कोरोना नियंत्रणासाठी नेमलेल्या शिक्षकांना ५० लाखाचे कवच लागू करा

भाजपा शिक्षक आघाडीची राज्य शासनाकडे मागणी


मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमलेल्या राज्यातील शिक्षकांना ५० लाखाचे विमा सुरक्षा कवच लागू करावे अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीने राज्य शासनाकडे केली आहे"भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी याबाबत आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीशिक्षणमंत्री व ग्रामविकास मंत्री तसेच विधानसभा व विधानपरिषद विरोधी पक्ष नेत्यांना पाठविलेल्या पत्रात ही मागणी केली आहे"साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २, ३ आणि अन्वये कोविड १९ या साथरोगाच्या नियंत्रणाकरिता मुंबई महानगरपालिकेने शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात देखील शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत. त्यांना क्वारंटाईन केलेल्या रुग्णावर लक्ष ठेवण्यास सांगितले जात आहे. राज्यात डॉक्टर, नर्स व इतर विभागातील कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमा सुरक्षा कवच जाहीर केले आहे तर काही महापालिकांनी १ कोटीचे सुरक्षा कवच लागू केले आहे. कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना मात्र अद्यापही अश्या प्रकारे सुरक्षा कवच जाहीर केले नसून मुंबई महानगरपालिकाराज्यशासनाच्या शालेय शिक्षण, ग्रामविकास, नगरविकास खात्याने शिक्षकांनादेखील ५० लाखाचे विमा सुरक्षा कवच लागू करण्याची मागणी अनिल बोरनारे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...