कल्याणमध्ये कोरोना बांधितांची संख्या वाढती
टिटवाळा : कल्याण डोंबिवली महानगरपालिकावैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केले असून गेल्या २४ तासांत कोरोनाचे ११ नवीन रुग्ण आढळल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १०८ झाली आहे. तर यातील एक प्रेताच्या राखेतून रुग्ण मांडा टिटवाळा परिसरात आढळन आला आहे. टिटवाळयातील पहिली कोरोनाबाधित महिला बरी होऊन घरी आल्यानंतर टिटवाळाकर समाधान व्यक्त करत असतानाच आज पुन्हा एका टिटवाळा येथील शासकीय कर्मचारी असलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पण झाल्याने टिटवाळाकरांच्या चिंतेत भर पडली आहे. या आधी टिटवाळयातील पहिली कोरोनाबाधित महिला ही कस्तुरबा रुग्णालय येथे परिचारिका म्हणून काम करत होती. .कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णसेवा देण्यासाठी २१ मार्च नंतर येथेच रहात होती. यावेळी या रुग्णांची सेवा करत असताना ही महिला स्वत: बाधित झाली.
सुरवाती (लॉकडाउन) पासन रुग्णालयातच होत्या. तिथे कार्यरत असतानाच बाधित झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी त्या कस्तुरबा रुग्णालयातच दाखल करण्यात आले. त्यामुळे टिटवाळा शहरात त्यांचा कोणाशीच संपर्क आलेला आलेला नव्हता. यानंतर दि. १९ एप्रिल रोजी ही महिला योग्य त्या उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊन घरी परतली यावेळी स्थानिक नगरसेविका आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी व सदर महिला राहत असलेल्या सोसायटी मधील नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून तसेच टाळ्या वाजवत तसेच शंखनाद करून त्यांचे स्वागत केले होते. मात्र परिसरात आज पुन्हा नव्याने एक कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्याने टिटवाळाकरांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. आज सापडलेल्या पुरुष रुग्णाचे वय ४२ वर्षे असून त्याची प्रकृती बरी नसल्या कारणाने त्यांनी मागील गुरुवारी स्वत:हून तपासणी केली . यानंतर आज त्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत सूरक्षेच्या दृष्टीने आजूबाजूचा परिसर सील केला आहे.
तसेच घरातील व्यक्तीना देखील खाब्दरिचा उपाय म्हणून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यावेळी स्थानिक नगरसेविका अपेक्षा जाधव यांनी लोकांना सर्वांनी घरातच राहून आपले व आपल्या परिवाराचे, समाजाचे रक्षण करावे असे आवाहन केले आहे. तर वार्ड ९ च्या नगरसेविका आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी कामानिमित्त अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी अधिकारी यांचा आम्हांला आभिमान आहे तसेच आमच्या परिसराच्या आरोग्यासोबतच त्यांच्या देखील आरोग्याची काळजी आपण घ्यायला हवी यासाठी लॉक डाऊन काळात सेवा पुरवण्यासाठी आपल्या कामच्या ठिकाणी जाणाऱ्या कर्मचारी वर्गाची त्यांच्या कामच्या ठिकाणीच राहण्याची – खाण्याची योग्य उपाययोजना शासनाने करावीजेणेकरून प्रवासादरम्यान होण्यसारखा संसर्ग टाळता येईल अशी चर्चा पालिका आयुक्त डॉसूर्यवंशी यांच्याशी केले असून तसे पत्र देखील त्या देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना आवाहन केले की दिवसेंदिवस क. डॉ. म.पालिका मध्ये रुग्णांची वाढ होत आहे तरी सर्वांनी घरातच राहून आपले आपल्या परिवाराचे रक्षण करावेमात्र तरीही सर्वानी घरात रहासुरक्षित रहा अफवांवर विश्वास ठेवू नका असा संदेश यावेळी दिला.