सभापती सौ. वीणा गणेश जाधव याज कडुन प्रभाग क्र. ३८ रामबाग सिंडिकेट भागातील गरजू, हमाल, रिक्षा चालक, मजूर, घरकाम करणाऱ्या महिला यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कल्याण : कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सौ.वीणा गणेश जाधव (सभापती महिला बाल कल्याण समिती, कल्याण) यांच्या वतीने प्रभाग क्र. ३८, रामबाग - सिंडिकेट भागातील मावळ विकास मंडळातीलहनुमान सेवा मंडळ सिंडिकेट,मुरारबाग परिसर,इराणी चाळ, रामबाग परिसर येथील गोरगरीब गरजू, हमाल,मजूर,रिक्षा चालक,घरकाम करणाऱ्या महिला,यांना जीवनावश्यक वस्तू (५किलो गहू पीठ,तेल व ग्लूकोज बिस्किट) यांचे वाटप या भागाचे पोलीस निरीक्षक श्री कंभार साहेब पोलीस श्री.चव्हाण साहेब व प्रभागातील नागरीक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी,मास्क लावावेत, हात स्वच्छ धुवावेत, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये,एकमेकांत अंतर ठेवून बोलावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले. कोरोनाचे संकट आपण एकजुटीने परतवून लावू या, घरातच राहून शासनाला मदत करू या.