खर्डीतील संशयीत रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह;
सोशल मीडियावर रुग्ण पॉझीटिव्ह असल्याची अफवा || पसरविणायावर कारवाई करण्याची फरीद शेख यांची मागणी
खडी : शहापुर तालुक्यातील खर्डी येथून २ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा रुग्णालयात नेलेल्या तीन जणांची प्रकृती ठणठणीत असल्याचा व त्यांचा तपासणी रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह असल्याचे५ दिवसांनी स्पष्ट झाल्याने घरी पाठविण्यात आले होते व असून १४ दिवस होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. याबाबत सोशल मिडियावर खर्डीत कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण सापडल्याची अज्ञात इसमाने अफवा पसरवून माझी व माझ्या कटबियांची बदनामी केली असल्याने या प्रकारणाची योग्य चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी फरीद शेख यांनी केली आहे. शहापूर तालुक्यातील खर्डीतुन २ एप्रिल २०२० गरुवारी तीन तरुणांना वैद्यकीय चाचणीसाठी ठाणे सिविल रुग्णालयात नेण्यात आले होते.त्यामळे खर्डीत खळबळ उडाली होती.धार्मिक कार्यक्रमासाठी नालासोपारा येथे ते तिघे गेले होते परंतु येथील धार्मिक कार्यक्रम रह झाल्याने येथील नातेवाईकाच्या भेटीसाठीखर्डीतील तिघेजण तिथे काही दिवस वास्तव्यास राहिले होतेलॉक डाउन झाल्याने नाला सोपारा येथील नगरसेवकाच्या सहाय्याने खर्डीत परतलो तिघांचीही प्रकती कोरोना संसर्गाने संशयास्पद आढळल्याने त्यांची खर्डी येथील आपत्ती व्यवस्थापन सदस्यानी खर्डी ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली होती. गुरुवारी दुपारी तिघांनाही पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पन्हा ताब्यात घेऊन ठाणेयेथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले होते. पण ५ दिवसांनी आम्ही कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला होता परंतु या मधल्या ५ दिवसांत सोशल मिडियावर आम्ही तिघे पॉझीटिव्ह असल्याची अफवा पसरविल्या मुळे आम्हाला मानसिक त्रास झाला असल्याचे फरीद शेख यांनी सांगितले.