नगराध्यक्षांच्या सौजन्याने दिलेल्या सेनिटायझर शॉवरचे लोकार्पण

_मुरबाड : कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेश व्दारावर बसविलेल्या सेनीटायझर शॉवरचे लोकार्पण आज करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अनेक कार्यालयांत सेनिटायझर शॉवर बसविण्यात आले आहेत. याचा एक भाग म्हणून खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. छाया चौधरी यांच्या सौजन्याने हा शॉवस बसविण्यात आला आहे. या शॉवरचे लोकार्पण तहसिलदार अमोल कदम, मुख्याधिकारी अभिजित कंकाळ, नगराध्यक्षा सौ छाया चौधरी, तालुका अध्यक्ष जयंत सूर्यराव, शहर अध्यक्ष सुधीर तेलवणे, माऊली सामाजीक संस्था अध्यक्ष संतोष चौधरी व नगरशेवकांच्या उपस्थीतीत करण्यात आले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...