भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला.त्यांच्या जन्मावेळी, वडील रामजी सपकाळ महू येथे ब्रिटिशांच्या भारतीय सेनेत नोकरी करत होते. त्यांचे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात ठआंबडवेठ या गावचे होते.त्यांची जयंती जगातील १०४ पेक्षा अधिक देशात साजरी केली जाते." डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्ट्राचार, अनीती, अत्याचार, अन्यायास प्रखर त्यांचा विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड ते मानत असत. ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय भारतीय समाज एकसंघ होणार नाही असे त्याचे मत होते. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठीही त्यांनी अनेक चळवळी केल्या. त्याच बरोबर भारतीय समाजात जातीपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भूमिका बजावली. त्यांनी समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा, मानववंशशास्त्र, शिक्षण,इतिहास, पत्रकारिता, तत्वज्ञान, लेखन, धर्मशास्त्र, आणि नीतिशास्त्र अशा अनेक विद्याशाखेचा सखोल अभ्यास व चिंतन करून भारतीय समाजाचे जीवन समृद्ध करण्याचे अनेक उपाय सुचविलेले आहेत.


शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य जबाबदाऱ्या, व हक्काची जाणीव होते.असे ते नेहमी समाजापुढे शिक्षणाचे महत्व विशद करत असत. त्यांचे विचार केवळ भारतीयांनकरीताच नाही तर संपूर्ण जगाकरिता प्रेरक आहेत. त्यांच्यावर गौतम बुद्ध, संत कबीर ,महात्मा फुले,थॉमस पेन,अब्राहम लिंकन,जॉर्ज वॉशिग्टन आणि नेपोलियन यांच्या विचारांचा प्रभाव होता. डॉ. बाबासाहेबांच्या वाचनात, चिंतनातव लेखनात प्रचंड ताकद होती."ज्ञान संपन्यतेच्या शक्तीमुळेच व्यक्ती,समाज,राज्य, आणि राष्ट्र महान बनत असते, याची त्यांना पुरेपूर जाणीव झाली होती. बाबासाहेबांचे कायदेविषयक विचार अधिक प्रगल्भतेने समजून घेण्यासाठी डॉ. आंबेडकर एक असे विद्वान आणि अद्वितीय वकील आहेत की,त्यांच्या समोर जगातील कोणत्याही वकिलाला हार पत्करावी लागतेठअशा शब्दात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांचा गैरव केला आहे .त्याच बरोबर जगातील अनेक विद्वानांनी त्यांच्या विषयी आपले विचार मांडले आहेत त्यामध्ये ख्यातनाम चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात; नवभारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार, लोकशाहीचे त्राते, नि मानवी" स्वातंत्राचे वैवारी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक महान पर्व आहेठ.त्याच बरोबर नेल्सन मंडेला,डॉअमर्त्य सेन ,प्रा. डॉ. एडविन सेगलीमन, "डॉ रुंगथिप चोटनापलाई, नेपोलियन आणि लॉर्ड बॉटमली यांनीही आपले विचार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनविषयी अलौकिक पद्धतीने मांडले आहे.समाजाच्या उन्नतीचे साधन म्हणून त्यांची पत्रकारीताही अधिक प्रभावी होती. त्यांच्या पत्रकारितेचा उदेश स्वातंत्र्यांच्या आंदोलनाला गती देणे आणि समाज प्रबोधन करणे हाच दिसून येत होता. त्यांची पत्रकारिता जितकी आक्रमक तितकीच संयमीही दिसून येत होती..


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात विविध क्षेत्रात काम करून राष्ट्राच्या निर्माणात अमूल्य योगदान दिले बद्दल त्यांना केंद्र शासनाच्या भारतरत्न या सर्वोच नागरी पुरकाराने सन्मानित करण्यात आले आहे.त्याच बरोबर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी देशाला समता,स्वातंत्र,बंधुता,न्याय,व धर्मनिरपेक्ष या मूल्यांच्या आधारावर देशाला लोकशाहीद्वारे ब्रिटिशांच्या जाती व्यवस्थेच्या जुलमी राजवटीतून मुक्त केले. या विश्वव्यापक लढ्यामुळे त्यांच्या गैरव म्हणून प्रज्ञासूर्य,महामानव,"विश्वभूषणक्रांतिसूर्य, घटनाकार, प्रकांडविद्वान, त्यागपुरुष, स्त्री उद्धारकधर्मनिष्ठ, कायदेतज्ज्ञ आणि शीलवान अशा अनेक उपाध्या त्यांच्या नावापुढे आहेत. त्यांचा जन्म दिवस केंद्र सरकारने ठसमता दिनठ म्हणून तर महाराष्ट्र सरकारने ठज्ञान दिनठ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा या नव्या लोकशाहीवादी प्रजासत्ताक भारताची रचना निर्माण करणाऱ्या महानायकास १२९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! : शब्दांकन : प्रा. प्रफल इंगोले-जीवनदीप महाविद्यालय, गोवेली


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...