आपली जबाबदारी


महाराष्ट्रातील मृत्युदर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असला, तरी जास्तीत जास्त मृत्यू ज्येष्ठ व्यक्ती आणि ज्यांना इतरही काही आजार आहेत, अशा लोकांचे झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढते आहे. त्याची स्पष्ट आणि ठोस माहिती देऊन आपण चाचण्याही वाढवल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. लोकांनी आपल्याकडे येऊन चाचणी करून घेण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जाऊन चाचणी करत असल्याचे सांगताना त्यांनी संकटाच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सर्वतोपरी सज्ज असल्याची ग्वाही दिली. मुंबई विमानतळावर जगभरातून प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे सुरुवातीला केंद्र सरकारच्या यादीत नसलेल्या देशातून जे लोक आले, त्यांची तपासणी झाली नसल्याचे स्पष्ट करून महाराष्ट्रातील रुग्णसंख्या जास्त असल्याच्या कारणांचा उहापोह केला. करोनाच्या रुग्णांचा गुणाकार मंद राखण्यात यश मिळवले असले, तरी तो शून्यावर आणण्याचा निर्धार व्यक्त करत जनतेला विश्वास देण्याबरोबरच त्यांच्या सहकार्याचीही अपेक्षा व्यक्त केली आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, हे त्यांचे विधान त्यांच्या प्रारंभीच्या काळातील संकट गंभीर असले, तरी सरकार खंबीर असल्याच्या विधानाची आठवण करून देणारे होते. टाळेबंदीच्या काळात शेती, शेतीसंबंधीची कामे, शेतमाल वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, औषधांची वाहतूक आणि पुरवठा सुरूच राहील, या संदर्भातील पुरेसे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्य सरकार आपल्या अखत्यारीतील सर्व आघाड्यांवर सुनियोजित पुढे जात असले, तरी अनेक बाबतींत राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागते. त्याच अनुषंगाने मुख्यमंर्त्यांनी पंतप्रधानांकडे पीपीई किट, एन ९५ मास्क, इतर वैद्यकीय उपकरणे लवकरात लवकर मिळण्याची केलेली मागणी महत्तवाची ठरते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...