शिक्षकांनी पालकांचे व्हाट्स अॅप ग्रुप बनवून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कृती करावयास देत असल्याची उदाहरणेही आहेत. लॉकडाउनच्या काळातही शिक्षणाची प्रक्रिया अखंड चालू राहावी, यासाठी देशभर होत असलेल्या विविध उपक्रमांचे संकलनही केले जावे. याबाबत शिक्षणतज्ज्ञांचे, अन्य जाणकारांचे मत काय आहे, जगभर काय प्रयोग सुरू आहेत यांचाही वेध घेतला जावा. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या मिळाल्या आहेत. राज्यात दहावीची उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आली आहे. विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची चाचपणी सुरू आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...